बालासोरला शवागाराबाहेर लोक त्यांच्या नातेवाईकांच्या मृतदेहाची वाट पाहतायेत...

ओडिशा
    • Author, अमिताभ भट्टासाली
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, बालासोर

ओडिशाच्या बालासोरच्या जिल्हा रुग्णालयात मी जेव्हा दुपारी पोहोचलो, तेव्हा हॉस्पिटलचं शवागार कुठे आहे, हे मी लोकांना विचारलं.

जेव्हा मी शवागाराच्या जवळ गेलो, तेव्हा तिथे अनेक महिला, पुरुष आणि युवक दिसले. आतून कोणीतरी आवाज देण्याची ते वाट पाहत होते.

यातले काही लोक मृतकांची ओळख पटवायला आले होते, तर काही मृतदेह ताब्यात घ्यायला.

ही हाक अशी होती ज्या हाकेला कोणालाच 'ओ' द्यायचा नव्हता. मात्र ती टाळता येणार नाही हेही त्यांना मनोमन समजलं होतं.

संतोष कुमार साहू यांना शुक्रवारी एक फोन आला जो त्यांना अत्यंत अनपेक्षित होता. तो त्यांच्या सासरहून आला होताय

त्यांना कळलं की त्यांचे कोणी नातेवाईक शालिमार कोरोमंडल एक्सप्रेसमध्ये प्रवास करत होते जी मालगाडीला धडकली. हा अपघात देशातल्या सर्वात भयानक अपघातापैकी एक आहे.

‘एकही वाहन मिळालं नाही.’

या अपघातात आतापर्यंत 275 लोकांनी त्यांचा जीव गमावला आहे.

साहू सांगतात, “माझ्या मेहुणा बालासोर जिल्ह्यात काम करायचा. दर वीकेंडला तो जयपूरला त्याच्या घरी जायचा. अनेक वर्षांपासून तो हे काम करत होता.”

साहू शुक्रवारी रात्रीच बालासोर जिल्हा रुग्णालयात पोहोचणार होते. मात्र त्यांना तिथे जायला कोणतंच वाहन मिळालं नाही. शनिवारी सकाळी त्यांना एक कार मिळाली. मग ते घटनास्थळावर पोहोचले. ते त्यांच्या नातेवाईकाचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी शवागाराच्या बाहेर उभे होते.

ओडिशा

त्यांच्यासारखाच आशीष नावाच्या व्यक्तीला मात्र ही अडचण आली नाही. ते आठ वाजताच जिल्हा रुग्णालयात पोहोचले होते. कारण ते हॉस्पिटलच्या जवळच्याच हॉस्टेलमध्ये राहतात.

साहू यांच्यासारखाच आशिष यांनाही रुग्णालयातून फोन आला होता. मात्र त्यांना फोन येण्याचं कारण वेगळं होतं.

‘वॉर्डपर्यंत जाणं कठीण झालं होतं.’

आशिष आणि 100 पेक्षा अधिक वैद्यकीय अभ्यासक्रमाला असलेल्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात बोलावण्यात आलं होतंय

बालासोर रुग्णालयाच्या इमरजन्सी वॉर्ड समोर आम्ही आशिष यांच्याशी बातचीत केली.

ते सांगतात, “गेल्या 24 तासात या जागेचं काय झालंय याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. आम्ही वॉर्डापर्यंत जाऊही शकलो नाही कारण तिथे जखमी झालेले लोक झोपले होते.”

“मी एका जखमी रुग्णावर उपचार करायला सुरुवात केली की दुसऱ्या रुग्णाकडून आवाज यायचा. सगळ्या विद्यार्थ्यांची गटा-गटात विभागणी करून त्यांना ज्येष्ठ डॉक्टरांच्या मदतीला ठेवलं होतं.”

पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनी, डॉक्टर, नर्स सगळ्यांना फोन करून किंवा सोशल मीडियावर पोस्ट करून बोलावण्यात आलं.

बालासोर जिल्हा रुग्णालयात पायाभूत सुविधा फारशा नाहीत. त्यामुळे इतक्या रुग्णांना सांभाळणं कठीण झालं होतं.

वॉर्डात पायाभूत सुविधा कमी असल्याचं स्पष्ट दिसत होतं. रेल्वे अपघातात जखमी झालेले लोक फरशीवर झोपून होते. काही शुद्धीवर होते काही बेशुद्ध. जे लोक शुद्धीवर होते त्यांना प्रचंड वेदना होत होत्या.

‘शुद्धीवर आलो तेव्हा मी मलब्याखाली होतो.”

जेव्हा आम्ही हॉस्पिटलच्या वॉर्डाच्या आत गेलो तेव्हा आमची भेट ऋत्विक पात्रा यांच्याशी झाली. ते कोरोमंडल एक्सप्रेसने चेन्नईला जात होते. त्यांच्या डोक्याला रक्ताळलेली पट्टी आणि पायाला प्लॅस्टर लागलं होतं. ते फक्त पलंगावर होते. इतर जखमी जमिनीवरच होते.

“एक मोठा स्फोट झाला, आमची ट्रेन उलटली इतकंच मला आठवतं. मी शुद्धीत होतो मात्र मलब्याखाली दबलो होतो. मलब्याखालून माझ्यासारखे अनेक लोक होते.” पात्रा सांगत होते.

ओडिशा

ऋत्विक पात्रा चेन्नईला जात होते तर पंकज पासवान दक्षिण भारतातून बिहारला त्यांच्या घरी जात होते.

पंकज यशवंतपूर- हावडा एक्सप्रेसने जात होते. ते म्हणाले, “मला आठवत नाही काय झालं. मी स्वत:च मलब्याच्या बाहेर आलो. नंतर मी ऐकलं की आमची गाडी मालगाडीला धडकली आहे.”

कोरोमंडल एक्सप्रेसचे काही डबे अनारक्षित होते अशी माहिती आम्हाला मिळाली. जेव्हा एखाद्या व्यक्तीला ऑन स्पॉट कुठे प्रवासाला जायचं असेल तेव्हा त्याला अशा डब्यात जागा मिळते.

सामान्य लोकांनीही मदतीचा हात पुढे केला

या डब्यात प्रवास करणाऱ्या लोकांचं नाव आणि त्यांची माहिती रेल्वे रेकॉर्डमध्ये नोंदवली जात नाही. त्यामुळेच 160 पेक्षा जास्त मृतदेहांची ओळख पटवण्यात आलेली नाही.

घटनाक्रम काहीही असला तरी बालासोर जिल्ह्यात पायाभूत सुविधा फारशा नाहीत हे स्पष्ट होतं.

ओडिशा

अशा परिस्थितीत मोठ्या आणि इतर सुविधा असणाऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आलाय

एनजीओमध्ये काम करणारे समीर जठानिया शुक्रवारी झालेल्या रेल्वे अपघातानंतर रुग्णांची मदत करत आहेत.

ते सांगतात, “गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना शिफ्ट करण्याचा निर्णय चांगला आहे. या रुग्णालयात इतक्या रुग्णांवर इलाज करण्याइतक्या पायाभूत सोयी नाहीत.

ओडिशा

जठानिया पुढे म्हणाले, “घटनेची माहिती मिळाल्यावर सामान्य लोक मदतीला यायला सुरुवात झाली. सुरुवातीला सगळीकडे अफरातफरीचं वातावरण होतं. एकामागोमाग एक रुग्णवाहिका रुग्णांना घेऊन जात होत्या. पीडितांचे नातेवाईक इकडे तिकडे पळत होते.”

“काही तासांच्या आतच मदत करण्यासाठी स्वयंसेवक आले होते. त्यांनी जखमी लोकांना सामान आणि पाणी द्यायला सुरुवात केली. आम्ही लोकांना औषधं वाटायला सुरुवात केली होती. किमान 300 लोक रक्तदान करायला उभे होते.”

शनिवारी पहाटे तीन वाजेपर्यंत रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचं काम सुरू झालं होतं.

मेडिकलचे विद्यार्थी आशिष आणि एनजीओ कार्यकर्ता समीर जठानिया म्हणाले की जखमी लोकांना कटकला पाठवण्याचा निर्णय चांगला होता.

मात्र गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना चांगल्या रुग्णालयात नेलं मात्र व्हीव्हीआयपी लोकांची रीघ लागली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)