प्लॅन करून केलेला सेक्स जास्त आनंद देतो का?

सेक्स

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अमी म्यूस आणि कतरिना कोवासेविक
    • Role, बीबीसीसाठी

पिक्चर आणि सीरियलमध्ये जे सेक्सचं वर्णन दाखवतात ते बहुतांश वेळी उत्स्फुर्तपणे, अतिशय उत्कटपणे केलेला प्रणय असतो. त्यामागे आधी फार विचार केलेला असतोच असं नाही.

त्यामुळे असा संदेश जातो की उत्कट आणि परिपूर्ण सेक्सचं रहस्य हे त्या क्रियेतला अवचितपणा किंवा उत्स्फुर्तपणा असतो.

आम्ही एक सर्वेक्षण केलं त्यात आम्ही अमेरिका आणि कॅनडामधील काही लोकांशी बोललो. आम्ही त्यांना कसा सेक्स आवडतो असं विचारलं.

बहुतांश लोकांनी सांगितलं की अनियोजित किंवा अवचितपणे केलेला सेक्स हा कायम नियोजित सेक्सपेक्षा जास्त आनंद देणारा असतो.

उत्स्फुर्त सेक्सबद्दलचे गैरसमज

उत्स्फुर्त सेक्स खरंच इतका आनंद देणारा असतो का?

काही जणांसाठी उत्स्फुर्त सेक्स हे उत्कटपणाचं लक्षण आहे. पण त्याचे काही तोटे आहेत असंही त्यांच्या लक्षात आलं आहे.

जेव्हा नातं नवीन असतं तेव्हा सेक्स करण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यात नियोजन अगदी अभावाने आढळतं. जसं नातं जुनं होतं तशी सेक्सची इच्छा कमी होते आणि त्याची वारंवारतासुद्धा कमी होते.

जी जोडपी जुनी असतात त्यांच्यात दोघे एकमेकांना एकदम इच्छा होण्याची वाट पाहत असतात. पण तो सेक्स फारसा रंगात येत नाही.

वेळ असला किंवा नसला तरी नियोजन हे सेक्समध्ये महत्त्वाचं असतं.

सेक्स कधी करायचा हे माहिती असलं की लोक तशी तयार करतात (कपडे, ल्युब्रिकेशन, प्रायव्हसी) त्यामुळे सेक्स चांगला होतो.

सेक्स

फोटो स्रोत, Getty Images

अधिक शोध

अमेरिकेत उत्स्फुर्त सेक्सला कायमच प्राधान्य दिलं जातं. मात्र उत्स्फुर्त आणि नियोजित सेक्सची तुलना फारशी कोणी केलेली आतापर्यंत दिसत नाही.

न्यूयॉर्क विद्यापीठाच्या Sexual Health and Relationship Lab ने 303 लोकांना घेतलं आणि अमेरिकेतल्या 102 जोडप्यांना घेऊन एक सर्वेक्षण केलंं.

आम्ही त्यांना काही वाक्यं वाचायला दिली या वाक्यांशी ते किती सहमत आहे हे विचारलं. “माझ्या पार्टनरबरोबर उत्स्फुर्तपणे केलेला सेक्स जास्त समाधानकारक असतो.” “मी कधी सेक्स करणार हे मला माहिती असेल तर जास्त चांगलं.” अशी ती दोन वाक्यं होती.

नुकताच केलेला सेक्स नियोजित होता की नाही हाही प्रश्न आम्ही त्यांना विचारला. त्यांचं सेक्स लाईफ कसं होतं. तुमच्या जोडीदाराचं समाधान होतं का असे दोन प्रश्नही आम्ही त्यांना विचारले.

आम्ही तुमचे अनुभव तीन आठवडे रेकॉर्ड करणार असंही आम्ही त्यांना सांगितलं.

उद्दिष्ट

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

लैंगिक संबंधांमध्ये अडचणी असलेल्या जोडप्यांच्या अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी उत्स्फुर्ततेच्या संकल्पनेला कायमच आव्हान दिलं आहे आणि सेक्सबद्दल एक वेगळा दृष्टिकोन ठेवावा असं ते सुचवतात.

आपल्या आयुष्यात महत्त्वाच्या असलेल्या अनेक गोष्टी या नियोजितच असतात. तुम्ही शेवटच्या ट्रिपचा विचार करा. त्या ट्रीपचं तुम्ही नक्कीच नियोजन केलं असेल. तरी त्याचा आनंद मिळालाच ना.

त्यामुळे तुम्ही सेक्स तुमच्यासाठी मौल्यवान असेल तर नियोजन केल्यास लैंगिक संबंध आणखी दृढ होऊ शकतात.

सेक्सचं नियोजन करणं म्हणजे अगदी सगळं पहिल्यापासून ठरवणं असा होत नाही.

त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी नीट संवाद साधा, त्याची इच्छा कधी आहे ते समजून घ्या. एखाद्या भावनिक प्रसंगानंतर, कमी कामाचा दिवस अशा काही प्रसंगानंतर सेक्स होऊ शकतो.

काही जोडीदाराच्या बाबतीत अगदी सकाळी किंवा दुपारी सेक्स करण्याची इच्छा बळावू शकते. त्या वेळी मस्त जेवून तुम्हाला ताणून द्यायची इच्छा असते तेव्हाही ही वेळ येऊ शकते.

बहुतांश जोडप्यांमध्ये नातं दृढ होण्यासाठी सेक्सची भूमिका महत्त्वाची ठरते. डेटला जाणं, वीकेंडला बाहेर जाणं यासारखंच सेक्सचंही नियोजन करावं.

आनंदाची बातमी म्हणजे उत्स्फुर्त सेक्स इतकाच नियोजित सेक्सही आनंददायी होऊ शकतो.

सेक्स

फोटो स्रोत, Getty Images

उत्स्फुर्तता आणि समाधान

दोन्ही संशोधनात लोकांनी स्वीकारलं की उत्स्फुर्त सेक्स आदर्शवत असतो. मात्र काही जणांच्या मते हा सेक्स जास्त समाधानकारक नसतो.

आम्ही केलेल्या पहिल्या संशोधनात आम्ही लोकांना हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की उत्स्फुर्त सेक्स समाधानकारकच असतो, पण त्यांना अगदी गेल्या काही काळात आलेल्या अनुभवावरून उत्स्फुर्त सेक्स हा जास्त समाधानकारक नसल्याचं त्यांनी सांगितलं.

काही वेळेला नियोजित सेक्स अजिबात आनंद देत नाही. पण हे त्यांच्यासाठी ज्यांना ही संकल्पनाच मुळात पटत नाही.

दुसऱ्या संशोधनात आम्हाला असं लक्षात आलं की सेक्स नियोजित आहे की उत्स्फुर्त याने जोडप्यांना काहीच फरक पडला नाही.

दोन्ही प्रकारात लोकांना कसा आनंद मिळतो हेही आम्हाला समजून घ्यायचं होतं. उत्स्फुर्त सेक्समध्ये उत्कटता जास्त असते, इच्छा अधिक बळावते असं लक्षात आलं.

काही लोक असंही म्हणाले की नियोजन केल्यामुळे लैंगिक इच्छा अधिक प्रमाणात बळावते.

ज्या लोकांना असं वाटलं की नियोजित सेक्स मुळे आनंद वाढतो, त्यांच्या मते उत्स्फुर्त सेक्समध्ये उत्कटता नसते. काहींच्या मते सेक्स नियोजित नसल्याने तो योग्य पद्धतीने झालाच नाही.

उत्कटतेबद्दल दृष्टिकोन

सेक्स

फोटो स्रोत, Getty Images

काही लोकांना उत्स्फुर्तता आवडते कारण त्या सेक्समध्ये उत्कटता आणि इच्छा जास्त असते. अशीच इच्छा नात्याच्या पहिल्या टप्प्यात दिसते.

जर तुमच्याबरोबर असं झालं असेल तर मग तो नियोजित सेक्सचाच एक भाग असतो असं समजून जा.

तुम्हीच विचार करा ना, सुरुवातीच्या काळात रोमँटिक डेट्स आणि त्यानंतर होणाऱ्या सेक्सचं प्रमाण जास्त असतं.

नियोजित सेक्समध्ये जबाबदारी, कर्तव्य या सगळ्या गोष्टी येतात त्यामुळे सेक्स करण्याची इच्छा कमी होण्याची शक्यता आहे.

आमच्या संशोधनाप्रमाणे नियोजित सेक्सची किंमत कळली तर नातं आणखी घट्ट होईल आणि आनंदही जास्त मिळेल.

हे फार महत्त्वाचं आहे विशेषत: जेव्हा कामात फार व्यस्त असाल किंवा घरी लहान मुलाचा जन्म झाला असेल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)