सोशल मीडियावर मिळणाऱ्या डाएटबद्दलच्या सल्ल्यांवर कितपत विश्वास ठेवावा, एखादा पदार्थ खाऊन खरंच वजन कमी होतं का?

डाएट करताना महिला

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, लॉरेन पॉट्स

"तीन दिवसांत साडेचार किलो वजन कमी करायचं आहे का? एक ग्लास थंड पाणी घ्या, त्यात एक चमचा कॉफी टाका. थोडं ऑलिव्ह ऑईल टाका आणि एक चमचा चिरलेला कांदाही घाला. सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी हे प्या आणि रील्सवर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका."

ज्या व्हीडिओमध्ये हा सल्ला देण्यात आला आहे, त्याला सोशल मीडियावर 15,000 पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. काही लोक याला योग्य म्हणू शकतात.

अनेकांनी या व्हीडिओचं कौतुकही केलं आहे. तर काहींनी यावर गंभीर प्रश्नही उपस्थित केले आहेत.

सोशल मीडियाच्या जगात आपलं स्वागत आहे. जिथं लोक सकाळी पाण्यात कांदा मिसळून आपली चरबी कमी करू इच्छितात.

काय खाल्ल्यानं चरबी जळते?

एकट्या टिकटॉकवर चरबी जाळणाऱ्या (फॅट बर्न) पदार्थांबद्दल सुमारे तीन कोटी पोस्ट आहेत. पोटाची चरबी कमी करण्याचा विषय आणखी लोकप्रिय असून त्यावर सुमारे सात कोटी व्हीडिओ आहेत.

भारतात टिकटॉक नाहीये पण विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'फिटनेस इन्फ्लुएन्सर्स'ची संख्या विलक्षण आहे.

विशिष्ट आहारामुळं वजन कमी होण्याचा दावा एक रहस्य आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विशिष्ट आहारामुळं वजन कमी होण्याचा दावा एक रहस्य आहे.

2023 मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर चरबी कमी करण्याशी संबंधित कंटेंट (आशय) भरपूर आहे. आकडेवारीनुसार असे कंटेंट कोट्यवधी वेळा पाहिले गेले आहेत.

ब्रिटिश डायटेटिक असोसिएशनच्या प्रवक्त्या आयस्लिंग पिगॉट म्हणतात की, "फॅट कमी करणारा आहार हा केवळ एक समस्या निर्माण करणारा शब्द नाही आणि विशेष म्हणजे त्या शब्दाला कोणता अर्थही नाही."

सोशल मीडियावर वजन कमी करण्याशी संबंधित व्हीडिओ खूप पाहिले जातात.
फोटो कॅप्शन, सोशल मीडियावर वजन कमी करण्याशी संबंधित व्हीडिओ खूप पाहिले जातात.

जेव्हा सोशल मीडियावरील कंटेंट तयार करणारे हा दावा करतात की, एखादे विशिष्ट प्रकारचे अन्न खाल्ल्याने चरबी कमी होते, तेव्हा ते चरबी कमी करण्यासाठी अतिरिक्त कॅलरी साठवण्यासारखे आहे.

त्या स्पष्ट करतात की, फॅट बर्न करणं म्हणजे चरबीचे ऊर्जेमध्ये रूपांतर करणं आणि आपलं शरीर बहुतेक हे अनेक वेळा करतच असतं.

या गोष्टी बाजूला ठेवल्या तर वास्तव हे आहे की, सोशल मीडिया अशा प्रकारच्या व्हीडिओ आणि चर्चांनी भरलेलं आहे, जिथं लोक चरबी कमी करणाऱ्या आहाराबद्दल बोलतात.

कोणते दावे खरे नाहीत?

'फॅट बर्निंग कॉफी' नावाच्या रेसिपीमध्ये हळद, लाल मिरची आणि आले पावडर मिसळण्याचा सल्ला दिला आहे.

हा व्हीडिओ सुमारे 20 लाख वेळा पाहिला गेला आणि अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये तो वापरून पाहिल्याची चर्चा केली आहे. पण प्रश्न असा आहे की असा प्रयत्न करणं योग्य आहे का?

"तुम्ही वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास केला तर असं दिसून येतं की यामुळं थर्मोजेनेसिस (शरीराद्वारे उत्पादित उष्णता) किंवा कॅलरी बर्न करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो," असं पिगॉट म्हणतात.

सोशल मीडियावर दिलेले उपाय टाळावेत, असं मत तज्ज्ञ व्यक्त करतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सोशल मीडियावर दिलेले उपाय टाळावेत, असं मत तज्ज्ञ व्यक्त करतात.

2009 मध्ये उंदरांवर केलेल्या अभ्यासात असं आढळून आलं की, मसाले, विशेषतः मिरची, मोहरी आणि दालचिनी यांचे वजन कमी करण्यावर काही सकारात्मक परिणाम होतात.

परंतु, सकाळच्या कॉफीमध्ये मसाले टाकल्याने चरबी कमी होईल का, असा प्रश्न विचारला जात असेल, तर ती गोष्ट योग्य नाही.

पिगॉट म्हणतात, "हा फॉर्म्युला काम करणार नाही. हे तुमचे एकूण खर्च केल्या जाणाऱ्या कॅलरीमध्ये एक किंवा दोन कॅलरी वाढवू शकतो. परंतु यामुळं तुमचं वजन कमी करण्यास मदत होणार नाही."

कॅफिन कशासाठी वापरलं जातं?

पिगॉट कॅफिनबद्दलची चर्चा महत्त्वाची मानतात. हे फॅट बर्न करणारे एजंट म्हणून सांगितलं जातं. 2005 मध्ये केलेल्या एका अभ्यासात असं दिसून आलं की कॅफिनमुळे उंदरांच्या शरीरातील चरबी (बॉडी फॅट) कमी झाली.

परंतु, त्यांनी सावध केलं की कॅफिनमुळं मानवी शरीरातील चरबी कमी होते याचा कोणताही पुरावा नाही.

पिगॉट कॅफिनचा एक फायदा अवश्य सांगतात, त्या म्हणतात, "जिममध्ये व्यायाम करताना कॅफिनमुळं तुमची कामगिरी सुधारते.

याचा अर्थ असा की, जर तुम्ही कॅफीन प्यायल्यानंतर व्यायाम करत असाल तर तुम्ही जास्त ऊर्जा जाळावी आणि जास्त मसल्स तयार करावे. यामुळं तुमच्या शरीरात साठलेली चरबी कमी होऊ शकते."

"कॅफिन कार्यक्षमतेशी जोडलेले आहे, परंतु ते केवळ तुमच्या शरीरातील चरबी कमी करू शकत नाही."

कॅफिन ऊर्जा प्रदान करण्यास मदत करते, असं अभ्यासात आढळून आलं आहे.
फोटो कॅप्शन, कॅफिन ऊर्जा प्रदान करण्यास मदत करते, असं अभ्यासात आढळून आलं आहे.

सोशल मीडियावर कॅफिनशी संबंधित अनेक दावे केले जातात. दिवसातून पाच कप ग्रीन टी पिण्याची शिफारस केली जाते.

इन्स्टाग्रामवर एका यूजरने दावा केला की, यामुळं फॅट बर्न होईल. त्यानं याचं श्रेय ओझेम्पिक नेचरला दिलं आणि दावा केला की ते जीएलपी-1 तयार करेल.

हे मधुमेहाशी संबंधित औषधांच्या लोकप्रिय ब्रँडमध्ये आढळतं आणि वजन कमी करण्यासाठी लोकप्रिय आहे.

पिगॉट म्हणतात की, उंदरांवरील 2015 च्या अभ्यासात असं आढळून आलं आहे की, कॉफी पॉलीफेनॉल्स खाल्ल्यानंतर ग्लुकागॉन रिलीज वाढवते. हा एक असा हार्मोन आहे जो भूक नियंत्रणात आणि इन्सुलिन सोडण्यात भूमिका बजावतो.

परंतु पिगॉट म्हणतात की, हे मानवांमध्ये योग्यपणे सिद्ध होत नाही. कारण जीएलपी-1 ची पातळी मोठ्या प्रमाणावर अनुवांशिकतेच्या आधारावर निश्चित केली जाते.

जास्त कॅफिनचे दुष्परिणाम काय आहेत?

हे सर्व सोशल मीडिया क्रिएटर्स विज्ञानाची भाषा वापरून विश्वासार्ह दिसण्याचा आणि लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात, याचं फक्त एक उदाहरण आहे.

पिगॉट स्पष्ट करतात की, जे लोक हुशार वाटतात किंवा मोठे शब्द वापरतात त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची ही एक मानवी प्रवृत्ती आहे.

त्या म्हणतात की, लोकांनी अशा गोष्टी किंवा सरकारी डेटा फॉलो केला पाहिजे ज्यामुळं वजन कमी करण्याचा पुरावा मिळतो.

जास्त कॅफीनचा झोपेवर परिणाम होऊ शकतो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जास्त कॅफीनचा झोपेवर परिणाम होऊ शकतो.

"समस्या ही नाही की अधिकृत सल्ला काम करत नाही. त्याऐवजी आपण सोपे उपाय किंवा चमत्कारांचा शोध घेतो. त्यामुळं जेव्हा कोणी अशी पद्धत घेऊन येतो. तेव्हा आपण त्यावर विश्वास ठेवतो आणि तेच आपल्या समस्येचं उत्तर आहे, असं वाटतं," असं पिगॉट म्हणाल्या.

"आपण शोधत असलेल्या उत्तराचा हा फक्त एक भाग असू शकतो. व्यायामशाळेत जाण्यापूर्वी एक कप कॉफी प्यायल्यानं कार्यक्षमतेत मदत होते असं एखाद्याला वाटेल. पण याचा अर्थ असा नाही की, दिवसातून पाच कप कॉफी प्यायल्याने ते स्लिम होतील."

2020 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की, जास्त प्रमाणात कॅफीन प्यायल्यानं झोपेत अडथळे येतात आणि त्याचा थेट वजन वाढण्याशी संबंध जोडला जातो.

विज्ञानाचं अनुकरण का करायचं?

पिगॉट सांगतात की, सोशल मीडियावर कपमध्ये बटर किंवा लिंबू टाकून पिण्याचा सल्ला दिला जातो, परंतु याचा कोणताही फायदा होणार नाही.

सोशल मीडियावर ब्लूबेरी हे फॅट बर्निंग प्रॉडक्ट असल्याचेही म्हटलं जातं. पिगॉट म्हणतात, "ते व्हिटॅमिन सी आणि फायबरचे चांगले स्त्रोत आहेत. पण ते तुम्हाला स्लिम किंवा सडपातळ करत नाहीत. त्या फक्त ब्लूबेरीच आहेत."

ॲपल सायडर व्हिनेगर देखील फॅट बर्निंग उत्पादन म्हणून विकले जाते. परंतु हे देखील एक रहस्यच आहे.

आहारात पुरेसे फायबर असणं खूप महत्वाचं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आहारात पुरेसे फायबर असणं खूप महत्वाचं आहे.

पिगॉट म्हणतात की, व्हिनेगर वजन कमी करण्यास मदत करू शकते ही कल्पना लोकप्रिय आहे. हे किमान सन 1800 पासून प्रचलित आहे. परंतु, काही संशोधनात असं दिसून आलं आहे की, ते ग्लुकोज आणि वजन नियंत्रणात फायदेशीर ठरू शकतात. परंतु मोठ्या प्रमाणावर, उच्च-गुणवत्तेच्या संशोधनात अशी कोणतीही गोष्ट कधीही समोर आलेली नाही.

"तुम्ही योग्य प्रमाणात फायबर, प्रथिने, फळे आणि भाज्या खात असाल तर तुम्हाला यातून अधिक फायदे मिळण्याची शक्यता आहे," असं पिगॉट यांनी सांगितलं.

विज्ञानाचं पालन करणं हेच सर्वात योग्य आणि चांगलं आहे, असं पिगॉट म्हणतात.

कुठून माहिती मिळवणं चांगलं आहे?

असा व्हीडिओ सोशल मीडियावर जवळपास 70 लाख वेळा पाहिला गेला, ज्यात दावा करण्यात आला आहे की, पाण्याच्या बाटलीत चिया सीड्स मिसळून प्यायल्याने वजन कमी होते

पिगॉट सांगतात की, अशा व्हीडिओंवर विश्वास ठेवण्याऐवजी तुम्हाला आवश्यक तेवढे फायबर मिळतात की नाही याकडे लक्ष दिले पाहिजे.

योग्य आहार आणि व्यायाम करणं यासाठी कोणताही शॉर्टकट असू शकत नाही.

पिगॉट म्हणाल्या, "शेवटी, तुम्ही जितकं खात आहात तितकी ऊर्जा तुम्ही वापरत आहात की नाही हे महत्त्वाचं आहे. यामुळंच आपल्या शरीरात होणारे बदल निश्चित होतात."

"तुमची चरबी जाळण्याची उद्दिष्टं साध्य करण्यासाठी तुमच्या आहारात योग्य घटक असणं आवश्यक आहे."

यासाठी त्या दररोज किमान 30 ग्रॅम फायबर घेण्याचा सल्ला देतात. दिवसभरात तुम्ही जेव्हा जेवता तेव्हा त्यात प्रथिने असली पाहिजेत आणि त्यासोबत फळे आणि भाज्याही खाव्यात.

सोशल मीडियावरुन मिळालेली माहिती टाळण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
फोटो कॅप्शन, सोशल मीडियावरुन मिळालेली माहिती टाळण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

पिगॉट म्हणतात की, सोशल मीडियावर व्हीडिओ करणाऱ्यांना माहीत आहे की, कोणत्या कंटेंटवर अधिक व्ह्यूज किंवा लाइक्स मिळतील, त्यामुळं त्यांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं महत्त्वाचं आहे.

"ती माहिती तुम्हाला बरोबर वाटू शकते. तुम्हाला सांगणारी व्यक्ती ही माहिती तुम्हाला अशा पद्धतीने सांगेल की, ती तुम्हाला योग्यच वाटेल. परंतु, सोशल मीडियापासून अंतर ठेवून ज्यावर विश्वास ठेवला पाहिजे अशी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करा."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.