गुरू नानक यांनी जेव्हा जानवं घालण्यास नकार दिला होता...

नानक यांनी शीख धर्मात हिंदू आणि इस्लाम दोन्ही धर्माच्या गुणांचा समावेश केला. पण शीख धर्म केवळ हिंदू आणि इस्लामचे संकलन नाही.
गुरू नानक हे एक मूलभूत आध्यात्मिक विचारवंत होते. त्यांनी आपल्या कल्पना एका विशिष्ट काव्यशैलीत मांडल्या. हीच शैली धर्मग्रंथ 'गुरुग्रंथ साहेब'चीही आहे.
गुरू नानक यांच्या जीवनाविषयी लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती नाही.
शीख परंपरेत त्यांच्याविषयी अधिक माहिती उपलब्ध आहे. गुरू नानक यांची शिकवण आपल्यापर्यंत जयंतीच्या माध्यमातून पोहचली आहे.
बालक नानक यांचा जन्म 1469 मध्ये लाहोरपासून 64 कि.मी. अंतरावर झाला.
नानक यांच्या जन्मानंतरची सुरुवातीची काही वर्ष विविध अंगांनी खास आहेत, असे शीख परंपरेनुसार सांगितले जाते. ईश्वर नानक यांना काहीतरी वेगळे करण्यासाठी प्रेरित केले गेले होते असेही सांगितले जाते.
नानक यांचा जन्म हिंदू कुटुंबात झाला होता. त्यांनी लहानपणीच इस्लाम आणि हिंदू धर्माचा व्यापक पद्धतीने अभ्यास सुरू केला. परिणामी, नानक यांच्याकडे लहानपणीच काव्यशैली आणि तत्त्वज्ञानाची अद्भुत क्षमता होती.

फोटो स्रोत, Getty Images
वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी बंडाचा पवित्रा घेतला अशी एक प्रसिद्ध कथा आहे. या वयात हिंदू मुलं पवित्र जानवं घालतात पण गुरू नानकांनी ते घालण्यास नकार दिला.
जानवं घालण्यापेक्षा लोकांनी आपल्या वैयक्तिक गुणांना प्रोत्साहन दिले पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते.
नानक एक विद्रोही अध्यात्मिक रेषा आखत राहिले. त्यांनी स्थानिक साधू आणि मौलवी यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. ते हिंदू आणि मुसलमान यांच्यावर समान प्रश्न उपस्थित करत होते. नानक यांचा दबाव अंतर्गत बदलांसाठी होता. त्यांना बाहेरील दिखावा पसंत नव्हता.
गुरू नानक यांनी काही काळ शास्त्री म्हणूनही काम केले होते, पण लहान वयातच त्यांनी आध्यात्मिक विषयांचा अभ्यास सुरू केला. नानक यांच्यावर आध्यात्मिक अनुभवाचा खोलवर प्रभाव पडला आणि ते निसर्गात देव शोधू लागले.
ध्यान धारणा वाढवूनच अध्यत्माच्या मार्गावर पुढे जाता येते असे त्यांचे म्हणणे होते. त्यांचा असा विश्वास होता की आपल्या जीवनशैलीच्या माध्यमातून प्रत्येक माणूस आपल्या आत ईश्वराला शोधू शकतो.
1496 मध्ये नानक यांचा विवाह झाला. त्यांचे एक कुटुंब होते. नानक यांनी भारत, तिबेट आणि अरब येथून आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात केली. हा प्रवास तब्बल 30 वर्षांपर्यंत चालला. या दरम्यान, क्रमाने गुरू नानक यांनी शीख धर्माला आकार दिला आणि उत्तम जीवनासाठी आध्यात्माची स्थापना केली.
गुरू नानक यांचा अंतिम काळ पंजाब येथील करतारपूर येथे गेला.

फोटो स्रोत, Getty Images
याच ठिकाणी त्यांनी मोठ्या संख्यने अनुयायांना शिकवण देवून आकर्षित केले. इश्वर एक आहे आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या देवापर्यंत थेट पोहचू शकते हा गुरू नानक यांचा प्रमुख संदेश होता. यासाठी रूढी, पुजारी किंवा मौलवी यांची आवश्यकता नाही असे ते सांगायचे.
गुरू नानक यांनी प्रचंड अभ्यास केला आणि सुशिक्षितांशी त्यांचा वादही झाला.
गुरू नानक यांनी जाती व्यवस्था संपुष्टात आणून क्रांतिकारी सुधारणा केली. प्रत्येक व्यक्ती समान आहे मग ती कोणत्याही जाती,धर्माची किंवा लिंगची असो ही बाब त्यांनी प्रामुख्याने या स्थापित केली.
(हा लेख मुळत: 4 नोव्हेंबर 2017 रोजी गुरू नानक जयंतीदिवशी प्रकाशित झाला होता.)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)








