साप शेपटीतून आवाज का काढतो?

फोटो स्रोत, TOBIAS KOHL
- Author, मॅट मॅग्रा
- Role, पर्यावरण प्रतिनिधी
जवळ असल्याची चाहूल लागावी यासाठी रॅटलस्नेकने (शेपटीतून खुळखुळ्यासारखा आवाज करणारा साप) युक्ती शोधून काढल्याचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे.
रॅटलस्नेकची शेपटी एरव्हीही हलत असते मात्र माणूस जसं सापाच्या जवळ जातो तसं शेपटीच्या आवाजाची तीव्रता वाढते असं शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं आहे.
चाचण्यांमध्ये असं दिसून आलं की शेपटीच्या आवाजात वेगाने बदल झाल्याने सहभागी लोकांना रॅटलस्नेक खूप जवळ आल्यासारखं वाटलं मात्र प्रत्यक्षात तो लांबच होता.
सापांनी हे शेपटीचं तंत्र विकसित केलं आहे जेणेकरून माणसाकडून तुडवले जाऊ नयेत.
रॅटलस्नेक शेपटीचा आवाज चित्रपटांच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग आहे.
सरपटणाऱ्या प्राण्यांच्या शेपटीच्या टोकावर केराटिनचा जाड थर असतो. आपली नखं आणि केसांमध्ये केराटिन असतं.
रॅटलस्नेक सेकंदाला 90 वेळा शेपटी जोरजोरात हलवतो हे त्याचं वैशिष्ट्य आहे.
वेगाने होणारी शेपटीची हालचाल अन्य प्राण्यांना इशारा देण्यासाठी तसंच माणसाला सावध करण्यासाठी असते.

फोटो स्रोत, Getty Images
रॅटलस्नेक चावून अमेरिकेत दरवर्षी साधारणत: 8000 लोकांना त्रास होतो. शेपटीची हालचाल वेगाने वाढते हे शास्त्रज्ञांना अनेक दशकं माहिती होतं मात्र शेपटीच्या आवाजातही बदल होते यासंदर्भात फारसं संशोधन झालेलं नाही.
या संशोधनात, शास्त्रज्ञांनी माणसाचा भासेल असा कृत्रिम अवयव वेस्टर्न डायमंडबॅक रॅटलस्नेकच्या जवळ नेण्यात आलं. रॅटलस्नेक काय प्रतिसाद देतो ते टिपण्यात आलं.
तो कृत्रिम अवयव रॅटलस्नेकच्या जवळ गेला तसं शेपटीच्या हलण्याचा आवाज 40hzने वाढला. आणखी काही सेकंदात शेपटीच्या आवाजाची तीव्रता वाढून 60-100hz एवढी झाली.
या बदलाचा नेमका अर्थ समजून घेण्यासाठी संशोधकांनी सहभागी माणसं आणि खोटा साप असा प्रयोग केला.

फोटो स्रोत, Getty Images
शेपटीच्या वाढणाऱ्या हालचालीबरोबर आवाज वाढू लागला जसं सहभागी माणसं सापाच्या जवळ जाऊ लागली. तसा सहभागी चार मीटर अंतरावर असताना शेपटीच्या हालचालीचा आवाज अचानक प्रचंड वाढला. तो इतका वाढला की साप एक मीटर अंतरावर आहे असं त्यांना वाटलं.
आवाजातला बदल हा केवळ इशारा नव्हता तर आंतरप्रजातीय गुंतागुंतीचा संदेश होता असं शास्त्रज्ञांना वाटतं.
शेपटीच्या हालचालीच्या आवाजाची तीव्रता वाढवणं हे चतुर असं लक्षण आहे. समोर येणाऱ्या माणसाला किंवा अन्य कोणालाही रॅटलस्नेक नेमका किती अंतरावर आहे हे कळू नये यासाठी त्यांनी हे तंत्र विकसित केलं आहे असं ऑस्ट्रियातील ग्राझ इथल्या कार्ल-फ्रेझन्स विद्यापीठातील ज्येष्ठ लेखक बोरिस चंगुड यांनी सांगितलं.
अंतराबद्दल गैरसमज निर्माण होण्यातून रॅटलस्नेक आपल्याभोवती सुरक्षा कवच निर्माण करतात.
रॅटलस्नेक माणसाच्या श्रवण व्यवस्थेचा फायदा उठवतात. आवाजाची तीव्रता वाढली म्हणजे संबंधित आवाज जवळच्या अंतरावर आहे असं माणसाच्या मेंदूला विकसित असल्यामुळे कळतं. याचा फायदा रॅटलस्नेकनी उठवला आहे.
उत्क्रांती ही बदलाची कूर्मगतीने होणारी प्रक्रिया आहे. आता रॅटलस्नेकच्या माध्यमातून आपल्याला जे कळलं आहे ते एकप्रकारे सापांनी बदलतल्या जगाशी जुळवून घेण्यासाठी रचनेत केलेला बदलच आहे.
सस्तन प्राण्यांमध्ये रॅटल स्नेकच्या खवल्यांच्या घर्षणाच्या आवाजाची जाणीव चुकतमाकत विकसित झाली, त्यामुळे या सापावर पाय पडणे टाळता आले.
करंट बायॉलॉजी नावाच्या शोधपत्रिकेत हे संशोधन छापून आलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








