'स्क्रीन टाईम' कमी करण्यासाठी असं करा 'डिजिटल डिटॉक्सिंग'

मोबाईल, डिजिटल डिटॉक्स

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, सोफिया एपस्टीन
    • Role, बीबीसी न्यूज

सेल्फकोर्सचे सीईओ मार्क बेनिऑफ हे 'डिजिटल डिटॉक्सिंग' वर असल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच म्हणजे फेब्रुवारी महिन्यात आली होती.

फ्रान्सच्या पोलिनेसियन रिसॉर्टमध्ये त्यांनी दहा दिवस टेक-फ्री (तंत्रज्ञानापासून दूर) घालवले. काही लोक उपकरणांपासून अशाप्रकारे दूर राहण्याचं लक्ष्य पूर्ण करतात. मात्र, बहुतांश लोकांसाठी हे जवळपास अशक्यच बनलंय.

डिजिटल डिटॉक्स म्हणजे, तंत्रज्ञानाला पूर्णपणे बाजूला सारणं. म्हणजे काही दिवसांसाठी तुम्ही स्क्रीनपासून पूर्णपणे दूर जाता. मग ते सोशल मीडिया असो, व्हिडिओ कॉन्फरन्सिग असो किंवा तसंच दुसरं एखादं डिजिटल प्लॅटफॉर्म.

डिजिटल डिटॉक्सिंगचा अर्थ तणाव किंवा चिंता कमी करून लोकांना वास्तव जगाशी एकरुप करणं हा आहे. तसं पाहता अद्याप तंत्रज्ञानापासून दूर राहण्यामुळं होणारे फायदे, शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेले नाहीत. पण डिजिटल डिटॉक्सिंग हे एक मोठं आव्हान बनत चालल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं.

शिवाय 2012 नंतर या आव्हानाचा सामना करणं आणखी कठीण होऊन बसलंय. संशोधकांनी या शब्दाचा पहिल्यांदा वापर 2012 मध्ये केला होता.

त्यावेळी स्क्रीनचं महत्त्वं हे सगळीकडं प्रस्थापित झालं होतं. तो काळ म्हणजे अॅपचे अगदीच नवे व्हर्जन आणि सोशल मीडिया प्राथमिक टप्प्यामध्ये असलेला होता. त्यामुळं त्या काळात डिजिटल डिटॉक्सिंगच्या आव्हानाचा सामना करणं, आजच्या काळाच्या तुलनेत अधिक सहज शक्य होतं. पण सध्याचा विचार करता, आपल्या जीवनापासून तंत्रज्ञान दूर करणं हे जवळपास अशक्य झालंय.

मोबाईल, डिजिटल डिटॉक्स

फोटो स्रोत, Getty Images

आज आपण दुकानांत, वेगवेगळ्या स्टोरमध्ये फोननं पेमेंट करतो. कॉम्प्युटर आणि टॅबलेटच्या मदतीनं काम करतो आणि अॅपच्या मदतीनं रिलेशनशिप मेंटेन करतो.

कोरोनाच्या संकटानंतर तर आपल्या जीवनात तंत्रज्ञानानं अधिक खोलपर्यंत प्रवेश केल्याचं पाहायला मिळालंय.

डिटॉक्सिंगची सुरुवात कुठून कराल?

तुम्हाला 2023 मध्ये डिजिटल डिटॉक्सिंग करून पाहायचं असेल, तर सुरुवात कुठून कराल?

काही दिवस फोनपासून दूर राहण्यासारखे काही उपाय वगळता, आजच्या काळात बहुतांश लोकांसाठी डिजिटल डिटॉक्सिंग हे अशक्य बनलं आहे.

"आपल्या जीवनात आता तंत्रज्ञानानं पूर्णपणे प्रवेश केलाय. आपण अॅपद्वारे बँकिंग करतो. फोनवर रेस्तरॉमधला मेन्यू वाचतो आणि स्क्रीनवर येणाऱ्या निर्देशांनुसार व्यायाम करत असतो," असं अमेरिकेच्या सिएटलमधील स्क्रीन टाइम मॅनेजमेंट विषयातील तज्ज्ञ कन्सलटंट एमिली चेरकिन म्हणाल्या.

"तंत्रज्ञानानं आपल्या जीवनाभोवती एवढं घट्ट जाळं विणलंय की, एका आठवड्यासाठीही फोनपासून दूर जाण्याचा विचार करणं म्हणजे डिजिटल डिटॉक्सिंगमध्ये अपयशाकडे वाटचाल ठरते."

मोबाईल, डिजिटल डिटॉक्स

फोटो स्रोत, Getty Images

लोक आता तंत्रज्ञानावर एवढे जास्त अवलंबून राहू लागले आहेत की, त्यामुळं डिजिटल डिटॉक्सिंग हे पुरेसं लक्ष्य राहिलेलं नाही. त्याऐवजी आता तंत्रज्ञानाप्रती आपला वेडेपणा कमी व्हावा, यासाठी अधिक वास्तववादी लक्ष्य ठेवून ती पूर्ण केली जाऊ शकतात. हा असा उपक्रम असेल ज्यात, आपल्याला तंत्रज्ञानापासून पूर्णपणे दूर जाण्यासाठी भाग पाडले जाता कामा नये.

स्क्रीन, स्क्रीन आणि स्क्रीन

कोरोना संकटादरम्यान लोकांचा स्क्रीन टाईम प्रचंड वाढला होता. लोक लॉकडाउनदरम्यान आणखी जास्त स्क्रीन पाहू लागले होते.

त्याचं कारण म्हणजे, त्यांच्याकडे लोकांशी संपर्काचा दुसरा कोणताही मार्गच नव्हता. पण कोरोनाचं संकट संपल्यानंतरही त्यांची ती सवय अजूनही कायम आहे.

लोकांना कोरोनानंतर घराबाहेर पडून एकमेकांशी भेटण्याचे आणि इतर पर्याय उपलब्ध होते, तरीही त्यांची स्क्रीन पाहण्याची सवय कायम राहिली.

2022 मध्ये लीड्स युनिव्हर्सिटीमध्ये एक अभ्यास करण्यात आला. त्यानुसार ब्रिटनमध्ये राहणारे 54 प्रौढ कोरोना संकटाच्या आधीच्या तुलनेत सध्या स्क्रीनचा अधिक वापर करतायत.

ज्या लोकांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं, त्यापैकी अर्धे लोक दररोज 11 तासांपेक्षा अधिक स्क्रीन पाहत होते.

कोरोना काळाच्या आधीच्या दिवसांशी तुलना करता, रिकाम्या वेळेत स्क्रीन पाहणाऱ्यांचं प्रमाण 51 टक्के होतं. तर 27 टक्के लोकांचा कामादरम्यान स्क्रीनचा वापर वाढला होता.

मोबाईल, डिजिटल डिटॉक्स

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

स्क्रीन टाइम वाढल्यामुळं आपल्यातील एकमेकांच्या संपर्कात राहण्याच्या सवयीतही बदल झालाय. त्यामुळं महत्त्वाची नातीदेखील आता अधिक डिजिटाइज झाली आहेत.

त्याचं कारण म्हणझे आपण व्हाट्सअॅप ग्रुप तयार केले आहेत. महिना-दोन महिन्यांत कुटुंबात एकत्र येऊन होणाऱ्या चर्चेऐवजी आता दर आठवड्याला कॉलवर चर्चा केली जातेय.

कोविड-19 नं आपल्या भेटीगाठी डिजिटलच्या श्रेणीकडे सरकवल्या आहेत. खूप लोक आता केवळ ग्रुप चॅट आणि व्हिडिओ कॉलवरच बोलू लागले आहेत.

त्यामुळं डिजिटल डिटॉक्सचा अर्थ हा केवळ बॉसपासून किंवा कामासंबंधीच्या डिजिटल डिव्हाइस चॅटपासून मुक्ती असा नाही. त्याचा अर्थ म्हणजे, तुम्ही तुमच्या नातेवाईकांशी एका ठराविक काळापर्यंत डिजिटल माध्यमातून संपर्क साधायचा नाही.

ऑनलाइन डेटिंग आता अगदी सर्वसामान्य बनलंय. कोरोनादरम्यान मैत्री करण्यात तंत्रज्ञानाची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिलीय. बीबीसी वर्कलाइफनं बम्बलच्या एका डेटाची माहिती घेतली. त्यानुसार बम्बलचे फ्रेंडशिप मॅचमेकिंग अॅप बम्बल बीएफएफच्या वापरात 2020 नंतर आतापर्यंत चांगलीच वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

मोबाईल, डिजिटल डिटॉक्स

फोटो स्रोत, Getty Images

2021 च्या अखेरीपर्यंत बम्बलचे 4 कोटी 20 लाख पैकी 15 टक्के यूझर बीएफएफ वर मित्र शोधत होते. त्याच्या एका वर्षापूर्वी हा आकडा दहा टक्के होता. 2022 पर्यंत मित्र शोधणाऱ्या पुरुष यूझर्सचं प्रमाण वाढून 26 टक्के झालं होतं.

लेखक क्रिस डेन्सी हे त्यांच्या स्वतःच्या ऑनलाईन उपस्थिती किंवा ऑनलाईन असण्यावर 700 पेक्षा अधिक सेंसर, उपकरणं आणि अॅपद्वारे लक्ष ठेवतात. त्यांच्या मते,"तंत्रज्ञान चांगले असो वा वाईट ते उपलब्धतेचंच एक रुप आहे. मला हे बोलायला फार चांगलं वाटत नसलं तरी, बहुतांश पालक-पार्टनर आणि मित्र आता डिजिटल टेक्नॉलॉजीशिवाय नाती सांभाळणंच विसरायला लागले आहेत."

डिजिटल माइंडफुलनेस

खरं तर हायब्रिड काम आणि हायब्रिड रिलेशनशिपच्या दिशेनं पुढं जाणाऱ्यांसाठी डिजिटल डिटॉक्सची कल्पना ही जुनी तर झालीच आहे, शिवाय ती जवळपास अशक्यही बनली आहे. डिजिटल डिटॉक्स हा चिंता दूर करण्याचा रामबाण असल्याचं म्हटलं जात आहे.

दुसरीकडं लोकांचं जीवन आणि स्क्रीन यांच्यातील नातं अधिक गुंतागुंतीचं बनलंय. त्यामुळं तुम्ही जेव्हा डिटॉक्सिंगचा अवलंब करण्याचा प्रयत्न कराल तेव्हा त्यात यश मिळणार नाही आणि परिणामी तुमची काळजी किंवा चिंता आणखी वाढेल.

"मी तंत्रज्ञानाला दूर करू शकत नाही. आपण सध्या वेगवेगळ्या कारणांमुळं स्क्रीनवर उपलब्ध असतो," असं ब्रिटनच्या टिस्साइड युनिव्हर्सिटीतील डिजिटल एंटरप्राइजचे वरिष्ठ प्राध्यापक सीना जोनेडी यांनी म्हटलं.

"माझ्यासाठी टेक्नोलॉजीपासून डिटॉक्सिंगचा विषय 'ऐच्छिक आपलेपणा' शी संबंधित आहे. ऐच्छिक आपलेपणा ही एक बौद्ध संकल्पना आहे. याचा अर्थ, एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट आवडत असते कारण, त्याला वाटते की त्यामुळं त्याला आनंद मिळेल. पण स्क्रीनबाबतची आवड किंवा आपलेपणा हा ब्लू लाइटचा डोपेमाइनच आहे."

तंत्रज्ञानाला पूर्णपणे दूर सारण्याऐवजी जोनेडी डिजिटल माइंडफुलनेसचा अवलंब करतात. "तंत्रज्ञानाचा वापर हा एखाद्या उद्देशासाठीच करायचा हे मी निश्चित करतो," असं ते म्हणतात त्यांच्या मते पूर्णपणे डिटॉक्सिंगच्या तुलनेत डिजिटल माइंडफुलनेस हे काही लोकांसाठी अधिक व्यवहार्य ठरू शकतं. त्यामुळं तंत्रज्ञानापासून पूर्णपणे लांब जाण्याची चिंता दूर होईल आणि एखाद्या उद्देशासाठी त्याच्या वापरावर लक्ष केंद्रीत होईल.

डिजिटल माइंडफुलनेसचा अवलंब केल्यास लोक विनाकारण स्क्रोलिंगपासून वाचू शकतील आणि त्यांना आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं ते आपलं जीवन अधिक आनंदी बनवू शकतील.

मोबाईल, डिजिटल डिटॉक्स

फोटो स्रोत, Getty Images

स्क्रीन टाइमिंगवर असे मिळवा नियंत्रण

तज्ज्ञांच्या मते, ज्यांना पूर्णपणे स्क्रीनपासून दूर जाणं शक्य नाही, ते तंत्रज्ञानाच्या वापराच्या त्यांच्या सवयीवर लक्ष केंद्रीत करू शकतात. तसं केल्यास तंत्रज्ञानाचा अधिक उपयुक्त वापर करणं त्यांना शक्य होईल.

"मी माझ्या फोनवर अनेक ट्रॅकिंग टूल्सचा वापर करायला सुरुवात केली होती," असं ऑरेगनमध्ये राहणाऱ्या मानववंशशास्त्रज्ञ अंबर केस म्हणाल्या.

अंबर यांच्या लक्षात आलं की त्या, एका दिवसात 80 वेळा इन्स्टाग्राम क्लिक करतात. त्यामुळं त्यांनी वन सेक नावाचं एक प्लगइन डाऊनलोड केलं. हे प्लगइन यूजर्सना फोनवर एखादं अॅप उघडण्यापूर्वी थांबून आधी विचार करण्याची एक संधी देतं.

फावल्या वेळेत सहज म्हणून स्क्रोलिंग करण्याच्या सवयीपासून सावध व्हायला हवं असं केस म्हणतात. गरज नसेल तेव्हा फोन स्वतःपासून दूर ठेवण्याची सवय लावा. लोकांना सिगारेटच्या व्यसनासारखं फोनचं व्यसन लागतं, असंही त्या म्हणतात.

केस यांच्या मते, फोन तुमच्या रिकाम्या वेळेवर ताबा मिळवतो आणि मग इतरांच्या कल्पनांनी हा पूर्ण वेळ व्यापून जातो. तुम्ही स्क्रीवर फक्त सहज पाहत राहता, आणि काही वेळानं पुन्हा त्यामुळं बोअरदेखील होता.

मोबाईल, डिजिटल डिटॉक्स

फोटो स्रोत, Getty Images

डिजिटल डिटॉक्सिंग म्हणजे, तंत्रज्ञानापासून पूर्णपणे दूर जाणं नाही

शेवटी यासंबंधी तज्ज्ञांचं मत असं आहे की, डिजिटल डिटॉक्सिंगचा अर्थ पूर्णपणे तंत्रज्ञानापासून दूर जाणं असा असायला नको. शिवाय तसं करण्यासाठी स्वतःवर दबावही निर्माण करू नये. लोकांना ई-मेल करण्याची गरज असते. अनेकांना ऑनलाइन टेक्स्टही पाहायचे असते. पण तसे करताना इतरांच्या ऑनलाइन कंटेंटच्या आकर्षणापासून स्वतःचा बचावही करायला हवा.

डेन्सी याला 'ग्रे डिटॉक्सिंग' म्हणतात. त्यात तुम्ही पूर्णपणे तंत्रज्ञानाच्या आहारीदेखील जात नाही, किंवा त्यापासून स्वतःला अगदी दूरही करत नाही. याचा अवलंब करण्याची एकच पद्धत नसून त्याच्या अनेक पद्धती आहेत, असंही ते म्हणतात.

उदाहरण द्यायचं झाल्यास, तुम्हाला असे अॅप आणि प्लगइन इन्स्टॉल करता येतील, जे तुम्हाला सोशल मीडियाच्या सर्व मॅट्रिक्सपासून दूर ठेवू शकतात. तुम्ही मित्र आणि जवळच्या नातेवाईकांबरोबर फोनची अदलाबदलही करू शकता. म्हणजे तुम्हाला जेव्हा एकमेकांशी संपर्क करायचा असेल, तेव्हाच तुम्ही स्क्रीनचा वापर कराल.

"वीकेंडला मी माझ्या पार्टनरचा फोन वापरतो आणि ती माझ्या फोनचा वापर करते," असं डेन्सी सांगतात.

आम्ही दोघं एकमेकांच्या मॅसेजेसना उत्तरं देतो. एकमेकांच्या अकाऊंटमधून आम्ही संगीत ऐकतो. खरं तर, "एकमेकांच्या जीवनात प्रवेश करण्याचं हे एक माध्यम आहे."

तज्ज्ञांच्या मते, एका आठवड्यासाठी पूर्णपणे फोनशी संबंध तोडण्याऐवजी, जीवनातील आपल्या गरजेनुसार स्क्रीनचा वापर करणं, हे अधिक फायदेशीर ठरू शकतं. म्हणजे, जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हाच स्क्रीनचा वापर करायचा आणि गरज नसेल तेव्हा स्क्रीनपासून दूर राहायचं.

हे वाचलंत का?