खग्रास सूर्यग्रहणाची विहंगम दृश्यं!

सूर्यग्रहण

फोटो स्रोत, Reuters

सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र आला की त्या घटनेला सूर्यग्रहण म्हटलं जातं.

मेक्सिको, अमेरिका आणि कॅनडामधल्या लाखो लोकांनी सोमवारी (8 एप्रिलला) सूर्यग्रहणाचा अनुभव घेतला. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण हे वर्षातून काही वेळाच दिसतात.

स्टॅच्यू ऑफ लिबर्टी

पृथ्वीचा तीन चतुर्थांश भाग महासागरांनी भरलेला आहे, त्यामुळे जमिनीवर संपूर्ण सूर्यग्रहण पाहणे अत्यंत दुर्मिळ मानलं जातं.

ग्रहण पाहणारे लोक

या सूर्यग्रहणाची पहिली सावली प्रशांत महासागरात पडली आणि तिथून तिने मेक्सिकोपर्यंतचा प्रवास केला. या ग्रहणामुळे हजारो लोकांच्या डोळ्यादेखत दिवसाचा प्रकाश काळोखात परावर्तित झाला.

ग्रहणाचा आनंद घेणारी लहान मुलगी

ग्रहण बघण्यासाठी वेगवेगळ्या देशांचा प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.

ग्रहण पाहण्यासाठी जमलेले लोक

अमेरिकेतून दिसणारं हे ग्रहण पाहायला जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक पोहोचले होते.

सूर्यग्रहण
ग्रहणाचा आनंद लुटणारे लोक
ग्रहण पाहणारी महिला आणि लहान मुलगी

या ग्रहणामुळे अमेरिकेच्याऑस्टिन, डॅलस या शहरांसह टेक्सासच्या मोठ्या भागात अंधार पसरला होता. दर 18 महिन्यांनी पूर्ण सूर्यग्रहण घडत असतं. पण बऱ्याचदा दुर्मिळ लोकवस्ती असलेल्या भागातून हे ग्रहण जातं, 8 एप्रिलचं ग्रहण मात्र याला अपवाद ठरलं. अमेरिकेच्या तीन प्रमुख शहरांमधून या ग्रहणाने प्रवास केला.

सूर्यग्रहण पाहण्यासाठी जमलेली गर्दी

चंद्र सूर्यापेक्षा पृथ्वीच्या 400 पट जवळ आहे, परंतु चंद्र सूर्यापेक्षा 400 पट लहानही आहे.

सूर्यग्रहण पाहण्यासाठी जमलेली गर्दी

टोटॅलिटी नावाच्या पुस्तकात लेखक मार्क लिटमन लिहितात की जर चंद्र 273 किलोमीटर व्यासाने लहान असता किंवा त्याहून दूर असता तर लोकांना या प्रकारचे सूर्यग्रहण पाहता आले नसते.

सूर्यग्रहण पाहणारे पोलीस कर्मचारी
सूर्यग्रहण

भारतातील काही लोकांची अशी श्रद्धा आहे की, सूर्यग्रहणाच्या काळात कोणतेही शुभ कार्य करू नये आणि देवाचे नाव घ्यावं. पण पाश्चिमात्य देशांतील काही लोकांच्या समजुती यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या आहेत.

सूर्यग्रहण

वॉशिंग्टन डीसी किंवा न्यूयॉर्क या दोन्ही शहरांमध्ये सुमारे 90% सूर्य चंद्राने व्यापलेला दिसत होता. ही अभूतपूर्व घटना पाहण्यासाठी बरेच लोक रस्त्यावर उतरले होते. या शहरांमधल्या गगनचुंबी इमारतींच्या छतावरही ग्रहण पाहायला गर्दी झाली होती.

सूर्यग्रहण
सूर्यग्रहण

सगळ्यात शेवटी कॅनडाच्या लोकांना हे ग्रहण पाहायला मिळालं. अंतराळ निरीक्षणाची आवड असणाऱ्यांसाठी हे ग्रहण म्हणजे पर्वणीच होती.

फोटो क्रेडिट : (Bobby Goddin/USA Today/Reuters, Stan Honda/Getty Images, Hector Vivas/Getty Images, Henry Romero/Reuters, Fernando Llano/AP, Mario Tama/Getty Images, Kevin Dietsch/Getty Images, Andrew Kelly/Reuters, Eduardo Munoz/Reuters, David Dee Delgado/Reuters, Kent Nishimura/Getty Images, Anna Moneymaker/Getty Images, Jeff Overs/BBC, Peter Zay/Getty Images, Noam Galai/Getty Images, Miguel Calero/Shutterstock)