सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबार करणाऱ्याबद्दल पोलिसांनी काय सांगितलं?

सुखबीर बादल यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न करण्यात आला
फोटो कॅप्शन, सुखबीर बादल यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांनी रोखले.

श्री अकाल तख्त साहिबनं सोमवारी (2 डिसेंबर) सुखबीर सिंग बादल आणि इतर अकाली नेत्यांना धार्मिक शिक्षा सुनावली. त्यानंतर मंगळवारी (3 डिसेंबर) बादल यांनी त्यानुसार सेवा बजावली.

आज (4 डिसेंबर) ते या परिसरात बाहेर व्हीलचेअरवर थांबलेले असताना त्यांच्यावर एका व्यक्तीनं गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.

सुदैवानं त्यांच्या आसपास असणाऱ्या व्यक्तींनी गोळीबार करणाऱ्याला थांबवलं. याच जागेवर सर्व माध्यमं उपस्थित असल्यामुळे घडलेला प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

अमृतसरचे पोलीस आयुक्त गुरप्रीत सिंग भुल्लर यांनी सुखबीर बादल यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या संदर्भात पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले की, "अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात सुखबीर सिंग बादल सेवा करत होते. त्यांच्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेल्या पथकामध्ये सहाय्यक महानिरीक्षक (एआयजी) दर्जाचा अधिकारी, दोन पोलीस अधीक्षक (एसपी), दोन उप पोलीस अधीक्षक (डीएसपी) यांचा समावेश आहे. यासोबतच सुमारे 200 पोलीसही तैनात होते, त्यामुळेच हा हल्ला अयशस्वी ठरला."

गुरप्रीत सिंग भुल्लर म्हणाले की, "या प्रकरणात नारायण सिंह चौडा याला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचा सर्व प्रकारे तपास केला जाईल."

श्री अकाल तख्त साहिब हे शिखांचं पवित्र तख्त असून ते अमृतसरमध्ये आहे.

या प्रसंगी, पंजाबचे माजी मुख्यमंत्री दिवंगत प्रकाश सिंग बादल यांना दिलेला फकर-ए-कौम हा पदवी परत घेण्याची देखील घोषणा करण्यात आली.

सुखबीर सिंग बादल यांचा राजीनामा तीन दिवसांत स्वीकारण्याचे आदेश देखील देण्यात आले होते.

अकाली दल

फोटो स्रोत, AKALI DAL

फोटो कॅप्शन, अकाली दलचे नेते सुखबीर सिंग बादल यांना अकाल तख्तने शिक्षा दिली आहे.

अकाल तख्त साहिबचे जथेदार ज्ञानी रघबीर सिंग यांनी 2015 साली कॅबिनेटमध्ये असलेल्या अकाली दलाच्या कोअर समितीच्या सदस्यांसह सुखबीर सिंग बादल यांना शिक्षा सुनावली आहे. बाथरूम साफ करणे, धार्मिक पठण करणे, लंगरमध्ये काम करणे या शिक्षा त्यांना सुनावण्यात आल्या होत्या.

ज्ञानी रघबीर सिंग म्हणाले की सुखबीर सिंग यांच्यासह सुखदेव सिंग धिंडसा, सच्चा सिंग लंगाह, हिरा सिंग, बलविंदर सिंग भुंडर, दलजीत सिंग चीमा, गुलझार सिंग यांनी त्यांचे गुन्हे स्वीकारले आहेत.

त्यानुसार आज सुखबीर सिंग बादल यांनी आज त्यांची सेवा प्रदान केली. सुखबीर यांच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्यांना बाथरूम साफ करण्याच्या शिक्षेतून सवलत देण्यात आली. सुखबीर सिंग बादल यांनी गुरुद्वाऱ्यातील सेवकासाठी असतो तो झगा परिधान करुन हातात भाला घेत रक्षकाची सेवा बजावली आहे. यावेळी ते व्हीलचेअरवर बसले होते. तसेच त्यांच्या गळ्यात पाटी देखील लटकवण्यात आली होती.

सुखबीर सिंग यांच्यासह इतरांना शिक्षा सुनावताना ज्ञानी रघबीर सिंग म्हणाले की 3 डिसेंबरला या सर्वांना दुपारी 12 ते दुपारी 1 वाजेदरम्यान बाथरुमची साफसफाई करावी लागेल.

त्यानंतर ते स्नान करतील आणि लंगर मध्ये सेवा देतील. नंतर त्यांनी नितनेम आणि सुखमणी साहिबचं पठण करायचं आहे.

याबरोबर ज्ञानी रघबीर सिंग म्हणाले की सुखबीर सिंग बादल यांच्या पायाला दुखापत झालेली असल्यामुळे आणि सुखदेव सिंग धिंडसा वृद्ध असल्यामुळे त्यांना वरील शिक्षा देण्यात आलेली नाही.

त्यामुळे या दोघांना गुरूद्वाऱ्यात दोन दिवस एक तास सेवा द्यावी लागणार आहे. त्यावेळेस त्यांना सेवकांचा झगा परिधान करावा लागेल आणि हातात भाला धरावा लागेल.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री दिवंगत प्रकाश सिंग बादल यांना दिलेला फकर-ए-कौम हा किताब परत घेण्याची देखील घोषणा करण्यात आली.

फोटो स्रोत, Ravinder Singh Robin/BBC

फोटो कॅप्शन, पंजाबचे माजी मुख्यमंत्री दिवंगत प्रकाश सिंग बादल यांना दिलेला फकर-ए-कौम हा किताब परत घेण्याची देखील घोषणा करण्यात आली.

त्याचप्रमाणे त्यांना केसगढ साहिब, दमदमा साहिब, फतेहगढ साहिब आणि मुक्तसर साहिब इथं सेवा द्यावी लागणार आहे.

याव्यतिरिक्त त्यांच्या आरोग्याच्या स्थितीनुसार लंगरमध्ये एक तास अन्न शिजवण्याची आणि इतर शक्य असलेली सेवा द्यावी लागणार आहे. याशिवाय एक तास कीर्तन करावं लागणार आहे आणि सुखमणी साहिबचं पठण करावं लागणार आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

निर्णयाला पाठिंबा देणाऱ्यांना शिक्षा

याशिवाय ज्ञानी रघबीर सिंग म्हणाले की ज्यांनी या निर्णयांना पाठिंबा दिला, गप्प राहिले आणि पदं देखील मिळवली त्यांना देखील शिक्षा सुनावण्यात आली आहे.

यामध्ये बिबी जागिर कौर, प्रेम सिंग चंदूमाजरा, बिक्रम सिंग मजिठिया, सुरजीत सिंग, महेशिंदर सिंग, सरबजीत सिंग, सोहन सिंग थंदल, चरणजीत सिंग आणि आदेश प्रताप सिंग यांचा समावेश आहे.

या सर्वांना 3 डिसेंबरला दुपारी 12 ते 1 वाजेदरम्यान दरबार साहिब च्या देखरेखीखाली बाथरुमची साफसफाई करावी लागेल.

या सर्वांच्या उपस्थितीची तपासणी केली जाईल. याव्यतिरिक्त या पाच जणांना त्यांचं गाव, शहर किंवा जवळच्या गुरुद्वाऱ्यामध्ये दररोज एक तास अन्न शिजवावं लागेल, लंगरमध्ये काम करावं लागेल आणि भांडी घासावी लागणार आहेत.

जाहिरातींसाठी वापरण्यात आलेले शिरोमणी समितीचे पैसे व्याजासह परत करण्याचेही आदेश देण्यात आले होते.

जाहिरातींसाठी वापरण्यात आलेले शिरोमणी समितीचे पैसे व्याजासह परत करण्याचेही आदेश देण्यात आले होते.

फोटो स्रोत, SPGC

फोटो कॅप्शन, जाहिरातींसाठी वापरण्यात आलेले शिरोमणी समितीचे पैसे व्याजासह परत करण्याचेही आदेश देण्यात आले होते.

जथेदार म्हणाले की सुखबीर सिंग बादल, सच्चा सिंग लंगाह, गुलझार सिंग, दलजीत सिंग चीमा, भुंडर आणि गबरी यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल केली जाईल.

1 मार्च ते 30 एप्रिल दरम्यान अकाली दलाच्या सर्व कार्यकर्त्यांना एक लाख रोपं लावायची आहेत आणि त्यांची निगा राखायची आहे.

याबरोबरच जथेदार ज्ञानी रघबीर सिंग म्हणाले की माजी जथेदार ज्ञानी गुरबचन यांना देण्यात आलेल्या सर्व सुविधा काढून घेण्यात याव्यात आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भाषण देण्यास त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.

शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांना अकाल तख्तनं यापूर्वीच 'तनखैया' घोषित केलं होतं.

(तनखैया म्हणजे म्हणजे एकप्रकारची शिक्षाच असते. जेव्हा एखादी शीख व्यक्ती धार्मिकदृष्ट्या गुन्हेगार ठरलेल्या किंवा दोषी ठरलेली व्यक्ती, तिच्यावर बंधनं घातली जातात)

आज अकाल तख्तनं सुखबीर सिंग बादल यांच्या सरकारमधील मंत्र्यांना धार्मिक शिक्षा सुनावली आहे.

1 मार्च ते 30 एप्रिल दरम्यान अकाली दलाच्या सर्व कार्यकर्त्यांना एक लाख रोपं लावायची आहेत आणि त्यांची निगा राखायची आहे.

फोटो स्रोत, SPGC

फोटो कॅप्शन, 1 मार्च ते 30 एप्रिल दरम्यान अकाली दलाच्या सर्व कार्यकर्त्यांना एक लाख रोपं लावायची आहेत आणि त्यांची निगा राखायची आहे.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अकाल तख्त साहिब हे शीख समुदायाचं सर्वोच्च ठिकाण आहे. तिथे शीख समुदायातील कोणत्याही व्यक्तीला वैयक्तिक स्वरुपाच्या आणि सार्वत्रिकरीत्या केलेल्या चुका किंवा दुष्कृत्यांसाठी जाब विचारला जातो. जर ते त्यात दोषी आढळले तर अकाल तख्त त्यांना धार्मिक शिक्षा सुनावू शकतं. यालाच तनखैया म्हणतात.

2007 ते 2017 या दहा वर्षाच्या काळात अकाली दलाचं सरकार होतं. त्यांच्या कार्यकाळात शीख धर्माच्या भावना लक्षात न घेता अकाली दलानं काम केल्याचा आरोप आहे.

आजच्या कारवाईच्या दरम्यानच्या आपल्या भाषणात दमदमा साहिब तख्तचे जथेदार म्हणून ज्ञानी हरप्रीत सिंग म्हणाले की, "अकाली दलाचं सरकार आल्यामुळे शीख समाजाच्या जखमा भरून निघतील अशी आशा होती. मात्र दुर्दैवानं तसं झालं नाही."

अकाल तख्त साहिबचे जथेदार ज्ञानी रघबीर सिंग यांनी सुखबीर सिंग यांना प्रश्न विचारले. त्याचबरोबर ते म्हणाले की हा निर्णय घेत असताना त्यांच्यावर कोणताही दबाव नाही.

अकाल तख्त साहिब समोर सुखबीर सिंग बादल आणि सुखदेव सिंग धिंडसा यांनी त्यांच्या गुन्ह्यांची कबुली दिली. तिथे प्रेम सिंग चंदूमाजरा म्हणाले की त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत.

सुखबीर सिंग बादल यांना पुढील गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात आलं

- अकाली दलाच्या सरकारच्या काळात तुम्हाला सांप्रदायिक समस्यांचा वारसा मिळाला, ज्याच्यासाठी हजारो लोक शहीद झाले.

- शीख तरुणांना मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना बढती देणं आणि त्यांच्या कुटुंबियांना तिकिट देणं हा गुन्हा आहे. त्यांनी गुन्हा केला आहे की नाही. याचं उत्तर द्या, हो की नाही

- जथेदारांना घरी बोलावलं आणि त्यांना डेरा सच्चा सौदाच्या प्रमुखाला माफ करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला, हा गुन्हा तुम्ही केला आहे की नाही, याचं उत्तर द्या, हो की नाही.

- सरकारच्या कार्यकाळात गुरुचा अपमान करण्यात आला, घाणरेडे पोस्टर्स लावण्यात आले. दोषी सापडले नाहीत किंवा शोधले गेले नाहीत, त्यानंतर गुरू ग्रंथ साहिबची पुस्तकं फाडण्यात आली आणि नंतर निदर्शकांनी आग लावली, हा गुन्हा तुमच्या सरकारच्या काळात झाला.

सुखबीर सिंग यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं आहे. त्यामुळे ते व्हीलचेअरवर आले होते.

फोटो स्रोत, BBC/Ravinder Singh Robin

फोटो कॅप्शन, सुखबीर सिंग यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं आहे. त्यामुळे ते व्हीलचेअरवर आले होते.

- डेराच्या प्रमुखांना माफ करण्याच्या निर्णयाला योग्य ठरवण्यासाठी तुम्ही शिरोमणि समितीच्या पैशांचा गैरवापर जाहिरातींसाठी केला.

सुखबीर सिंग यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं आहे. त्यामुळे ते व्हीलचेअरवर आले होते.

याचबरोबर अकाली दलाचे बंडखोर नेते, ज्यांना स्वत: उपस्थित राहत तनखैया लावण्यासाठी सांगण्यात आलं होतं, ते देखील हजर होते. अकाली दलाचे हे बंडखोर नेते 2007 ते 2017 दरम्यान असणाऱ्या सरकारमध्ये होते. त्यामुळे त्यांच्यावर देखील आरोप लावण्यात आले आहेत.

याप्रकारे 2015 पासून सेवा करत असलेल्या शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या कार्यकारिणीचे तत्कालीन सदस्य आणि तख्तांचे जथेदार यांना देखील तख्त साहिबासमोर बोलवण्यात आलं होतं.

सुखबीर सिंग बादल यांना कोणते प्रश्न विचारण्यात आले?

अकाल तख्त साहिबचे जथेदार ज्ञानी रघबीर सिंग यांनी सुखबीर सिंग बादल यांना प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही मध्ये द्यायला सांगितलं.

सुखबीर सिंग बादल यांना पुढील प्रश्न विचारण्यात आले.

जथेदार - अकाली सरकारच्या काळात पंजाबमधील तरुणांना खोट्या चकमकींमध्ये शहीद करणाऱ्या क्रूर पोलीस अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली होती का?

सुखबीर सिंग बादल - हो

प्रश्न - डेरा सच्चा सौदा च्या प्रमुखांना न मागताच माफी मिळवून देणं आणि जथेदारांना तुमच्या निवासस्थानी बोलावून पत्र देण्याची चूक तुम्ही केली का?

सुखबीर सिंग बादल - हो

 ज्ञानी रघबीर सिंग म्हणाले की ज्यांनी या निर्णयांना पाठिंबा दिला, गप्प राहिले आणि पदं देखील मिळवली त्यांना देखील शिक्षा सुनावण्यात आली आहे.

फोटो स्रोत, ANI

प्रश्न - गुरू ग्रंथ साहिबच्या चित्रांची चोरी झाली, भितींवर पोस्टर लावण्यात आले, चोरी करणाऱ्यांनी चित्रं फाडले, बेहबल कलानमध्ये दोन जणांचा गोळीबारात मृत्यू झाला, हे गुन्हे घडले का?

सुखबीर सिंग बादल - हो, गुन्हे घडले

प्रश्न - डेरा सच्चा सौदाला माफी देण्याच्या निर्णयाला योग्य ठरवण्यासाठी शिरोमणी समितीला सांगून गोलकचा पोस्टर प्रिंट करण्यासाठी पैसे खर्च करण्याचा आदेश दिला का?

सुखबीर सिंग बादल - हो

चंदूमाजरा यांच्यावर लावण्यात आलेले दोन आरोप, जे त्यांनी स्वीकारले नाहीत:

अकाली नेते प्रेम सिंग चंदूमाजरा यांच्यावरील दोन आरोप

पहिला आरोप: तुम्ही डेरा सच्चा सौदाचे प्रमुक गुरमीत राम रहीम यांना माफी देण्याचं तुम्ही समर्थन केलं होतं का?

चंदूमाजरा यांनी हा आरोप स्वीकारण्यास नकार दिला. मात्र जेव्हा सिंग साहिब यांनी त्यांना वृत्तपत्राची कात्रणं दाखवली तेव्हा ते म्हणाले की त्यांनी ही वक्तव्यं दिलेली नाहीत. मात्र त्यांनी हे कबूल केलं की त्यांनी ही वक्तव्ये आधी फेटाळली देखील नव्हती.

यानंतर प्रेम सिंग चंदूमाजरा यांना संगत समोर जाण्यास आणि स्पष्टीकरण देऊन माफी मागण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर चंदूमाजरा संगत समोर गेले आणि त्यांचं स्पष्टीकरण दिली. तिथे त्यांनी आपण कोणताही गुन्हा केला नसल्याचं पुन्हा सांगितलं.

दुसरा आरोप: प्रेम सिंग चंदूमाजरा यांच्यावर दुसरा आरोप होता की ते ऑपरेशन ब्लॅक थंडरच्या वेळेस उपस्थित होते. चंदूमाजरा यांनी हा आरोप देखील स्वीकारला नाही. ते म्हणाले की ब्लॅक थंडरच्या वेळेस ते उपस्थित नव्हते.

अकाली दलाचे माजी मंत्री महेशिंदेर सिंग यांनी आरोप केला की सुरजीत सिंग बर्नाला यांचं सरकार होतं आणि प्रेम सिंग चंदूमाजारा त्यात होते आणि हा निर्णय सरकारनं घेतला होता.

मजिठिया आणि जागिर कौर कसे वाचले?

बिवी जागिर कौर आणि बिक्रम सिंग मजिठिया हे अकाली दलाच्या सरकारमध्ये मंत्री होते.

सुखबीर बादल यांच्याबरोबर दोषी ठरवण्यात आलेल्यांमध्ये अनेक मंत्री जरी असले तरी जागिर कौर आणि मजिठिया या दोघांनी स्वत:चा बचाव करताना सांगितलं की पंजाब सरकारच्या या निर्णयात ते सहभागी नव्हते.

मजिठिया यांनी अकाल तख्तासमोर मान्य केलं की अकाली सरकारच्या काळात जे घडलं त्याविरोधात त्यांनी आवाज उठवला नाही.

दलजित चीमा

दलजीत सिंग चीमा यांच्यावर आरोप होता की त्यांनी डेरा सच्चा सौदाच्या स्पष्टीकरणाचं संपादन केलं होतं आणि त्यात माफी शब्द जोडला होता. दलजीत सिंग चीमा यांनी त्यांच्यावरील आरोप नाकारले.

दलजीत सिंग चीमा यांनी त्यांच्यावरील आरोप नाकारले.

फोटो स्रोत, ANI

अकाल तख्तनं सुखबीर बादल यांना तनखैया का घोषित केलं?

यावर्षी ऑगस्ट महिन्यात अकाल तख्त साहिबचे जथेदार ज्ञानी रघबीर सिंग यांनी पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांना तनखैया घोषीत केलं होतं.

त्यावेळेस श्री अकाल तख्त साहिब च्या कार्यक्रमात बोलताना जथेदार ज्ञानी रघबीर सिंग म्हणाले होते की सुखबीर बादल जेव्हा पंजाबचे उपमुख्यमंत्री होते आणि शिरोमणि अकाली दलाचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी काही निर्णय घेतले होते. त्यामुळे तख्ताच्या प्रतिमेची मोठी हानी झाली होती.

जथेदार ज्ञानी रघबीर सिंग म्हणाले की जोपर्यंत सुखबीर सिंग बादल त्यांच्या पापासाठी शीख संगत आणि पाच सिंग साहिबांच्या उपस्थितीत श्री अकाल तख्त साहिबमधील गुरू ग्रंथ साहिब नम्रपणे माफी मागत नाहीत, तोपर्यंत श्री अकाल तख्त साहिबजी कडून त्यांना तनखैया घोषित करण्यात आलं आहे.

ऑगस्ट महिन्यात अकाल तख्त साहिबचे जथेदार ज्ञानी रघबीर सिंग यांनी पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांना तनखैया घोषीत केलं होतं.
फोटो कॅप्शन, ऑगस्ट महिन्यात अकाल तख्त साहिबचे जथेदार ज्ञानी रघबीर सिंग यांनी पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांना तनखैया घोषीत केलं होतं.

तनखैया म्हणजे काय?

तनखैया ही शीख समुदायातील धार्मिक शिक्षा असते.

शीख लेखक आणि माजी प्राध्यापक गुरदर्शन सिंग धिल्लन यांनी बीबीसीचे पत्रकार सरबजीत सिंग यांना सांगितलं, "ही एक नैतिक शिक्षा आहे. त्याचा अर्थ त्या व्यक्तीला शिक्षा करण्यात आली आहे आणि शीख पंथात त्याची अधोगती झाली आहे."

शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या वेबसाईट नुसार, शीख समुदाया विरोधातील वर्तवणुकीसाठी कर्म-धर्म म्हणून केलेली शिक्षा म्हणजे 'तनखैया'.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुरजीत सिंग बर्नाला यांना देखील 1988 मध्ये अकाल तख्त साहिबनं धार्मिक शिक्षा सुनावली होती. त्यावेळेस त्यांना गुरुद्वाऱ्यात 21 दिवस सेवा करण्यास सांगण्यात आलं होतं.

1985-87 या काळात त्यांच्या सरकारनं घेतलेल्या चुकीच्या निर्णयांसाठी त्यांना ही धार्मिक शिक्षा करण्यात आली होती.

अपमान केल्याचं प्रकरण

1 जून 2015 ला बुर्ज जवाहर सिंग वाला आणि 12 ऑक्टोबर 2015 ला बरगाडी इथं झालेल्या अपवित्र घटनांनी शिरोमणी अकाली दल आणि सुखबीर सिंग बादल यांच्या विरोधातील संतापात वाढ झाली.

1 जून 2015 ला कोटकपुरातील बुर्ज जवाहर सिंग वाला गावातील गुरूद्वारा साहिबमधून गुरू ग्रंथ साहिबच्या पुतळ्याची चोरी झाली होती.

12 ऑक्टोबर 2015 ला बरगाडी गावात गुरू ग्रंथ साहिबची पानं विखुलेली आढळली होती.

त्यानंतर 14 ऑक्टोबर 2015 ला गुरजीत सिंग आणि कृष्णा भगवान सिंग या दोन तरुणांची पोलिसांनी कथितरीत्या गोळ्या झाडून हत्या केली होती.

हे लोक बेहबल कलान आणि बरगाडीमध्ये गुरू ग्रंथ साहिबचा अपमान केल्याच्या घटनांविरोधात निदर्शनं करत होती.

या प्रकरणात देखील डेरा सच्चा सौदाचं नाव समोर आलं होतं. या प्रकरणातील प्रमुख आरोपी महेंद्र सिंग बिट्टू असल्याचा आरोप होता आणि तो डेरा सच्चा सौदा चा भक्त होता.

या घटना घडल्या तेव्हा पंजाबात शिरोमणी अकाली दलाचं सरकार होतं.

पक्षातील वरिष्ठ नेते आणि राजकीय जाणकार, पक्षाला निवडणुकीच्या राजकारणात आलेल्या अपयशाबद्दल सुखबीर सिंग बादल यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

या प्रकरणात विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत प्रकाश सिंग बादल आणि तत्कालीन गृहमंत्री सुखबीर सिंग बादल आणि राम रहिम यांच्याव्यतिरिक्त अभिनेते अक्षय कुमार यांची देखील या समितीनं चौकशी केली होती.

लोकांची तक्रार आहे की अकाली सरकार जो लोकप्रिय पक्ष असल्याचा दावा करतं, ते गुरू ग्रंथ साहिबच्या आरोपींना शिक्षा देण्यात अयशस्वी ठरले. दहाव्या गुरूंच्या आज्ञेनुसार गुरू ग्रंथ साहिबला शीख धर्मात जिवंत आणि सध्याचा गुरू असल्याचा दर्जा आहे.

दिवंगत प्रकाश सिंग बादल यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन अकाली सरकारविरोधात शीख समुदायात प्रचंड राग होता.

अकाली दलाच्या अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा का दिला?

शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी 17 नोव्हेंबरला पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे की पक्षामध्ये सुखबीर सिंग बादल यांच्याविरोधात नाराजी होती.

जुलै महिन्यात बिवी जागिर कौर आणि प्रेम सिंग चंदूमाजरा यांच्यासह अनेक वरिष्ठ अकाली नेत्यांनी श्री अकाल तख्तसमोर उपस्थित झाले होते आणि त्यांनी पक्षाच्या चुकांबद्दल माफी मागितली आणि सुखबीर सिंग बादल यांच्या पक्षाध्यक्ष पदाला आव्हान दिलं होतं, तेव्हाच पक्षातील बंड समोर आलं होतं.

अकाल तख्तचे जथेदार ज्ञानी रघबीर सिंग यांना दिलेल्या त्या माफी मागणाऱ्या पत्रात, म्हटलं होतं की 2007 ते 2017 दरम्यान पक्षाकडून असंख्य चुका करण्यात आल्या होत्या.

या पत्रात गुरूंची निंदा आणि सिरसा येथील डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहीम यांच्याबाबत

घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करण्यात आला होता.

पक्षाच्या राजकारणाला उतरती कळा

2017 च्या निवडणुकांमध्ये सत्ता गमावल्यापासून अकाली दलाची राजकीय कामगिरी घसरतच चालली आहे.

विधानसभेत पक्षाचे फक्त तीनच आमदार राहिले आहेत आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला भटिंडामधून फक्त एकच जागा जिंकता आली होती.

पक्षातील वरिष्ठ नेते आणि राजकीय जाणकार, पक्षाला निवडणुकीच्या राजकारणात आलेल्या अपयशाबद्दल सुखबीर सिंग बादल यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

या कारणांमुळे कदाचित सुखबीर सिंग बादल यांना पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला असावा.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.