इस्रायल हमास युद्धः बीबीसीची टीम जेव्हा गाझामधल्या अल शिफा हॉस्पिटलमध्ये पोहोचली

इस्रायल
    • Author, लुसी विलियम्सन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

आम्ही अल शिफा हॉस्पिटस कॉम्प्लेक्समध्ये पोहोचलो तेव्हा तिथे अंधार होता. इस्रायलच्या सैनिकांना सुरक्षितपणे येता यावं यासाठी या भिंतीचा एक भाग बुलडोझरने पाडण्यात आला होता.

इस्रायलच्या म्हणण्यानुसार त्यांन जागेवर काय दिसलं हे सांगायला इस्रायलच्या लष्कराने (IDF) त्यांनी बीबीसी आणि आणखी एका प्रसारमाध्यमाला तिथे नेलं होतं.

तिथे थोडा प्रकाश असला तरी आम्हाला धोका होता. आम्हाला सशस्त्र दलांचं संरक्षण होते. ते तिथे असलेल्या एका तंबूतून, ढिगाऱ्यातून आणि झोपलेल्या लोकांना ओलांडून बाहेर येत होते.

तिथे असलेल्या डॉक्टरांनी सांगितलं की ते तिथे वीज, अन्नपाण्याशिवाय काम करत आहेत. त्यामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यात नवजात बालकांचाही समावेश होता.

गाझामध्ये युद्धाला तोंड दिलेले लोक तिथे असलेल्या हॉस्पिटल कॉम्प्लेक्समध्ये निर्वासित म्हणून राहत होते.

इस्रायलच्या मते हमास जमिनीखाली बोगद्याचं एक नेटवर्क चालवत आहे. त्यात अल- शिफा हॉस्पिटलचा समावेश आहे.

मास्क लावून असलेले स्पेशल फोर्सचे सैनिक आम्हाला त्या इमारतीत त्या ढिगाऱ्यातून घेऊन जात होते. त्यावरूनच परिस्थिती किती तीव्र होती हे लक्षात येत होते.

इस्रायलने आदल्याच दिवशी त्या हॉस्पिटलचा ताबा घेतला होता आणि दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे होतो. त्यावरून ते तिथे का आहेत हे इस्रायल तिथे का आहेत हे ते लोक सांगण्याचा प्रयत्न करत होते.

MRI unit च्या कॉरिडॉरमध्ये ले.कर्नल जोनाथन कॉर्निकस यांनी आम्हाला काही शस्त्रास्त्रं दाखवली. त्यांना तिथे एकूण 15 बंदुका आणि काही ग्रेनेड सापडले.

त्यांनी आम्हाला काही लष्करी पुस्तिका आणि प्रसिद्धीपत्रकं आणि एक नकाशा सापडला. त्यावर हॉस्पिटलमध्ये प्रवेश आणि बाहेर जायचा रस्ता दाखवला होता.

गाझा

फोटो स्रोत, Getty Images

ते म्हणाले, “याचाच अर्थ असा की हमास हॉस्पिटलचा वापर लष्करी कारणासाठी करतो. आम्ही अनेक कॉम्प्युटर्स आणि इतर गोष्टी जमा केल्या. त्यावरूनन सद्यस्थितीचा माग लागतो. अगदी ओलीस ठेवलेल्या लोकांबद्दल कळतं.”

अपहरण करून गाझात नेलेल्या लोकांचे फोटो आणि व्हीडिओ त्या लॅपटॉपमध्ये होते. ऑक्टोबरमध्ये हल्ला केल्यानंतर काही हमास कट्टरवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीचे व्हीडिओसुद्धा त्या लॅपटॉपमध्ये होते असं त्यांनी सांगितलं. त्या लॅपटॉपमध्ये काय होतं हे मात्र त्यांनी बीबीसीला दाखवलं नाही.

ले. कर्नल कॉनर्किस म्हणाले की हमासची लोक काही दिवसांपूर्वी तिथे होते.

“खरं सांगायचं झालं तर हे हिमनगाचं एक टोक आहे. आम्ही ताबा घेणार म्हणून हमास इथे आलेलं नाही. या सगळ्या वस्तू त्यांना सोडाव्या लागल्या आहेत. आमचा असा अंदाज आहे की तिथे बरंच काही अजून आहे.”

इस्रायल
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

इस्रायलच्या लष्कराने या हॉस्पिटलच्या गेटपर्यंत जाण्यासाठीसुद्धा संघर्ष केला आहे. तिथल्या आजूबाजूच्या रस्त्यांवर गाझामध्ये झालेला सगळ्यात तीव्र संघर्ष पहायला मिळाला आहे.

आमची भेट अतिशय नियंत्रित स्वरुपाची होती. आमच्याकडे अतिशय मर्यादित वेळ होता. त्यामुळे आम्ही तिथल्या डॉक्टर आणि नर्सेसशी बोलू शकलो नाही.

आम्ही अतिशय सुरक्षित वातावरणात तिथे गेलो. बाहेर अंधार पडला होता. गाझावर झालेल्या हल्ल्याच्या पाऊलखुणा आम्हाला जागोजागी दिसत होत्या.

लष्कराच्या गाडीत लागलेल्या स्क्रीनवर शेतजमीन आधी दिसत होती. त्यानंतर विस्कळीत रस्ता दिसत होता. तिथे ढिगारा, आणि तुटलेल्या इमारती दिसत होत्या.

गाझाच्या दक्षिण बाजूला आम्ही गाडी बदलण्यासाठी उभे राहिलो. बाहेर आलो तोव्हा पायाला स्टीलचे तुकडे आणि काँक्रिटचा एक मोठा ढिगारा दिसत होता.

सैनिकांचा एक लहान गट कॅम्पफायर करत होता. तसंच टँकच्या बाजूला एका ठिकाणी स्वयंपाक करत होता. “ही एक सिक्रेट पद्धत आहे.” एक जण म्हणाला.

त्याच्यावर पाहिलं तर इमारती विशिष्ट पद्धतीने कोसळल्या होत्या. तिथली दारं अर्धवट तुटली होती.

इस्रायल
फोटो कॅप्शन, इस्रायलला मिळालेली शस्त्रं

7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर इस्रायल आणि हमासचं समीकरणच बदललं आहे. बरेच वर्षं त्यांच्यात तणाव होता. त्याचा आता भडका उडाला आणि इस्रायलने हमासची राजकीय आणि लष्करी ताकदच संपवून टाकली. हमास संघटनेला युके, अमेरिका या देशांनी आतंकवादी असं संबोधलं होतं.

इस्रायली लष्कर अद्यापही त्या बोगद्याच्या शोधात आहे जिथे हमासचे कट्टरतावादी लपलेले असण्याची शक्यता आहे. तसंच काही निर्वासितही तिथे असण्याची शक्यता आहे.

ही इमारत म्हणजे इस्रायलच्या युद्धाचं केंद्रबिंदू झाली आहे. तसंच हमासच्या कारवायांचही हे मुख्य केंद्र होतं.

गाझा शहराच्या या हॉस्पिटलपर्यंत जायला इस्रायलला अनेक आठवडे लागले. इस्रायलला या ठिकाणी शस्त्रं सापडली आहेत आणि हमासची माहितीही तिथे मिळू शकते असा त्यांचा दावा आहे. मात्र आतापर्यंत त्यांना कशाचीही माहिती मिळाली नाही.

आम्ही थोडावेळाने ते हॉस्पिटल सोडलं. हा रस्ता पुढे गाझाच्या किनारी रस्त्याला लागला. गाझा शहरावर आता रणगाड्यांचा ताबा आहे. या सगळ्या भागात भूकंप येऊन गेलाय असं वाटतं. इतका तिथे विध्वंस झाला आहे.

इस्रायलला या रस्त्याचा ताबा घेण्यासाठी काय कष्ट घ्यावे लागतात हे यावरून पुरेसं स्पष्ट होतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)