जगातील सर्वांत महाग आणि सर्वांत भयंकर विषाच्या शोधातली 'ती' रात्र

विंचू
    • Author, उमर नांगिआना
    • Role, बीबीसी उर्दू

काट्यानं काटा काढणं, विषावर विषाचा उतारा हे वाक्प्रचार आपण एरवी वापरत असतो. मात्र वैद्यकीय आणि औषध निर्मितीच्या क्षेत्रात याचा गोष्टीचा शब्दश: वापर केला जातो.

साप आणि विंचवाच्या विषाबद्दल आपण ऐकलं असेल. पाकिस्तानातील संशोधकांचा एक गट जगातील सर्वांत विषारी विंचवाच्या विषातून जीवरक्षक औषधाची निर्मिती करण्यासाठीचं संशोधन करत आहे.

बीबीसी उर्दूचे पत्रकार उमर नांगियाना हे संशोधकांच्या टीमसोबत अभ्यास दौऱ्यावर गेले. त्यांचं संशोधन कसं असतं? याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला. त्यानंतर, हा प्रयोग का महत्त्वाचा आहे यावर त्यांनी हा लेख लिहिला आहे. त्या संशोधनाविषयी...

मी माझ्या व्हॅनमधून बाहेर पाय ठेवला. बाहेर पूर्ण काळोख होता आणि मोकळी हवा होती. माझ्या पायाला खडकाळ जमिनीचा आणि अधूनमधून भुसभुसशीत जमिनीचा स्पर्श जाणवत होता.

सावधपणे चालताना, माझ्या पुढे चालत असणाऱ्या तिघांनी अल्ट्राव्हायोलेट प्रकाश टाकणारे टॉर्च चालू केले. त्या तिघांनी आपल्या अवतीभोवतीच्या नापीक जमिनीची पाहणी सुरू केली.

प्रत्येक माणसाच्या हाती एक मोठा चिमटा (Forceps) होता आणि पायात घोट्यापर्यंत उंचीचे बूट होते. सर्वांनीच लांब बाह्यांचे शर्ट आणि युव्ही प्रोटेक्शन गॉगल्स घातले होते.

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधीक फोटो

ही माणसं संशोधक आहेत. पाकिस्तानातील लाहोरमधील युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशन (University of Education, Lahore) मधील ते संशोधक आहेत.

पाकिस्तानच्या मध्यवर्ती भागात तौंसा शहराजवळील कोह-ए-सुलेमान पर्वतरांगाच्या पायथ्याच्या परिसरात आम्ही आहोत.

विंचू आणि विषारी साप मिळण्यासाठीचं हे एक आदर्श ठिकाण आहे.

"इथे ते प्रचंड संख्येनं आहेत आणि त्यामुळेच आम्ही या ठिकाणी आलो आहोत," असं हळूहळू पुढे सरकताना डॉ. मोहसिन अहसान मला सांगतात.

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधीक फोटो

संशोधनासाठी विषाचा वापर

डॉ. अहसान आणि त्यांची टीम पाकिस्तान सापडणाऱ्या काही अत्यंत विषारी, प्राणघातक विंचवाच्या शोधात आहेत. या विषारी विंचूंच्या विषाचा उपयोग ते त्यांच्या वैद्यकीय संशोधनासाठी करणार आहेत.

सर्वच वैज्ञानिक (डॉ. अहसान आणि त्यांची टीम) अत्यंत अनुभवी आहेत. हे वैज्ञानिक मागील 10 वर्षांहून अधिक काळापासून विंचू पकडत आहेत.

अत्यंत उष्ण अशा प्रदेशात प्रवास करण्याचा धोका, सर्पदंशाचे धोके किंवा काळ्या जाड शेपटीच्या विंचवाच्या प्राणघातक डंखाची तमा न बाळगता ते हे काम करत आहेत.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

या अत्यंत विषारी विंचवाच्या विषाचा परिणाम थेट मज्जासंस्थेवर (nervous system) होतो.

विंचवानं डंख केलेल्या व्यक्तीची रोगप्रतिकार क्षमता कमकुवत असेल तर या विषामुळे अर्धांगवायू (paralysis) होतो आणि श्वसनसंस्था बंद (respiratory failure) पडते.

"मात्र आमच्यासाठी ही सर्वांत महत्त्वाची प्रजाती आहे. या विंचवाच्या विषाच्या गुणवत्तेमुळे ही प्रजाती मोलाची आहे," असं डॉ. अहसान सांगतात.

कसे पकडतात विषारी विंचू?

आज अमावस्येची रात्र आहे आणि अशी स्थिती विंचू पकडण्यासाठी आदर्श असते, असं ते पुढे म्हणतात.

सूर्य मावळल्यानंतर विंचू त्यांच्या बिळातून बाहेर पडतात आणि तीन ते चार तास शिकार करतात. ते कीटक आणि अपृष्ठवंशी प्राण्यांची ( invertebrates) शिकार करतात.

काही मिनिटांनंतर एका वैज्ञानिकानं टॉर्चचा इशारा केला. ते पाहून सर्व वैज्ञानिक एकत्र येतात. त्यांच्या टॉर्चच्या युव्ही रेजच्या वर्तुळाखाली एक छोटी वस्तू हिरव्या रंगानं चमकत होती.

"तो काळा जाड शेपटीचा विंचू आहे," डॉ. अहसान यांनी त्याला पाहताच सगळ्यांना सांगितलं. ते विंचू बारकाईनं पाहण्यासाठी खाली वाकले.

मोठी नांगी आणि जाडजूड शेपटी असणारा तो जवळपास 10 सेंटीमीटर लांबीचा मोठा विंचू आहे. त्याच्या डंखाच्या अगदी मागच्या बाजूस विषाची काळी पिशवी असते.

प्रकाशात तो त्यांच्या नांगीच्या सहाय्यानं पाकोळीसारखा कीटक पकडतो. वेगानं त्याला डंक मारून त्याच्या हालचाली थांबवतो आणि त्यानंतर त्याच्या शिकारीसह त्याच्या बिळात अदृश्य होतो.

ही सर्व घडामोड फक्त काही सेकंदातच होते.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

डॉ. अहसान म्हणतात की सर्व विंचू युव्ही रेजमध्ये चमकतात. कारण त्यांच्या शरीरावरील टणक कवचात हायअॅलिन (hyalin) नावाचा पदार्थ असतो. त्यामुळेच ते प्रकाशात चमकतात.

डॉ. अहसान विंचवाचं बीळ खोदतात. काही चिमट्यांच्या मदतीनं तो विंचू उचलतात आणि एका डब्यात ठेवतात. एवढं सगळं होत असताना तो विंचू त्याची शिकार मात्र सोडत नाही.

मध्यरात्रीपर्यंत हा शोध सुरू राहतो. या कालावधीत डॉ. अहसान यांची टीम एक डझनापेक्षा अधिक विंचू पकडते. यात भारतीय लाल विंचू आणि अरबी विंचू तसंच काळा जाड शेपटीचा विंचू या प्रजातींचा समावेश असतो.

या खेपेस कोणताही अपघात होत नाही. किंबहुना त्यांचा हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून फक्त एकच गंभीर प्रकरण घडलं आहे. ते म्हणजे एका पी. एच. डी करणाऱ्या विद्यार्थ्यांला एक पिवळा जाड शेपटीचा विंचू चावला होता.

ग्राफिक्स

या बातम्याही वाचा :

ग्राफिक्स

हा विंचू अॅंड्रोक्टोनस प्रजातीचा (Androctonus family) होता. काळा जाड शेपटीचा विंचू देखील याच प्रजातीचा असतो.

"त्या विद्यार्थ्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं. सुदैवानं त्याला झालेला विंचवाचा दंश फार गंभीर नव्हता," असं डॉ. मोहम्मद ताहिर सांगतात. ते विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत.

"विंचवानं जिथे त्याला डंख मारला होता तिथे आम्ही बर्फ लावला आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्याला वेदनाशामक गोळ्या दिल्या," असं ते पुढे सांगतात.

विंचवाच्या विषावर उतारा किंवा औषध अस्तित्वात आहे. मात्र पाकिस्तानात ते सहजपणे उपलब्ध नाही.

'जगातील सर्वांत महागडा द्रव'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

विंचवाचं विष हे जगातील सर्वांत महागड्या द्रव्यांपैकी एक आहे, असं डॉ. ताहिर यांनी मला सांगितलं.

"काही बातम्यांमधून असं दिसून आलं आहे की विंचूच्या एक लिटर विषासाठी आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो डॉलर्स मिळू शकतात," असं ते म्हणतात.

त्यामागचं एक कारण म्हणजे हे विष मिळवणं खूप कठीण आहे.

विद्यापीठाच्या फैसलाबाद कॅम्पसमध्ये पकडण्यात आलेले विंचू वेगवेगळ्या डब्यांमध्ये ठेवण्यात आले आहेत. कारण हे विंचू एकमेकांनाच खातात. त्यांना सरावण्यासाठी काही दिवसांचा अवधी दिला जातो.

त्यानंतर त्यांचं विष काढलं जातं. एका वेळेस फक्त छोटासा थेंब इतकंच हे विष मिळतं.

हे विष इतकं कमी प्रमाणात असतं किंवा विषाचा तो थेंब इतका छोटा असतो की डझनभर विंचूंमधून एकावेळी मिळालेलं विष हे फक्त काही मायक्रोग्रॅम इतकंच असतं. हे विष उणे 86 अंश सेल्सिअस (-86 C) तापमानात खास प्रकारच्या फ्रिझर्समध्ये ठेवावं लागतं.

अर्थातच हा अत्यंत मौल्यवान द्रवपदार्थ विक्रीसाठी नसतो. विद्यापीठाच्या या प्रकल्पाला सरकारची मंजूरी आहे. विद्यापीठ त्यांच्या संशोधनासाठी या विषाचा वापर करतं किंवा पाकिस्तान आणि परदेशातील इतर सहयोगी संस्थांना देतं.

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधीक फोटो

पाकिस्तानात विंचवाचे इतर शिकारी देखील आहेत. हे शिकारी म्हणजे तस्कर. ते गावकऱ्यांना फसवून जवळपास फुकटातच हे विष मिळवतात.

"या लोकांना सांगितलं जातं की त्यांनी जर 80 ग्रॅम किंवा 100 ग्रॅम वजनाचा विंचू पकडला तर त्यांना बक्षिस म्हणून लाखो रुपये दिले जातील," असं डॉ. अहसान सांगतात.

प्रत्यक्षात या आकाराचे विंचू अस्तित्वात नसतात. मात्र बहुतांश ग्रामस्थांना या गोष्टीची कल्पना नसते, असं ते पुढे सांगतात.

चटकन पैसे मिळतील या आशेनं गावकरी त्यांना सापडतील ते विंचू पकडू लागतात. मात्र त्यांनी पकडलेल्या विंचूचं वजन साहजिकच तस्करांनी सांगितलेल्या वजनाएवढं नसतं. ते खूपच कमी असतं.

त्यामुळे विंचवाचं वजन कमी असल्याच्या सबबीखाली तस्कर गावकऱ्यांना फार थोडे, फक्त काहीशे रुपये देतात.

"मग ते तस्कर हे विंचू ठेवून घेतात आणि पाकिस्तानबाहेर काळ्या बाजारात त्यांची विक्री करतात. तिथे औषधनिर्मिती कंपन्या, संशोधन करणारे लोक आणि इतर काही लोक ज्यांना हे विंचू पाळीव प्राणी म्हणून ठेवायचे असतात, हे विष विकत घेतात," असं डॉ. अहसान म्हणतात.

विषाचे अनेक औषधी गुण आणि फायदे

हा एक मोठा विरोधाभासच आहे की जरी हे विंचूचं विष प्रचंड विषारी असतं तरी औषधांमधील वापरासाठी मात्र ते अत्यंत उपयुक्त असतं.

डॉ. अहसान म्हणतात की विद्यापीठानं अल्बिनो उंदरांवर चाचण्या केल्या आहेत.

त्यातून असं दिसून आलं की या विषात असणारी विशिष्ट प्रकारची संयुगं कर्करोगाच्या पेशींशी लढण्यासाठी किंवा त्यावरील उपचारासाठी उपयुक्त ठरू शकतात. या संयुगांमुळे कर्करोगांच्या पेशींची वाढ थांबवता येऊ शकते आणि त्या पेशी मृत देखील होऊ शकतात.

एकदा का यासंदर्भातील संशोधन पूर्ण झालं की डॉ. अहसान आणि त्यांच्या टीमला त्यांच्या संशोधनातून समोर आलेले निष्कर्ष आंतरराष्ट्रीय जर्नल (विज्ञान मासिक) मध्ये प्रकाशित करायचे आहेत.

डॉ. ताहिर सांगतात की हे विष वेदनेसंदर्भात देखील उपयुक्त ठरू शकतं.

युव्ही रेज टॉर्च घेऊन विंचवाच्या शोधात निघालेले संशोधक
फोटो कॅप्शन, युव्ही रेज टॉर्च घेऊन विंचवाच्या शोधात निघालेले संशोधक

"काही प्रकारच्या विषात पेप्टाइड (Peptides) (गुंतागुंतीचे रासायनिक रेणू) असतात. ज्यामुळे मज्जासंस्थेतील वेदनेच्या संदेशांना रोखता येऊ शकतं. यामुळे तीव्र किंवा प्रचंड वेदना थांबवण्यासाठी हा अत्यंत चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकतो," असं ते म्हणतात.

विषातील पेप्टाइडमध्ये इन्फ्लेमेशन (inflammation) कमी करण्याचीही क्षमता असल्याचं आढळून आलं आहे.

जी सी लाहोर विद्यापीठातील (GC Lahore University)संशोधकांची एक टीम या पेप्टाइड रेणूंना विषातून वेगळं करते आणि ते कसं काम करतात हे पाहण्यासाठी चाचण्या करते.

डॉ. ताहिर म्हणतात की "या संशोधकांना या चाचण्यांमधून अतिशय आश्वासक निष्कर्ष मिळाले आहेत. भविष्यात या संशोधनामुळे नवीन अॅंटि-इन्फ्लेमेटरी औषधे तयार करता येतील अशी त्यांना आशा वाटते."

डॉ. ताहिर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असलेली संशोधकांची एक टीम विंचूच्या डंकावर उतारा किंवा औषध विकसित करण्याचाही प्रयत्न करते आहे.

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधीक फोटो

पाकिस्तानच्या विशिष्ट प्रदेशात सापडलेल्या विंचूच्या प्रजातींची ते ओळख पटवत आहेत आणि जिओ-टॅगिंग (geo-tag) करत आहेत.

(जिओ-टॅग करणं म्हणजे यात विंचूचे फोटो, व्हिडिओ इत्यादी डिजिटल स्वरुपातील माहितीला भौगोलिक स्थान किंवा लोकेशन जोडणं)

त्यानंतर या विंचवाचे विष प्राण्यांमध्ये टोचून त्या विषाचा विषारीपणा किंवा तीव्रता निश्चित केली जाते.

डॉ. ताहिर म्हणाले की, "एकदा का आम्ही एखाद्या विशिष्ट प्रजातीच्या विंचूच्या विषाची तीव्रता किंवा विषारीपणा निश्चित केला की मग आम्ही तो विंचू ज्या प्रदेशातील असेल तिथल्या विशिष्ट वनस्पती आणि तण घेतो."

"त्यानंतर त्या विशिष्ट प्रजातीच्या विंचूच्या विषावरील उतारा किंवा औषध आम्ही तयार करतो."

मग या संभाव्य उतारा किंवा औषधाची ते प्रभावी आहे की नाही हे तपासण्यासाठी चाचणी केली जाते.

संशोधकांच्या या टीमला आशा वाटते की त्यांच्या संशोधन कार्यामुळे एक दिवस पाकिस्तानात जीवरक्षक औषधे (life-saving antidotes) उपलब्ध होतील.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)