सैनिकाच्या छातीतून काढला न फुटलेला ग्रेनेड

युक्रेन

फोटो स्रोत, FACEBOOK/UKRAINE MEDICAL FORCE COMMAND

    • Author, अलेक्स बिन्ले
    • Role, बीबीसी न्यूज

युक्रेनमधील एका सैनिकाच्या छातीमधून न फुटलेलं ग्रेनेड काढण्यात आलं आहे.

युक्रेनच्या सैनिकी वैद्यकसेवेने फेसबूकवर त्याचा एक्सरे फोटो प्रसिद्ध केला आहे. या सैनिकाच्या हृदयाच्या अगदी जवळ हे ग्रेनेड असल्याचं दिसतं.

तसेच, त्याच्या छातीतून ग्रेनेड काढणाऱ्या डॉक्टरांचाही फोटो या फैसबूक पेजवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

या पोस्टमध्ये म्हटलं आहे, या शस्त्रक्रियेच्यावेळेस वैद्यक कर्मचाऱ्यांसाठी सैन्यातील 2 अभियंतेही उपस्थित होते. जखमी झालेल्या सैनिकाची तब्येत आता सुधारत असल्याचे यामध्ये लिहिले आहे. 

हे ग्रेनेड शस्त्रक्रियेच्यावेळेस कधीही फुटलं असतं, म्हणून रक्त वाहणं थांबवण्यासाठी वापरली जाणारी इलेक्ट्रोकोगुलेशन उपचारपद्धतीही वापरली नाही असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

हे ग्रेनेड त्या सैनिकाच्या छातीत कसं गेलं हे अद्याप समजलेलं नाही. पण ते VOG ग्रेनेड असल्याचं समजतंय. ते 4 सेंमी. आकाराचे असून त्याचा 400 मीटर अंतरापर्यंत मारा करता येतो.

युक्रेन

फोटो स्रोत, FACEBOOK/UKRAINE MEDICAL FORCE COMMAND

ही शस्त्रक्रिया मेजर जनरल आंद्री वर्बा यांनी केली आहे. त्यांना युक्रेनच्या लष्करातले सर्वा अनुभवी शल्यचिकित्सक मानलं जातं. 

ही शस्त्रक्रिया कोठे झाली, तो सैनिक कोठे जखमी झाला हे समजलेले नाही.

रशियाने युक्रेनवर आक्रमण करून आता जवळपास 11 महिने झाले आहेत. युक्रेनच्या पूर्व भागात रशियन सैन्यदलांना हटवण्यासाठी युक्रेनचं सैन्य अजूनही लढा देत आहे.

सोलेडार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सोलेडार

व्हॅगनर मर्सनरी ग्रुपने घोषणा केलीय की, सोलेडार या युक्रेनियन शहरावर आपण नियंत्रण मिळवलं आहे. व्हॅगनर मर्सनरी ग्रुप रशियाचा लष्कराचा पॅरामिलिट्री गट आहे. मात्र, युक्रेननं रशियाचा हा दावा फेटाळला असून, सोलेडारवर अद्याप आमचाच ताबा असल्याचा दावा युक्रेननं केलाय.

सोलेडारवर जर रशियानं ताबा मिळावला असेल, तर रणनितीच्या दृष्टीने मोठं पाऊल ठरू शकतं. कारण या शहरात मीठाच्या खाणी आहेत, ज्यामुळे आक्रमण करणार्‍या रशियन सैन्याला युक्रेनियन क्षेपणास्त्रांपासून संरक्षित सैन्य आणि उपकरणे ठेवण्याची जागा मिळेल.

सोलेडार हे बाख्मुतच्या नैऋत्येला सुमारे सहा मैलांवर आहे, जिथे रशियन सैन्य सध्या त्यांच्या हल्ल्यावर लक्ष केंद्रित करत आहेत.

सोलेडारवर नियंत्रण मिळवल्याचं नेरेटिव्ह सुद्धा रशियासाठी उपयोगाचं ठरू शकतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)