अलेक्साच्या मदतीने सहा वर्षांच्या मुलीने दोनदा वाचवला आईचा जीव

फोटो स्रोत, Getty Images
अॅलेक्सा यंत्राच्या साहाय्याने दोनदा हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेल्या आईचा जीव सहा वर्षांच्या मुलीने वाचवला. या मुलीच्या आईनेच यासंदर्भात माहिती दिली.
ग्लासगो, स्कॉटलंड इथल्या एमा अँडरसन यांना 15 वर्षांची असताना हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी नावाच्या हृदयविकाराचे निदान झालं.
एमा यांची मुलगी डार्सीला लहानपणापासूनच माहित होतं की, आईला हृदयाशी संबंधित आजार आहे.
आपत्कालीन परिस्थितीत मदत मागण्यासाठी अलेक्सा उपकरणाचा वापर कसा करायचा हे डार्सीला अगदी लहान वयात शिकवले गेलं.
आईची तब्येत बरी नाही हे लक्षात आल्यावर डार्सीने आतापर्यंत दोनदा अलेक्साचा वापर करत मदत मागवली आहे. एमा 27वर्षांच्या आहेत.
माझ्याकडे अलेक्सामध्ये एक सेटिंग आहे. जर मला बरे वाटत नसेल, परिस्थिती आणखी बिघडली तर मी ताबडतोब 'अलेक्सा, मदतीसाठी विचारा' असे म्हणतो आणि मुलीला माहिती मिळते.
जे शिकलं ते आचरणात आणलं
एमा यांनी सांगितलं की, अलेक्सा कसं वापरायचं हे शिकवल्यानंतर डार्सीने दोनदा त्याचा योग्य उपयोग करुन घेतला'. डार्सीने दोनदा अलेक्सा वापरलं. एका क्षणी तिने स्वत: अॅम्ब्युलन्स देखील बोलावली.
त्यावेळी माझी तब्येत खूपच बिघडली होती. मला तिचा खूप अभिमान वाटतो, ती एक लहानगी सुपरस्टारच आहे असं एमा सांगतात.
बीबीसी स्कॉटलंडच्या गुड मॉर्निंग स्कॉटलंड कार्यक्रमात एमा बोलत होत्या.

फोटो स्रोत, ema anderson
हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथीमुळे हृदयाचे स्नायू धोकादायकपणे जाड होतात. त्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणे कठीण होते.
समस्या उद्भवल्यापासून एमा औषधोपचारांच्या बळावर आरोग्य जपत आहेत. एकदा त्या तपासणीसाठी गेल्या तेव्हा डॉक्टरांनी ताकीद दिली की तिला तातडीने हृदय प्रत्यारोपणाची गरज आहे, अन्यथा तुमच्या जीवाला धोका आहे.
"मी नेहमीप्रमाणे तपासणीसाठी गेलो होते. पण डॉक्टरांनी सांगितले की माझे हृदय खूप कमकुवत झालं आहे. थांबायला वेळ नाही. लगेच माझे नाव आपात्कालीन सूचीत टाकण्यात आलं.
काही महिन्यांतच माझे हृदय पूर्णपणे निकामी झालं. एका बलून पंपाने माझे हृदय धडधडत ठेवले आणि हृदय प्रत्यारोपण होईपर्यंत मला जिवंत ठेवण्यात आलं. 10 दिवसांनंतर, रक्तदात्याचे हृदय उपलब्ध असल्याचा कॉल आला असं एमा यांनी सांगितलं.
हृदय प्रत्यारोपणाने संजीवनी

फोटो स्रोत, Getty Images
एप्रिल 2022 मध्ये, एमा अँडरसन यांचं स्कॉटलंडमधल्या क्लाइडबँक इथल्या गोल्डन ज्युबिली हॉस्पिटलमध्ये हृदय प्रत्यारोपण करण्यात आलं.
जेव्हा त्यांना पहिल्यांदा हृदयाची समस्या असल्याचे निदान झालं तेव्हा त्यांच्या छातीत अंतर्गत डिफिब्रिलेटर रोपण करण्यात आले.
त्यांनी सांगितलं की हृदय प्रत्यारोपणाने त्यांचं आयुष्य बदलून गेलं आणि ती जुलै 2022 मध्ये त्यांनी साथीदार कॉनरशी लग्न केलं.
"हृदय प्रत्यारोपणापासून माझे आयुष्य अगदी नवीन वाटत आहे. मी शाळेत जाते आणि डार्सीला घरी आणते. पूर्वी मी हे करू शकत नव्हते. पूर्वी फार साध्या गोष्टी करू शकत नव्हते. आता मी हे करू शकते," त्या म्हणाल्या..
स्कॉटलंडमधल्या 28,000 लोकांना हृदयविकाराचा त्रास आहे. ब्रिटिश जर्नल ऑफ कार्डिओलॉजीनुसार, 'हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी' ही त्यापैकी सर्वात सामान्य समस्या आहे.
'त्या दात्याचे आयुष्यभर ऋणी'
एमा सांगतात की, हृदय दाता आणि रक्तदात्याच्या कुटुंबाची मी आयुष्यभर ऋणी असेन.
"हृदय प्रत्यारोपण सोपे नाही. खूप अवघड काम. मी अनेक दिवस लाइफ सपोर्ट सिस्टमवर अवलंबून होते. ऑपरेशननंतर बरेच दिवस इतर उपचारही करण्यात आले. माझे स्नायू खूप झिजले आहेत. मला चालताही येत नव्हतं.
माझ्या लग्नाच्या एक आठवडा आधी मला डिस्चार्ज मिळाला होता. पुन्हा चालायला शिकले. मी माझ्या लग्नाला स्वतःला चालत जाऊ शकले. तेव्हाही माझ्या अंगावर टाके पडले होते,” त्या सांगतात.
हॉस्पिटलमध्ये बरं होत असताना, त्यांनी वेगवेगळ्या टप्प्यांवर फोटो काढले आणि टॉम वॉकरच्या 'द बेस्ट यट टू कम' या गाण्यासोबत टिक टॉक व्हिडिओ बनवला.

फोटो स्रोत, EMMA ANDERSON
टॉम वॉकरने जेव्हा एमा यांनी बनवलेला व्हिडिओ पाहिला तेव्हा तो हेलावला. त्यानेच एमा यांना लंडनला बोलावलं.
"टॉमने माझ्याशी संपर्क साधला. त्याने लंडनला यायला सांगितले. त्याने मला तो बनवत असलेल्या व्हिडिओचा भाग होण्यास सांगितले," त्या सांगतात.
एमा म्हणाली की ज्या कुटुंबाने हृदय दान केलं त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत.
त्यांचं हृदय प्रत्यारोपण झालेल्या रुग्णालयाचे संचालक गॉर्डन जेम्स म्हणाले, "राष्ट्रीय आरोग्य सेवेला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. "एमा यांची कहाणी प्रेरणादायी आहे आणि आरोग्यसेवा क्षेत्रात या सेवा किती महत्त्वाच्या आहेत हे दर्शवतं."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








