समुद्र घानाचा, मक्तेदारी चीनची आणि विरोध करणारा होतो लगेच गायब

घाना बोट

फोटो स्रोत, EJF

    • Author, जॉर्ज व्राईट आणि थॉमस नादी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

घानाच्या सागरी किनाऱ्यावर चीनी बोटींमार्फत मासेमारी चालते. पण, ते करत असताना चिनी आणि घानाच्या अधिकाऱ्यांकडून मासेमारांचा अतोनात छळ केला जात आहे. मुलभूत नागरी सुविधा आणि मानवीहक्कांची तिथं पायमल्ली होत असल्याचं उघड झालं आहे.

घानामध्ये मासे पकडणाऱ्या चीनच्या बोटींवर काय होतं ते त्साई क्वेकू यांना माहिती आहे.

त्याने चीनच्या सैनिकांना स्थानिक मासेमारांना गुलामासारखं वागवताना पाहिलं आहे.

ते सांगतात, “हे सैनिक त्यांना मारायचे, त्यांच्यावर थुंकायचे. मी सुद्धा या आधी हे भोगलं आहे.”

क्वेकू हे बोटीवरचे अधिकारी म्हणून काम करतात. ते तिथल्या लोकांचे आणि सामग्रीचे प्रमुख आहेत. त्यांचा असा दावा आहे की, त्यांन तीन दिवस झोप न घेता काम करायला लावलं. त्यांना नीट खायला दिलं नाही आणि घाणेरडं पाणी प्यायला लावलं.

त्याच्या काही सहकाऱ्यांचं नशीब यापेक्षाही खराब होतं. ते सांगतात.

क्वेकू म्हणतात की, त्यांच्या एका सहकाऱ्याला बोटीवर असताना कॉलरा झाला, पण उपचारासाठी बोट किनाऱ्यावर आणण्यासाठी त्याने नकार दिलाा. त्याचा जीव गेला.

असंच एकदा बोटीवर आग लागली आणि त्याचा एक सहकारी होरपळून गेला. आणखी एका सहकाऱ्याचा अशाच अपघातात मृत्यू झाला. यापैकी कोणीही बचावलं नाही आणि त्यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाईसुद्धा मिळाली नाही, ते सांगतात.

घानाच्या किनाऱ्यावर असणाऱ्या बोटीत जो छळ होतो त्याची ही प्रातिनिधिक उदाहरणं आहेत.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

UK मध्ये असलेल्या Environment Justice Foundation च्या मते घानामध्ये असलेल्या 90 टक्के व्यावसायिक बोटी चीन ने घेतल्या आहेत. त्यासाठी त्यांनी या संदर्भातल्या घानाच्या कायद्याचा भंग केला आहे.

या बोटींपैकी 90 टक्के बोटींमध्ये बेकायदेशीर कामं चालतात.

नुकत्याच आलेल्या EJF च्या अहवालानुसार घानामध्ये बेकायदा मासेमारी चालते. तसंच चीन तिथल्या लोकांचा छळ करतं असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

EJF ने 36 मासेमारांशी संवाद साधला. त्यांना दिवसाचे 14 तास काम करायला लावतात आणि त्यांना पुरेसं खायला मिळत नाही.

त्यापैकी 94 टक्के लोकांना पुरेसी औषधं मिळत नाहीत आणि त्यांना मौखिक अत्याचारांचा सामना करावा लागतो.

86 टक्के मासेमारांना राहण्याच्या योग्य सोयीसुविधा नाहीत. 81टक्के मासेमारांना शारीरिक छळाला सामोरं जावं लागलं, 75 टक्के मासेमारांना समुद्रात असताना गंभीर जखमा झाल्या.

मात्र चीनच्या दुतावासाने सांगितलं की, ते अतिशय जबाबादारीने मासेमारी करतात.

“आम्ही नेहमीच आंतरराष्ट्रीय समुदायाच्या मदतीने बेकायदा मासेमारीवर निर्बंध घातले आहेत,” असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.

घानामध्ये असलेल्या चीनच्या बोटीत आठ महिन्यांपूर्वी एक मोठी दुर्घटना झाली होती.

6 मे रोजीा MV Comforter 2 वादळी स्थितीत बुडाली. तेव्हा बोटीवर 14 लोक उपस्थित होते. त्यातील 11 लोक बेपत्ता आहेत. ते मृत आहेत असं गृहित धरण्यात आलं. त्यात प्रशासनाने नियुक्त केलेल्या एका निरीक्षकाचाही समावेश होता. चीनी कॅप्टनचा मृतदेहही सापडला होता.

या घटनेत एक जण बचावला. मायकेल (नाव बदललं आहे.) ने त्या दिवशीचा घटनाक्रम कथन केला.

त्या दिवशी जोरदार वादळ आलं होतं. तरीसुद्धा बोटीत अतिरिक्त मासे वाहून नेण्याचा आदेश चीनच्या लोकांनी दिला. त्यादिवशी बोटीवर आधीच खूप मासे होते. बोटीचा ताबा गेला, अतिरिक्त वजनाने बोट बुडाली.

इजेफ

फोटो स्रोत, EJF

मायकेल आणि इतर नऊ लोकांनी तरंगणाऱ्या ड्रमचा आधार घेऊन स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला, नंतर मासेमारांनी त्यांना पाहिलं.

“ती अगदी काळरात्र होती. आम्ही जिवंत राहू की नाही याची शाश्वती नव्हती,” ते सांगतात.

मायकेल अजूनही या धक्क्यातून शारीरिक आणि मानसिक पातळीवर सावरलेला नाही. तो सांगतो की बोटीच्या मालकाने त्याला कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही.

“मी अतिशय वैतागलो आहे. कंपनी आम्हाला नुसती कारणं सांगते. कधी कधी माझं संपूर्ण शरीर दुखतं. मला उपचारांची गरज आहे. पण माझ्याकडे त्यासाठी पैसे नाहीत,” ते सांगतात.

या बोटीचा नक्की मालक कोण होता हे सांगणं अतिशय कठीण आहे.

घानाच्या झेंड्याखाली अशा पद्धतीने परदेशी बोटींनी येणं हे बेकायदेशीर आहे. मात्र काही घानाच्याच कंपन्यांच्या मदतीने चीनच्या कंपन्या घानामध्ये आल्या आहेत.

घाना
फोटो कॅप्शन, मायकेल अजून या धक्क्यातून सावरलेला नाही

2018 पासून घानाने व्यावसायिक बोटींवर निरीक्षक नेमले आहेत. बेकायदा बोटिंगची माहिती घेणे, त्याचा डेटा गोळा करणं आणि समुद्रकिनारी होणाऱ्या बेकायदेशीर गोष्टींची माहिती देणं हे त्यांचं काम आहे.

इम्यूनेल इसियन हा असाच एक निरीक्षक आहे. त्याच्या कामात तो अतिशय चोख आहे. मात्र त्याच्याच फटका बसला. त्याचं एका चिनी नागरिकाशी भांडण झालं. तो एका बेकायदा बोटीचं शूटिंग करत होता. बोटीतले लोक तेव्हा मासे समुद्रात फेकत होते, असं त्याचा भाऊ जेमस एसिअन म्हणाला.

इम्यूनेलने त्याचा अंतिम अहवाल 24 जून 2019 ला दिला होता. त्याची एक कॉपी बीबीसीकडे आली आहे. त्यात त्याने बेकायदेशीर मासेमारीवर बोट ठेवलं आहे आणि पोलिसांना कारवाई करण्याची विनंती केली आहे.

5 जुलैला तो बेपत्ता झाला.

जेम्स म्हणतो की त्याच्या भावाने इतर सहकाऱ्यांबरोबर जेवण केलं आणि झोपायला गेला. तेव्हापासून तो दिसलेला नाही.

तीन वर्ष झाले तरी तो कुठे आहे या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. पोलीस चौकशीत हिंसाचाराची कोणतीही लक्षणं दिसून आली नाहीत.

मला सत्य काय हे जाणून घ्यायचं आहे, असं जेम्सने बीबीसीला सांगितलं.

मासेमारी कंपनीकडे आम्ही प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

घाना

फोटो स्रोत, James Essien

फोटो कॅप्शन, इम्यूनेल 2019 पासून बेपत्ता आहेत.

घाना सोडलेल्या एका निरीक्षकाने बीबीसीशी संवाद साधला. समुद्रात चालू असलेल्या बेकायदा गोष्टींची माहिती दिल्याबदद्ल त्याला मंत्रालयाकडून बोलावणं आलं.

अधिकाऱ्यांनी त्याला पुरावे सादर करायला सांगितले. त्यानंतर हे सगळे पुरावे फोन मधून डिलिट करायला सांगितले. पण त्याच्याकडे लॅपटॉपवर हे पुरावे होतो आणि त्याने ते सगळं सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली.

त्यानंतर त्यांना सातत्याने धमक्या येण्यास सुरुवात झाली.

एका क्षणी ते इतके घाबरले होते की ते स्वत:च्या घरी सुद्धा रहायचे नाही. आपल्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होतंय याचीच त्यांना सतत भीती वाटायची.

एकदा तो सायकल चालवत असताना घानाच्याच एका अधिकाऱ्याने त्याला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे त्यांनी हा व्यवसाय सोडण्याचा निश्चय केला.

“मी जेव्हा किनाऱ्यावर जायचो तेव्हा सगळे लोक माझ्याकडे पाहायचे. मला तेव्हा काहीही काम मिळायचं नाही. मी अनोळखी व्यक्ती झालो होतो. मी एखादा वाईट व्यक्ती आहे असं चित्र निर्माण केलं. ते दिवस माझ्यासाठी अतिशय कठीण होते.”

घाना

फोटो स्रोत, BRIGHT TSAI KWEKU

स्टीव्ह ट्रेंट EJF चे प्रमुख आहेत. त्यांच्यामते चीनने अनेक देशात बोटी घेतल्यात आणि तिथे ते कायदा नेहमीच मोडतात. पण घानामध्ये ही समस्या आणखी गंभीर आहे.

“बहुतांश वेळेला बोटीचा कॅप्टन चीन आणि इतर सदस्य घानाचे असतात. मात्र जास्त नफा कमावण्याच्या नादात हे लोक हिंस्त्र होतात.

EJF या संस्थेने अनेकदा भ्रष्टाचार समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते प्रत्येक पातळीवर अतिशय भ्रष्टाचार आहे.

या सगळ्या प्रकाराविरुद्ध अनेकदा कारवाया झाल्या आहेत. मात्र बऱ्याच गोष्टी करणं अद्याप बाकी आहे.

आम्ही या संबंधी घाना सरकारची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

क्वेकू यांच्या मानसिक आरोग्यावर या सगळ्या प्रकारामुळे परिणाम झाला आहे. अनेक मासेमार मेलेत पण त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. अनेक निरीक्षकही बेपत्ता आहेत. त्यांचाही माग लागलेला नाही.

“आम्हाला समुद्रात जायची प्रचंड भीती वाटते पण जमिनीवर काम नाही त्यामुळे समुद्रावर जाण्याशिवाय पर्याय नाही.” असं ते म्हणतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)