'पुरुषांशी संबंध ठेवून पैसे मागायचा, नाही दिले की हत्या करून मृतदेहाची माफी मागायचा'

आरोपी

फोटो स्रोत, BIMAL SIANI

फोटो कॅप्शन, पोलिसांचा दावा आहे की आरोपीनं 11 हत्या केल्या आहेत
    • Author, बिमल सैनी
    • Role, बीबीसी पंजाबीसाठी

"त्यानं मला फसवलं, त्यानं लैंगिक संबंधानंतर मला पैसे देखील दिले नाहीत आणि मला मारहाण केली. त्यानंतर मी गळा दाबून त्याची हत्या केली."

11 हत्यांच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे हे शब्द आहेत.

रुपनगरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) गलनीत सिंग खुराना यांनी याबाबतीत दावा केला की 11 हत्या करणाऱ्या एका समलिंगी व्यक्तीला त्यांनी अटक केली आहे.

या व्यक्तीचं नाव राम स्वरूप उर्फ सोढी असून तो पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील गडशंकर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या चौरा गावचा रहिवासी आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

त्याने या हत्या कशा केल्या?

वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP)गलनीत सिंग खुराना म्हणाले, "आरोपी राम स्वरूप सिंग सोढी हा एक समलिंगी कामगार आहे. तो रस्त्यावरील कारचालक आणि मोटरसायकलस्वारांचं लक्ष वेधून घ्यायचा."

"त्यानंतर तो त्यांच्याकडे लिफ्ट मागायचा आणि त्यांच्यासोबत बसायचा. नंतर तो त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवायचा. यादरम्यान आरोपीचा जेव्हा त्यांच्याशी वाद व्हायचा तेव्हा तो त्यांची हत्या करायचा."

आरोपी आणि पोलीस

फोटो स्रोत, BIMAL SAINI

"यानंतर आरोपी त्यांच्या वस्तू घ्यायचा आणि त्या मृतदेहांवर संदेश लिहून तिथून पळून जायचा."

वरिष्ठ पोलीस अधीक्षक गलनीत सिंग खुराना म्हणाले की आरोपी गळा दाबून किंवा जखमी करून हत्या करत होता.

पोलीस आरोपीपर्यंत कसे पोहोचले?

वरिष्ठ पोलीस अधीक्षक गलनीत सिंग खुराना म्हणाले, "किरतपूर साहिबचे रहिवासी असलेल्या भजन सिंग यांचा मुलगा मनिंदर सिंग याचा मृतदेह मनाली रस्त्यावरील जिओ पेट्रोल पंपासमोरील झुडुपात सापडला."

"पोलिसांनी जेव्हा तांत्रिकदृष्ट्या या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना यामध्ये राम स्वरूपचा संबंध आढळून आला. या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर ही घटना उघडकीस आली."

या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी राम स्वरुपला अटक केली. पोलिसांनी दावा केला की या हत्येच्या तपासादरम्यान इतर अनेक हत्यांमागचं गूढ उलगडलं आहे.

आरोपीकडून इतर हत्यांची कबुली

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, हत्येच्या इतर प्रकरणांचा देखील उलगडा झाला.

पोलीस अधिकाऱ्यानं दावा केला की आरोपीची चौकशी केली जात असताना, या हत्येव्यतिरिक्त आणखी 10 हत्या केल्याचं त्यानं कबूल केलं. यात रुपनगर जिल्ह्यात केलेल्या 2 हत्यांचा समावेश आहे.

पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की यासंदर्भात किरतपूर साहिब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 24 जानेवारी 2024 ला रुपनगरमधील निरंकारी भवनाजवळ एका कारमध्ये एका तरुणाचा मृतदेह सापडला होता.

या तरुणाची ओळख पटवण्यात आली होती. त्याचं नाव हरप्रीत सिंग उर्फ सनी असून तो रुपनगरचा रहिवासी होता.

वरिष्ठ पोलीस अधीक्षक म्हणाले की या मृतदेहावर कपडे देखील नव्हते.

पोलिसांनी सांगितलं की 5 एप्रिल 2024 ला मुकंदर सिंग उर्फ बिल्ला यांचा मृतदेह पंजेहरा रस्त्यावरील बारा गावात सापडला होता. ते बेगमपुरा (घनोली) गावचे रहिवासी होते. त्यांच्या मृतदेहावर जखमांच्या खुणा आढळल्या होत्या.

पोलिसांनी दावा केला की हत्येच्या प्राथमिक तपासात आरोपीनं फतेहगड साहिब जिल्हा आणि होशियारपूर जिल्ह्यात हत्या केल्याची कबुली दिली आहे.

पोलिसांनी राम स्वरूप उर्फ सोढीला न्यायालयात हजर केलं होतं. आरोपीला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोपीच्या कोठडीतील चौकशीतून आणखी माहिती मिळण्याची शक्यता आहे.

पोलिसांनुसार, आरोपीला त्याच्या कुटुंबानं दोन वर्षांपासून घराबाहेर काढलं आहे.

"हत्या केल्यानंतर तो त्यांची माफी मागायचा"

पोलिसांनी आरोपी राम स्वरूपला अटक केली आहे. प्रसारमाध्यमांना आरोपीनं सांगितलं की, "मी जाणूनबुजून कोणाचीही हत्या केलेली नाही."

रुपनगरच्या हत्येबद्दल आरोपी म्हणाला, "तो फ्रॉड होता. मी त्याचं लक्ष वेधल्यानंतर त्यानं मला त्याच्यासोबत कारमध्ये घेतलं होतं. मी 200 रुपयांसाठी त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. मात्र नंतर त्यानं मला पैसे देण्यास नकार दिला. त्यानं मला कारच्या बाहेर ढकललं. त्यानं काठीनं मला डोक्यावर मारलं. नंतर मग मी मफलरनं गळा दाबून त्याची हत्या केली."

आरोपी आणि पोलीस

फोटो स्रोत, BIMAL SAINI

फोटो कॅप्शन, आरोपी राम स्वरूपला पोलिसांनी अटक केली

राम स्वरूप पुढे म्हणाला, "हत्या केल्यानंतर मी त्यांच्या मृतदेहाच्या पाया पडायचो आणि माफी मागायचो. मला या हत्यांबद्दल पश्चाताप वाटतो."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.