समुद्री चाच्यांवर नजर ठेवण्यासाठी 'हा' पक्षी करणार मदत

एल्बाट्रॉस

फोटो स्रोत, JOHN STILLWELL/PA

फोटो कॅप्शन, एल्बाट्रॉस

समुद्री चाच्यांना हा पक्षी रोखणार!

तो अद्भुत आहे, अविश्वसनीय आहे. आपल्या विचारांच्या पलिकडचा आहे. खुल्या आसमंतात तो हवेशी गुजगोष्टी करतो.

तो न थकता, जमिनीवर न उतरता एका महिन्यात 10 हजार किलोमीटरचं अंतर पार करू शकतो.

हयातीत तो 85 हजार किलोमीटरपर्यंत भरारी घेऊ शकतो.

तीन मीटर लांब पंख ही त्याची मोठी ताकद आहे. एकाच उड्डाणभरारीत तो समुद्रावर बराच काळ विहार करू शकतो.

हा आहे अल्बाट्रॉस...एक समुद्री पक्षी. अल्बाट्रॉस आता एक नवीन काम हाती घेणार आहे.

प्रशासनाला करणार मदत

अल्बाट्रॉस समुद्रातून मासे चोरणाऱ्या आणि समुद्री चाच्यांवर नजर ठेवणार आहे. त्यांना पकडून देण्यात तो प्रशासनाला मदत करणार आहे.

मासेमार मासे पकडण्यासाठी समुद्रात जाळं टाकतात. मात्र अनेकदा यात माशांसोबत अन्य पक्षीही अडकतात.

एल्बाट्रॉस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एल्बाट्रॉस

बायकॅचिंगमुळे दरवर्षी हजारो पक्ष्यांचा मृत्यू होतो. अनेकदा बायकॅचिंगचा प्रश्न ऐरणीवर येतो. अल्बाट्रॉस आणि समुद्री काक यांना या बायकॅचिंगचा सर्वाधिक त्रास होतो.

समुद्री चाच्यांवर नजर

पर्यवेक्षकांच्या बरोबरीने इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून बायकॅचिंग करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात आली. यानंतर अल्बाट्रॉस बायकॅचिंगमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली.

समुद्री चाच्यांच्या हालचाली टिपण्यासाठी दक्षिण महासागरात गस्ती नौका तैनात करण्यात आल्या.

प्रश्न हा की समुद्रात अवैध पद्धतीन मासे पकडणाऱ्या नौकांना रोखावं तरी कसं?

कोण परिणामकारक ठरतंय? कोण नाही? हे ठरवायला परिमाण नव्हतं.

आंतरराष्ट्रीय समुद्र

म्हणूनच अल्बाट्रॉसच्या बायकॅचिंगवर लक्ष ठेवणं अवघड आहे. समुद्रातही प्रत्येक देशाची सीमा निश्चित असते. त्या टप्प्यानंतर आंतरराष्ट्रीय समुद्र असतो. त्या भागावर देखरेख करणं कोणत्याही देशाला अवघडच आहे.

एल्बाट्रॉस

फोटो स्रोत, BBC/SILVERBACK FILMS/JAMIE MCPHERSON

फोटो कॅप्शन, एल्बाट्रॉस

मात्र आता हे काम अल्बाट्रॉस करतील. महिनाभरात ते दहा हजार किलोमीटरचं अंतर कापतील आणि समुद्री चाच्यांची माहिती देतील.

मासे पकडण्यासाठी टाकण्यात आलेल्या जाळ्यांमध्ये अडकून अल्बाट्रॉस मरत होते.

संशोधकांनी अल्बाट्रॉस आणि मासे पकडणाऱ्या नौका यांच्यातील परस्परसंबंध समजावून घेतला.

पक्ष्यांचं बायकॅचिंग

संशोधकांनी हे समजून घेण्याचा प्रयत्न केला की समुद्री पक्षी माशांच्या संपर्कात नक्की केव्हा येतात?

कोणता पक्षी कोणाचा पाठलाग करतो हेही समजून घेण्याचा प्रयत्न आहे.

पक्ष्यांचं बायकॅचिंग सर्वाधिक कुठे होतं आहे हेही जाणून घेण्याचा प्रयत्न आहे.

एल्बाट्रॉस
फोटो कॅप्शन, अनेक समुद्री पक्षी बायकॅचिंगमध्ये सापडतात.

ऑनबोर्ड मॉनिटरिंग सिस्टीमकडून मिळालेल्या माहितीनुसार समुद्रात असलेल्या नौकांचं मॅपिंग शक्य आहे. परंतु हा रेकॉर्ड रिअल टाईम नसतो.

सुरुवातीला संशोधकांना याची कल्पना नव्हती की मच्छी पकडणाऱ्या नौकेसह खुल्या हवेत फिरणारे समुद्री पक्षी किती वेळ व्यतीत करतात.

मासे पकडण्याची प्रक्रिया

जेव्हा संशोधकांना अंदाज आला तेव्हा त्यांनी अल्बाट्रॉसशी संलग्न होऊ शकेल असा डेटा लॉगर तयार केला.

हा लॉगर नौकेच्या रडारचा माग काढतो. अन्य तपशीलही जमा करतो. आकडेवारीतून हेही कळलं आहे की, मासे पकडणाऱ्या नौकांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक पक्ष्याचं लिंग आणि वय याचीही माहिती कळते.

एल्बाट्रॉस

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, समुद्रातील बोटी, पक्षी

उदाहरणार्थ- नर पक्षी, अंटार्क्टिकाच्या जवळ दक्षिणेच्या दिशेने असतात. तिथे मासे पकडणारी जहाजं दुर्लभ आहेत.

मादी पक्षी उत्तरेच्या दिशेला असतात. तिथे मच्छी पकडणारी जहाजं मोठ्या प्रमाणावर असतात.

वैश्विक चित्र

हा फरक समजून घेणं संशोधनाचं मुख्य उद्दिष्ट होतं. लॉगरद्वारे मिळालेला डेटा बोनस ठरला. खुल्या समुद्रात मच्छी पकडण्याच्या हालचाली रोखण्यात याने मदत होऊ शकली.

मासे पकडणाऱ्या नौका आणि सर्वसामान्य नौका यांच्यातील अंतर समजून घेण्यासाठी हे संशोधन हाती घेण्यात आलं होतं.

एल्बाट्रॉस
फोटो कॅप्शन, समुद्री पक्षी

पक्षी हे मासे पकडणाऱ्या नौकांच्या दिशेने आकृष्ट होतात का हे पाहण्याचाही प्रयत्न होता.

लॉगर्सच्या डेटाला वैश्विक चित्राशी जोडण्यात आलं.

दक्षिण महासागर

सर्व जहाजांचं स्थान स्वयंचलित प्रणालीद्वारे एकाचवेळी पाहता येतं. रडारच्या माध्यमातून जहाजांची एकमेकांशी होणारी टक्करही रोखता येऊ शकते. अल्बाट्रॉस डेटाने दक्षिण महासागरात अवैधरीत्या मच्छी पकडणाऱ्यांचं कार्यक्षेत्र उघड केलं.

खुल्या समुद्रात मासे आणि अन्य जीवांच्या चोरीवर जहाजांच्या माध्यमातून लक्ष ठेवणं अवघड आहे.

एल्बाट्रॉस

फोटो स्रोत, SUSAN WAUGH

फोटो कॅप्शन, डेटा ट्रॅकर लावण्यात आले होते.

अल्बाट्रॉस मोठा प्रदेश न्याहाळू शकतात आणि त्यावर देखरेखही ठेऊ शकतात.

अल्बाट्रॉसवरचा डेटा कोणत्याही मच्छी पकडणाऱ्या जहाजाला समजतो तेव्हा लॉगरच्या मदतीने आजूबाजूच्या जहाजांना त्याची माहिती मिळते आणि चौकशीला सुरुवात होते.

मोठ्य़ा प्रमाणावर डेटा अर्थात माहिती संकलित करता आली तर समुद्री चाच्यांवर नजर ठेवता येऊ शकते.

अल्बाट्रॉससह अन्य समुद्री जीव वाचवता येऊ शकतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)