चंद्रयान 3 सारख्या मोहिमांची 'अचूक वेळ' नेमकी कशी ठरवली जाते?

चांद्रयान

फोटो स्रोत, TWITTER/ISRO

    • Author, श्रीकांत बक्षी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

चंद्रयान-3 लँडर लवकरच चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ 70 अक्षांशावर उतरेल. भारतीय वेळेनुसार, इस्रो 23 ऑगस्टच्या संध्याकाळी 5 वाजल्यानंतर चंद्रयान-3 लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावर पाठवण्याची तयारी करत आहे.

14 जुलै रोजी श्रीहरीकोटा येथून उड्डाण केलेलं चंद्रयान-3 हे 40 दिवसांच्या दीर्घ प्रवासानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी सज्ज झालं आहे.

14 जुलै रोजी दुपारी 2:35 वाजता चंद्रयानाचं प्रक्षेपण झालं. ही तारीख इस्रोचे अध्यक्ष एस. स्वामीनाथ यांनी आधीच जाहीर केली होती.

पण हाच दिवस चांद्रयान मोहिमेसाठी निवडण्याचं कारण काय?

जूनच्या शेवटच्या आठवड्यात इस्रोच्या अध्यक्षांनी चंद्रयान प्रक्षेपणाबद्दल माहिती दिली होती. चंद्रयान प्रक्षेपण 13 जुलै ते 19 जुलै दरम्यान होणार असल्याची घोषणा त्यावेळी करण्यात आली.

त्यानंतर, चंद्रयान 14 जुलै रोजी दुपारी 2:35 वाजता लॉन्च होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.

या 'मुहूर्ता'ला चंद्रयान मोहिमेत विशेष महत्त्व आहे. हा मुहूर्त टळला तर चांद्रयान मोहिमेस आणखी एक महिला लागू शकला असता, हे तुम्हाला माहिती आहे का?

पृथ्वीवरील प्रवास आणि अवकाशातील प्रवास यात फरक

आपल्याला पृथ्वीवरील दोन ठिकाणांदरम्यान प्रवास करायचा असल्यास आपण कोणत्या गोष्टींचा विचार करतो?

उदाहरणार्थ, तुम्ही पुण्यावरून मुंबईला रस्तेमार्गाने जाणार असाल तर तुम्ही काय कराल?

पुण्यातून कोणत्या तरी वाहनाने मुंबईच्या दिशेने तुम्ही रवाना व्हाल. तुम्ही मुंबईला किती वेळात पोहोचाल, हे तुमच्या वाहनाच्या वेगावर अवलंबून असेल.

म्हणजे, तुम्ही किती वेगाने जा आणि किती लांब जायचं, हे तुमच्या हातात आहे.

पण, पुन्हा विचार करा, एखादी व्यक्ती पुण्याहून मुंबईला जात असलेल्या बसमधून प्रवास करत होती.

त्याचवेळी तुम्हीसुद्धा तुमच्या कारने निघालात पण वेगाने वाहन चालवल्यास तुम्ही त्या व्यक्तीपेक्षा लवकर मुंबईला पोहोचाल. पण हे झालं जमिनीवरील प्रवासाबाबत.

चांद्रयान

फोटो स्रोत, NASA/TWITTER

पण अंतराळ प्रवासात फरक असतो. अंतराळ प्रवास म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करून वर जाणे.

उपग्रह अवकाशात सोडणारे रॉकेट्स, प्रक्षेपण पॅडवरून आकाशात गोलाकार मार्ग घेतात आणि त्यांना एका विशिष्ट कक्षेत सोडतात.

गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी आपल्याला स्थिर वाटते. पण पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असते. त्याचप्रमाणे, चंद्रही पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो. म्हणजे दोन्ही गोष्टी स्थिर नाहीत. त्या नेहमी आपली जागा बदलत असतात.

त्यामुळे, गुरुत्वाकर्षणाची कक्षा ओलांडून प्रवास करण्यासाठी काही गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात.

उदा. चंद्रयान-३ 23 ऑगस्टला चंद्रावर पोहोचणार असेल तर, त्याला आधीपासूनच प्रवास सुरू करावा लागेल जेणेकरून तो पोहोचेल हे स्थान विचारात घेऊन त्या ठिकाणी पोहोचावं लागतं.

चांद्रयान

फोटो स्रोत, NASA

अंतराळात पृथ्वीवरून पृथ्वीच्या कक्षेत जाताना काही अटी विचारात घ्याव्या लागतात. म्हणजे, प्रक्षेपण तारखेला हवामानाच्या परिस्थितीसोबतच सौरमालेतील पृथ्वीची स्थिती आणि चंद्राची स्थिती खगोलीय अंतरांच्या आधारे मोजण्यात येते.

चंद्रयान 3, जे पृथ्वीभोवती फिरतं आणि हळूहळू त्याचा आणि हळूहळू त्याचे अपोजी वाढते.... पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या पलीकडे चंद्राच्या दिशेने प्रवास केव्हा सुरू करायचा हे देखील चंद्राची स्थिती निर्धारित करते.

एक दिवस उशीर झाला तरी महिनाभराची प्रतीक्षा

इस्रोचे चेअरमन एस. सोमनाथ यांनी म्हटलं, “14 जुलै रोजी आकाशात झेपावणारे चंद्रयान 3 परिस्थितीनुसार 23 ऑगस्ट किंवा 24 ऑगस्ट रोजी लँडरचे प्रक्षेपण करेल. चंद्रावर उतरण्यासाठी परिस्थिती योग्य असेल तरच ते 23 ऑगस्टला उतरण्याचा प्रयत्न करतील, अन्यथा ते आणखी एका महिन्यानंतर उतरण्याचा प्रयत्न करतील.”

चंद्रावर लँडर पाठवायला एक दिवस जरी उशीर झाला, तर ते अपेक्षित दिवशी तिथे पोहोचू शकणार नाही. चंद्राच्या प्रवासाच्या टप्प्यांचा विचार करूनच लँडर त्यावर उतरवण्याचं नियोजन करावं लागेल.

चांद्रयान

फोटो स्रोत, ISRO

याचं प्रमुख कारण म्हणजे, चंद्रावर उतरणाऱ्या आणि संशोधन करणाऱ्या लँडर आणि रोव्हर मॉड्यूलला काम करण्यासाठी वीज लागते. लँडर आणि रोव्हर्स ही वीज फक्त सोलर पॅनेलमधून मिळवू शकतात. म्हणजे लँडर उतरेपर्यंत सूर्यप्रकाशाची गरज भासते. यामुळेच त्यांचं लँडिंग चंद्रावर दिवसाच्या प्रकाशाच्या वेळी झाले पाहिजे.

चंद्रावरील एक दिवस हा पृथ्वीवरच्या 29 दिवसांइतका असतो. तर पृथ्वीवरील एक दिवस हा दिवस आणि रात्र यांच्यासोबत 24 तासांचा असतो.

चंद्र हा स्वयंप्रकाशित नाही. जेव्हा सूर्यप्रकाश चंद्रावर पडतो तेव्हा प्रकाश परावर्तित होतो आणि चंद्र आपल्याला तेजस्वी दिसतो.

चंद्रावर 14 दिवस फक्त सूर्यप्रकाश मिळतो. तर इतर 14 दिवस तिथे अंधार असतो.

पण, आपण पाठवत असलेल्या चांद्रयानातील लँडर आणि रोव्हर्सना सौर ऊर्जेची गरज असल्याने त्यासाठी हे सूर्यप्रकाशाचे दिवस महत्त्वाचे ठरतात.

चांद्रयान

फोटो स्रोत, ESA

या कारणांमुळेच, चंद्रयान 2 आणि चांद्रयान 3 मार्फत पाठवलेल्या लँडर आणि रोव्हर्सचं आयुष्य केवळ 14 दिवस असल्याचे इस्रोने म्हटलं आहे.

चंद्रयान 3 लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. त्या भागात 24 ऑगस्टपासून दिवसाचा प्रकाश सुरू होईल. त्यामुळे, त्या दिवशी लँडिंग झालं तर तिथून लँडर तेथे पडणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या आधारे जास्तीत जास्त 14 दिवस काम करू शकेल.

अशा स्थितीत एक दिवस जरी त्याला उशीर झाला तरी लँडरच्या कामाची शक्यता एका दिवसाने कमी होईल.

चांद्रयान

फोटो स्रोत, ISRO

615 कोटी रुपयांच्या चांद्रयान प्रयोगात आपल्याला चंद्रावर संशोधन करण्यासाठी प्रत्येक क्षण मोलाचा आहे.

त्यामुळेच जर 24 ऑगस्टला लँडिंग शक्य नसेल, तर चंद्रावर पुन्हा दिवस सुरू होईपर्यंत आणखी महिनाभर वाट पाहावी लागेल, म्हणजेच 23 सप्टेंबरला उतरण्याचं नियोजन करावं लागेल, असं इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितलं आहे.

सूर्यप्रकाशाचं महत्त्व

चंद्रयान 3 प्रक्षेपणात लँडर आणि रोव्हर्सने जास्तीत जास्त वेळ काम करावं, यासाठी ते चंद्रावर दीर्घकाळ सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी उतरवावं लागेल.

जर चंद्रयान 3 हे 24 ऑगस्टपर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर 100 किमी उंचीवर उतरणार असेल तर त्यानुसार रॉकेट पृथ्वीवरून निघण्याची वेळदेखील खगोलशास्त्रीयदृष्ट्या निश्चित केली पाहिजे.

अशाप्रकारे, चंद्रयान सारख्या प्रयोगांसाठी प्रक्षेपणाची वेळ ही खगोलशास्त्रीय नियम, पृथ्वी, चंद्राच्या हालचाली यांचा विचार करूनच ठरवण्यात येत असते. तेव्हाच या प्रयोगाचा मुहूर्त निश्चित होतो.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)