इस्रायलमध्ये मृतदेह शोधण्यासाठी शिकारी पक्ष्यांचा वापर

फोटो स्रोत, RSPB
- Author, फिल मॅकॉसलँड
- Role, बीबीसी न्यूज
7 ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये घुसखोरी करणाऱ्या हमासच्या सैनिकांनी मोठा हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात अनेकजण मृत्युमुखी पडले असून लोकांचे मृतदेह शोधण्यासाठी पर्यावरणशास्त्रज्ञ शिकारी पक्ष्यांचा वापर करत आहेत.
इस्त्राईल नेचर अँड पार्क्स अथॉरिटीचे ओहद हॅटझोफे बहिरी ससाण्यावर जीपीएस ट्रॅकिंग उपकरण लावून त्याच्या स्थलांतराचा मागोवा घेतात.
23 ऑक्टोबर रोजी इस्रायली सैन्याने मदत मागितल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे चार मृतदेहांची ओळख पटवली.
त्याचबरोबर आणखीन एका पक्षाने काही भागांमधून माहिती गोळा केली.
इस्त्रायलमधील पर्यावरणशास्त्रज्ञ म्हणाले की, त्यांनी बहिरी ससाण्याने गोळा केलेल्या माहितीचं पुनरावलोकन केलं. इस्त्रायलमध्ये या पक्ष्यांची प्रजाती नष्ट झाल्यानंतर प्रजातीच्या पक्ष्यांची लोकसंख्या पुन्हा वाढवली आहे.
उत्तर मॉस्कोमधून स्थलांतरित झालेला हा पक्षी भुकेला होता आणि सक्रियपणे शिकार करत नव्हता असं हॅटझोफे यांनी सांगितलं.
हॅटझोफे यांनी पक्षी प्रवासादरम्यान ज्या ठिकाणी थांबा घेतात त्याची माहिती गोळा करून इस्रायली संरक्षण दल (आयडीएफ) दलाकडे पाठवली. याठिकाणी चार मृतदेह सापडले.
7 ऑक्टोबर रोजी, हमासच्या सैनिकांनी इस्रायल-गाझा सीमेचे कुंपण तोडून दक्षिण इस्रायलमध्ये घुसखोरी केली आणि नंतर प्रचंड नरसंहार केला. इस्त्रायली समुदाय, लष्करी तळ तसेच संगीत महोत्सवाला लक्ष्य करणाऱ्या हल्ल्यांमध्ये चौदाशेहून अधिक लोक मारले गेले. तर 200 हून अधिक लोकांना ओलिस ठेवलं.
त्यानंतर, हमास संचालित आरोग्य मंत्रालयाने घोषित केलं की गाझामध्ये इस्रायली सैन्याने केलेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 10,800 हून अधिक लोक मारले गेले आहेत. मृतांपैकी 4,400 हून अधिक मुले होती, असं त्यात म्हटलं आहे.
हॅटझोफे जीपीएस उपकरणांच्या साहाय्याने पक्षी जिथे थांबतात त्या ठिकाणांची ओळख करून देत आहेत. ही उपकरणं कॅमेऱ्यांनी सुसज्ज नसली तरी ते पक्ष्यांच्या उड्डाण पद्धतीचं आणि इतर माहितीचं विश्लेषण करतात. गोळा केलेली माहिती आणि सॅटेलाइट इमेजरीच्या मदतीने माहितीची पडताळणी केली जाते.
पर्यावरणतज्ञ सांगतात की, प्रयत्न करणे खूप समाधानकारक आहे. विशेषत: यामुळे पीडितांच्या कुटुंबीयांच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात मदत होऊ शकते.
ते म्हणतात, "आपली व्यक्ती आपल्याला कधीच सापडणार नाही या अनिश्चिततेमध्ये जगणं पृथ्वीवरील सर्वात वाईट गोष्ट आहे."
हॅटझोफे देखील याच अनिश्चिततेत जगत आहेत.
ते सांगतात की, त्यांचे मित्र ओहद याहलोमी किबुत्झच्या नीर ओझ भागात राहत होते. हमासच्या हल्ल्यानंतर ते आणि त्यांचा 12 वर्षांचा मुलगा बेपत्ता आहे.
ओहाद याहलोमी यांच्या पत्नीने माध्यमांशी बोलताना सांगितलं की, त्यांच्या पतीला हमासच्या सैनिकांनी गोळ्या घालून ठार केलं. त्या आणि त्यांची दोन मुलं पळून जाण्यात यशस्वी झाली.
हॅटझोफे म्हणतात ,"हे खूप वाईट होतं."
हे युद्ध लवकरच संपेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली कारण यामुळे इस्रायली आणि पॅलेस्टिनींचे नुकसान झाले आहे.
ते म्हणाले की, सामान्य काळात राजकीय मतभेद असले तरी या युद्धात सर्वांनी एकजूट राहिलं पाहिजे.
"आम्ही धोक्यात आहोत. आम्ही सर्व एकाच ध्येयासाठी काम करत आहोत."
हमासच्या हल्ल्यानंतर हे काम करण्यासाठी फार कमी लोक उपलब्ध आहेत. हॅटझोफ यांचे अनेक सहकारी लष्करी सेवेत दाखल झाले आहेत.
म्हणून आत्तासाठी हॅटझोफे म्हणतात की, "मला आनंद आहे की पक्ष्यांच्या हालचाली आणि वर्तनाचे विश्लेषण करण्यात असलेलं माझं कौशल्य एक प्रकारे उपयुक्त आहे. मला जी मदत करणं शक्य आहे ती मी करेन."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.








