You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
झोप आणि महिलांच्या सेक्स लाईफचा असा आहे संबंध
झोप हा आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. रोजची झोप पूर्ण न झाल्यास अनेक समस्या निर्माण होतातच, पण लैंगिक आयुष्यावरही त्याचा परिणाम होतो असा शोध लागला आहे.
बिहेव्हिरयल सायंटिस्ट डॉ. वेंडी ट्राक्सेल यांनी हा शोध लावला आहे. झोपेचा थेट परिणाम जोडप्याच्या आरोग्यावर आणि लैंगिक जीवनावर होतो.
वेंडी गेल्या 15 वर्षांपासून झोप या विषयाचा अभ्यास करत आहेत आणि जोडप्याच्या झोपण्याच्या पद्धतींवर संशोधन करत आहेत. त्यांच्या मते झोप ही फक्त एकट्याची नसते. तर जोडप्याच्या वागणुकीचाच एक प्रकार आहे.
"मी झोप या विषयावर गेल्या 15 वर्षांपासून काम करतेय आणि हा आरोग्याशी निगडीत विषय आहे, चांगली झोप हा जोडप्यांशी निगडीत विषय आहे. तरीही बहुतांश संशोधनात झोप हा व्यक्तिपरत्वे बदलत जाणारा विषय आहे असं मानलं जातं," असं त्या सांगतात.
जर तुमची झोप चांगली झाली नाही तर तुम्ही चांगला जोडीदार होऊ शकत नाही. तुम्ही मूडी होता, तुम्हाला नैराश्य येण्याची दाट शक्यता आहे. तुमची भांडणं होऊ शकतात, संवादावर परिणाम होऊ शकतो.
तुमची संवेदनशीलता कमी होते आणि तुमच्या जोडीदाराच्या भावना ओळखता येत नाहीत. तसंच झोपेचा परिणाम फक्त तुमच्याच नाही तर तुमच्या आयुष्यावरही येतो असं त्या पुढे म्हणतात.
चांगली झोप म्हणजे चांगला सेक्स
चांगली झोप म्हणजेच चांगला सेक्स हे आधी लक्षात घ्यायला हवं. यामागे अनेक कारणं आहेत. कारण सध्याच्या समाजजीवनात झोप हा अत्यंत दुर्लक्षित विषय होत आहे.
प्रत्येकाला चांगली झोप हवी असते, प्रत्येक जण त्याविषयी बोलत असतो आणि सोशल मीडियावरील ज्या मित्र मैत्रिणींना चांगली झोप येते त्यांचा हेवा वाटतो.
झोपेचा लैंगिक क्रियांशी, लैंगिक संप्रेरकांशी, आणि एकूणच लैंगिक आयुष्याशी थेट संबंध आहे.
मुलांच्या लैंगिक आरोग्यांशी निगडीत एका अभ्यासात असं समोर आलं आहे की पुरुष सलग काही दिवस चार तासांपेक्षा कमी झोपला तर त्यांच्या टेस्टोस्टिरॉन या संप्रेरकात 10 टक्के घट होते.
ही घट म्हणजे 10 वर्षांनी वय कमी झाल्यासारखंच आहे. स्त्रियांच्या संप्रेरकांवरही त्याचा परिणाम होतो.
एका संशोधनानुसार स्त्रियांची झोप झाली तर त्यांच्या सेक्स करण्याच्या क्षमतेत 14 टक्क्यांनी वाढ होते. त्यामुळे झोप झाली की जोडप्यांच्या लैंगिक आयुष्यावरही परिणाम होतो.
निद्रानाश
काही संशोधनात असं समोर आलं आहे की जेव्हा व्यक्ती जोडीदाराबरोबर झोपते तेव्हा त्याची झोप तुलनेने जास्त चांगली होते.
झोपायची वेळ आणि झोपेचे तास योग्य असतील तर मानसिक, शारीरिक आणि लैंगिक आयुष्य प्रचंड प्रमाणात सुधारतं.
मात्र जोडप्यांपैकी एकाचीही झोप नीट झाली नसेल तर अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात.
एकाच्या सवयीमुळे दुसऱ्याची झोपमोड होण्याची दाट शक्यता असते. उदा, झोपण्याची पद्धत, संपूर्ण बेडवर झोपणं, घोरणं यामुळे झोपेत व्यत्यय निर्माण होण्याची दाट शक्यता असते.
जेव्हा काही आरोग्याच्या अडचणी निर्माण होतात, कधी लहान मुलांची तब्येत ठीक नसते तेव्हा झोपेवर त्याचा खचितच परिणाम होतो.
जास्त वयाच्या जोडप्यांमध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे झोपेच्या वेळेवर परिणाम होतो. निद्रानाश, मेनॉपॉज, अशा समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते.
खोलीचं तापमान आणि गादीचे प्रकार या गोष्टींवरही झोप अवलंबून असते. त्यामुळे शारीरिक, मानसिक आणि लैंगिक आरोग्य सुधारतं.