बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख

फोटो स्रोत, Getty Images
नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.
आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील.पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.
तर मंडळी काळजी नको.आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.
बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.
राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत..
1. इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय? आयकर परतावा कसा भरायचा?
जून-जुलै महिना आला की पावसासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट येते. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) म्हणजे आयकर परतावा भरण्याची मुदत.
दरवर्षी 31 जुलैपर्यंत हा आयकर परतावा दाखल करणं अपेक्षित असतं. पण जेवढं लवकर ही प्रक्रिया पूर्ण करता येईल, तेवढं बरंच नाही का?
तर इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय, ते का भरायला हवं आणि त्यासाठीची ऑनलाईन प्रक्रिया काय आहे, जाणून घेऊयात.
सोप्या शब्दांत सांगायचं, तर इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे ITR हा एक फॉर्म आहे. या फॉर्मद्वारा तुम्ही भारतात केंद्र सरकारच्या आयकर विभागाला तुमच्या उत्पन्नाविषयी माहिती देता.
2. महात्मा गांधींना ‘राष्ट्रपिता’ ही पदवी कोणी दिली? त्यावरून आता का वाद होतोय?
मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच महात्मा गांधी, बापू किंवा राष्ट्रपिता. गेल्या कित्येक दशकांपासून ही सगळी नावं समानअर्थी आहेत.
त्यांचं पूर्ण नाव क्वचितच कोणी घेतलं असेल. जिना, सावरकर आणि डॉ आंबेडकर वगळता त्यांना कोणा महत्त्वाच्या भारतीय नेत्याने मिस्टर गांधी म्हटल्याचं ऐकिवात नाही.

फोटो स्रोत, Getty Images
जवाहरलाल नेहरू आणि वल्लभभाई पटेल त्यांच्या पत्रात ‘डियर बापूजी’ असा मायना लिहायचे.
गुजराती वळणानुसार गांधींचे पुत्र आणि अन्य जवळचे लोक त्यांना ‘बापूजी’ म्हणायचे. काँग्रेसच्या तरुण नेत्यांनी हे संबोधन वापरायला सुरुवात केली.
त्यांच्या पत्नी कस्तूर आफ्रिकेतच सगळ्यांच्या ‘बा’ बनल्या होत्या. हेच संबोधन त्यांच्या नावात जोडलं गेलं आणि त्या कस्तुरबा या नावाने ओळखल्या जायला लागल्या.
पण आजकाल महात्मा गांधींचं ‘राष्ट्रपिता’ हे संबोधन वादग्रस्त ठरलंय. उजव्या विचारसरणीचे लोक नेहमी प्रश्न विचारतात की गांधी ‘राष्ट्रपिता’ कसे असू शकतात?
3. जग जिंकायला निघालेला सिकंदर पोरसचा पराभव करूनही गंगा नदीपर्यंत पोहोचू शकला नाही
ग्रीक तत्ववेत्ता आणि इतिहासकार प्लुटार्कने सिकंदराचं (अलेक्झांडर) वर्णन करताना लिहिलंय की, तो रंगाने जरी गोरा असला तरी त्यांची कांती लाल होती.
एखाद्या सामान्य मॅसेडोनियनपेक्षा उंचीने लहान असणाऱ्या सिकंदराने युद्धभूमीवर मात्र मोठा पराक्रम गाजवला. सिकंदराने त्याच्या चेहऱ्यावर कधी दाढी मिशा राखल्या नाहीत, त्याचा चेहरा चौकोनी भासायचा आणि त्याच्या डोळ्यांमध्ये एक अजबच दृढनिश्चय दिसून यायचा.

फोटो स्रोत, Getty Images
मार्कस कर्टिअसने सिकंदराच्या चरित्रात 'हिस्ट्री ऑफ अलेक्झांडर'मध्ये लिहिलंय की, "त्याचे केस सोनेरी आणि कुरळे होते. त्याच्या दोन्ही डोळ्यांची बुबुळं वेगवेगळ्या रंगाची होती. त्याचा डावा डोळा राखाडी आणि उजवा डोळा काळा होता. त्याच्या डोळ्यात इतकं तेज होतं की, समोरचा त्याला बघूनच घाबरायचा.
सिकंदर नेहमीच होमरचं 'इलियड ऑफ द कास्केट' नावाचं पुस्तक आपल्या सोबत घेऊन वावरायचा. एवढंच नाही तर रात्री झोपताना देखील तो हे पुस्तक आपल्या उशाखाली ठेवायचा."
4. अस्पार्टेमः तुमच्या कोल्ड्रिंकमधल्या या घटकामुळे कॅन्सर होतो का?
अस्पार्टेम हे स्वीटनर अनेक पदार्थांमध्ये आणि अनेक फेसाळ पेयांत असतं. हे स्वीटनर कर्करोगाचं कारण ठरू शकेल (possibly carcinogenic) अशा पदार्थांत त्यांचा समावेश होणार आहे, असं काही अहवालांत आलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
possibly carcinogenic हा वर्ग नेहमीच गोंधळात टाकत आला आहे कारण त्यामुळे माणसाला असणारा संभाव्य धोका लहान असेल की गंभीर हे कधीच लक्षात येत नाही.
possibly carcinogenic मध्ये कोरफड, डिझेल आणि आशियाई भाज्यांची लोणची किंवा मुरवलेल्या भाज्यांचा समावेश केला जातो.
5. स्टीव्हन स्मिथ : एकेकाळी जाहीरपणे ढसाढसा रडणारा खेळाडू असा झाला 100 कसोटींचा मनसबदार
लेगस्पिनर म्हणून कसोटी कारकीर्दीची सुरुवात केलेला स्टीव्हन स्मिथ आज शंभरावी कसोटी खेळतो आहे. आधुनिक क्रिकेटच्या शिलेदारांमध्ये स्मिथचा समावेश होतो.
एकाच कालखंडात आपापल्या संघासाठी दिमाखदार प्रदर्शन करणाऱ्या फॅब फोर या चौकडीत जो रुट, विराट कोहली, केन विल्यमसन यांच्याबरोबरीने स्मिथचा समावेश होतो.

फोटो स्रोत, Getty Images
विशेषज्ञ फलंदाज म्हणून खेळायला लागल्यापासून स्मिथ धावांच्या राशी ओततो आहे. कसोटी प्रकारातील स्मिथची सरासरी 50च्या घरात आहे. विदेशात अवघड खेळपट्ट्यांवर धावा करत राहण्याची स्मिथची हातोटी विलक्षण आहे.
100 कसोटी खेळणारा स्मिथ एकूण 75वा तर ऑस्ट्रेलियाचा 16वा खेळाडू ठरला आहे. पण स्मिथची कारकीर्द खाचखळग्यांनी भरलेली होती. जाणून घेऊया स्मिथचा इथपर्यंतचा प्रवास.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








