You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आता तुम्हाला किती आयकर भरावा लागेल हे मोजण्याची सोपी पद्धत
कोणत्याही अर्थसंकल्पात सगळ्यांचं लक्ष असतं ते टॅक्स - इन्कम टॅक्स मधल्या बदलांकडे. आणि आर्थिक वर्ष 2034-24 चा अर्थसंकल्प जाहीर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन कर प्रणालीत 5 मोठे बदल जाहीर केलेयत. हे बदल काय आहेत आणि याचा तुमच्यावर नेमका कसा परिणाम होणार आहे?
आतापर्यंत 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर सवलत - म्हणजे Tax Rebate मिळत होता. आता तो 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर मिळणार आहे. आता एकीकडे या टॅक्स स्लॅब्स जाहीर केल्यायत... आणि दुसरीकडे 7 लाखांपर्यंतचा रिबेट... म्हणजे नक्की काय...
म्हणजे ज्यांचं उत्पन्न 7 लाख आहे, त्यांचे पहिले 3 लाख कोणताही कर नाही - कारण टॅक्स स्लॅबनुसार 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही - शून्य टक्के
पुढचा टॅक्स स्लॅब - 3 ते 6 लाख... यावर कर 5 टक्के... म्हणजे 3 लाखांवर 5% - 15 हजार कर भरावा लागेल.
आता राहिले 7 लाखांमधले शेवटचे 1 लाख... त्यावर 6 ते 9 लाखांच्या स्लॅबनुसार 10% कर... म्हणजे 10 हजार रुपये कर भरावा लागेल.
म्हणजे तुमचं उत्पन्न जर 7 लाख रुपये असेल तर त्यावर 25 हजार रुपये टॅक्स बसेल...
पण नवीन टॅक्स प्रणालीतल्या बदलानुसार 87A सेक्शनखाली रिबेट मिळू शकतो 25 हजारांचा.
म्हणूनच 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नाला कर नाही.
टॅक्स स्लॅब्स
जुन्या टॅक्स प्रणालीत कोणताही बदल नाही. हे सगळे बदल नवीन कर प्रणाली - म्हणजे New Tax Regime मध्ये करण्यात आले आहेत. यात आता 5 टॅक्स स्लॅब्स असतील.
नवीन टॅक्स प्रणाली आता डिफॉल्ट पद्धत म्हणजे सरसकट कर मापन पद्धत असणार आहे. पण तुम्हाला नवीन प्रणालीने कर भरायचा आहे की जुन्या प्रणालीने हे तुम्हाला ठरवता येईल.
शिवाय स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 50 हजारांवरून वाढवून आता 52,500 रुपयांवर नेण्यात आलीय.
लीव्ह एनकॅशमेंटवर सवलत
बिगर सरकारी नोकरीत असणारे जे कर्मचारी असतात त्यांना निवृत्तीच्या वेळी उरलेल्या रजा एनकॅश करून घेता येतात. आतापर्यंत या लीव्ह एनकॅशनमेंटवर 3 लाखांची कर सवलत होती. ही मर्यादा वाढवून आता थेट 25 लाख करण्यात आली आहे.
सर्वोच्च दरात कपात
चालू आर्थिक वर्षात सर्वाधिक टॅक्स लागतो तो 42.74% दराने. नवीन कर प्रणालीतल्या बदलाने आता सरचार्ज धरून सर्वाधिक टॅक्स असेल 39%.
शिवाय करदात्याने दाखल केलेला परतावा म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न प्रोसेस करण्याचा कालावधी 93 दिवसांवरून 16 दिवसांवर आल्याचंही अर्थमंत्र्यांनी जाहीर केलंय.
आणि समजा तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुमच्या उत्पन्न आणि गुंतवणुकीनुसार तुमच्यासाठी चांगली कर प्रणाली कोणती? जुनी की नवी?
तर त्याचंही उत्तर सोपं आहे.
https://incometaxindia.gov.in/ या वेबसाईटवर जा.
इथे टॅक्स टूल्स या पर्यायात तुम्हाला टॅक्स कॅलक्युलेटर मिळेल.
https://incometaxindia.gov.in/pages/tools/tax-calculator.aspx
यामध्ये तुमचा तपशील भरा, जुनी की नवीन प्रणाली ते निवडा. यामध्ये तुम्हाला दोन्ही प्रकारांमध्ये किती कर भरावा लागेल याचा अंदाज बांधता येईल.
आणि यानुसार तुम्ही ठरवू शकता की नवीन प्रणालीने कर भरायचा की जुन्या. हो, शिवाय तुम्ही तज्ज्ञांची मदत घेऊनही हा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)