National Technology Day 2022 : पोखरण-2 अणू चाचणीनंतर जेव्हा जगभरात खळबळ माजली होती

फोटो स्रोत, PTI
11 मे 1998चा तो दिवस. राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातल्या पोखरण शहरात भारताने दुसऱ्यांदा अणुचाचण्या केल्या, आणि संपूर्ण जगात खळबळ माजली.
इंदिरा गांधी यांनी सर्वांत प्रथम 1974 साली अणुचाचणी घेतली होती. या फाईल फोटोमध्ये 1974 ची चाचणी झाली ते थार वाळवंटातलं ठिकाण दिसतंय. चाचणीमुळे तिथे एक मोठा खड्डा तयार झाला होता.

फोटो स्रोत, PTI
1998 साली भारताने एकूण पाच चाचण्या केल्या होत्या.
11 मे रोजी पोखरणमध्ये तीन अणू चाचण्या झाल्या. सगळ्या जगाला आश्चर्याचा धक्काच बसला. मग दोन दिवसांनी 13 मे राजी आणखी दोन चाचण्या केल्या. सरकारने उपलब्ध करून दिलेल्या छायाचित्रांमध्ये थार इथे झालेल्या एका चाचणीचा हा फोटो आहे.

फोटो स्रोत, PTI

फोटो स्रोत, Twitter / @SpokespersonMoD
चाचण्यांच्या काही दिवसांनंतर भारत सरकारने 17 मे 1998 ला काही व्हीडिओ प्रसिद्धा केले होते. जेव्हा गुप्तपणे परीक्षण केलं गेलं तेव्हाची ही काही छायाचित्रं आहेत. ही छायाचित्रं दिल्लीत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दाखवली गेली होती.

फोटो स्रोत, PTI
चाचण्यानंतर पत्रकार परिषदेत व्हिक्टरी म्हणजेच विजयी भावमुद्रा दाखवताना भाभा अटोमिक रिसर्च सेंटरचे (BARC) तत्कालीन संचालक संथानम, अणूउर्जा विभागाचे अध्यक्ष आर. चिदंबरम आणि पंतप्रधानांचे तत्कालीन वैज्ञानिक सल्लागार ए.पी.जे अब्दुल कलाम.

फोटो स्रोत, PTI
पोखरण अणू चाचण्यांनंतर आर. चिदंबरम आणि कलाम यांनी 17 मे 1998 ला झालेल्या एका पत्रकार परिषदेत या चाचण्यांची माहिती दिली.

फोटो स्रोत, PTI
भारताने केलेल्या अणुचाचण्यांच्या बातम्या दुसऱ्या दिवशी सगळीकडे पहिल्या पानावर होत्या. नवी दिल्लीतील एक गृहस्थ हीच बातमी वाचताना.

फोटो स्रोत, PTI
या अणू चाचण्यांनंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 20 मे ला पोखरणला भेट दिली होती. त्यांच्या येण्याआधी उपकरणांची तपासणी करताना भारतीय सैनिक.

फोटो स्रोत, PTI
या अणुचाचण्यांसाठी भारतावर आंतरराष्ट्रीय पातळीवर टीका झाली होती.

फोटो स्रोत, PTI
पण अणू चाचण्यांमुळे तिथल्या इमारतींना तडे गेले होते.
वाजपेयी पोखरण दौऱ्यावर असताना स्थानिकांनी योग्य नुकसानभरपाई न दिल्याबद्दल निदर्शनं केली. आता तिथे रुग्णालय तयार व्हावी, अशी मागणी स्थानिकांची होती.
पोखरणच्या दुसऱ्या आणू चाचणीला 20 वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्त संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी शेअर केलेला हा आर्काईव्ह फोटो -

फोटो स्रोत, Twitter / @nsitharamanoffc
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








