टायटन पाणबुडी : महासागराच्या पोटात काय रहस्यं दडलेली असतात?

महासागर तळ

फोटो स्रोत, Getty Images

पृथ्वीचा 70 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे, असं आपण शाळेत असल्यापासून वाचलं आहे. या 70 टक्क्यांमध्ये सर्वांत मोठा वाटा आहे तो महासागरांचा. पण पृथ्वीचा मोठा भाग व्यापणाऱ्या या महासागरांच्या पोटात काय दडलंय हे गूढच आहे.

महासागरातल्या खोलवर असलेल्या जवळपास 80 टक्के भागापर्यंत अजूनही मनुष्याला पोहोचता आलं नाहीये. त्यामुळे तिथल्या वातावरणाबद्दल फार त्रोटक माहिती उपलब्ध आहे.

युनेस्कोने आपल्या अंदाजामध्ये जगातील महासागरांच्या केवळ 5 टक्के भागापर्यंत पोहोचता आल्याचं म्हटलं होतं.

महासागरात मनुष्य किती खोलवर जाऊ शकतो? महासागराच्या सर्वांत खोल भागामध्ये कोणते जीवजंतू राहतात? समुद्राच्या तळाशी सूर्यप्रकाश किती खोलवर पोहोचू शकतो? आपल्याला समुद्राच्या पोटातलं गूढ कितपत उलगडू शकतं?

या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

महासागरात राहणारे बहुतांश जीव हे पृष्ठभागाच्या जवळच राहतात. तुम्ही जसे खोलवर जायला लागता, तसं तापमान बदलतं. दाब वाढतो आणि प्रकाशही कमी व्हायला लागतो.

एक्सप्लोरर हर्बट नित्श यांनी 2007 यांनी विक्रम प्रस्थापित केला. ते समुद्रात जवळपास 214 मीटर्स खोल (702 फूट) खोलवर गेले होते. ते जागतिक फ्री डायव्हिंग चॅम्पियनही ठरले होते. ‘पृथ्वीवरचा सर्वांत खोलवर गेलेला माणूस’ म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं.

सगळ्यांत विशेष म्हणजे त्यांनी हा चमत्कार कोणत्याही ऑक्सिजन सिलेंडरच्या मदतीशिवाय करून दाखवला.

स्कूबा डायव्हिंगच्या मदतीने महासागराचा शोध

महासागर तळ

फोटो स्रोत, Getty Images

अहमद गाब्रिन यांनी 2014 साली स्कूबा डायव्हिंग केलं होतं.

ऑक्सिजन सिलेंडरसारख्या ब्रीदिंग इक्विप्मेंट्स वापरून ते तांबड्या समुद्रात (Red Sea) 332 मीटर (1090 फूट) खोलवर गेले होते.

समुद्रात 200 मीटरपर्यंत (656 फूट) सूर्यप्रकाश योग्य प्रकारे पोहोचतो. या भागाला सूर्यप्रकाशित भाग (sunlit zone) म्हणूनही ओळखलं जातं.

200 मीटर ते 1 हजार मीटरपर्यंतचा भाग हा ‘twilight zone’ म्हणून ओळखला जातो. इथे सूर्यप्रकाश फारसा पोहोचत नसल्यामुळे हा भाग अंधुक असतो. पाण्याचं तापमानही खूप कमी असतं. सूक्ष्मजीवांपासून अनेक मोठमोठे जलचर या भागात आढळतात.

1 हजार मीटरपासून 4 हजार मीटरपर्यंतचा भाग हा मिडनाइट झोन म्हणून ओळखला जातो. इथे अंधारच असतो.

इथे पाण्याचं तापमानही कमी असतं. त्यामुळे थंड पाण्यात तग धरू शकणारे जीवच या भागात आढळतात.

टायटॅनिकचे अवशेष नेमक्या कोणत्या भागात आहेत?

टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन पाणबुडीचा स्फोट होऊन आतमधील पाचही प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर 110 वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेली टायटॅनिक पुन्हा चर्चेत आली.

समुद्रात टायटॅनिकचे अवशेष नेमके आहेत कुठे, हा प्रश्न अनेकांना पडला.

अटलांटिक महासागरात बुडालेल्या टायटॅनिकचे अवशेष हे 12,500 फूट म्हणजेच 3800 मीटर खोल आहेत.

हा समुद्रातला ‘मिडनाइट झोन’ आहे.

टायटॅनिकचे अवशेष

फोटो स्रोत, Getty Images

चॅलेंजर गर्ता

पॅसिफिक महासागरात असलेली चॅलेंजर गर्ता ही पृष्ठभागापासून 10 हजार मीटर खोलवर (35 हजार फूट) आहे. ती ‘मरियाना’ गर्तेच्याच जवळ आहे. ब्रिटीश रॉयल नेव्हीच्या एचएमएस चॅलेंजर या जहाजावरून या गर्तेचं नाव ठेवण्यात आलं आह.

1872 आणि 1876 दरम्यान या भागात झालेल्या संशोधनादरम्यान चॅलेंजरने या गर्तेची खोली मोजली होती.

याच संशोधनातून समुद्रतळाबद्दल इतरही बरीच माहिती समोर आली होती.

1960 साली डॅन वेल्श आणि जॅक स्पिकेट हे या खोलीपर्यंत पोहोचले होते. पाणबुडीतून ते इथपर्यंत पोहोचले होते.

2012 साली टायटॅनिक या सिनेमाचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनीही चॅलेंजर गर्तेपर्यंतचा प्रवास केला होता. डीप सी चॅलेंजर नावाच्या पाणबुडीतून त्यांनी हा प्रवास केला होता.

2019 मध्ये व्हिक्टर वेस्क यांनीही पाणबुडीतून चॅलेंजर गर्तेचा प्रवास केला होता. व्हिक्टर वेस्कने जगातील सर्वोच्च शिखर असलेलं एव्हरेस्टही साध्य केलं होतं.

त्यानंतर अनेक पाणबुड्या चॅलेंजर गर्तेपर्यंत जाऊन आल्या होत्या.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)