दीड लाख लोकांवर भूतविद्येचा प्रयोग करणारा धर्मोपदेशक, त्याने भूतांबद्दल काय म्हटलं?

लहानपणी गॅब्रिएल अमार्थ दर रविवारी कॅथोलिक मासमध्ये जात असत. रोमच्या उत्तरेस 400 किलोमीटर अंतरावरील मोडेना या इटालियन शहरात हे चर्चा होतं. पण धार्मिक विधींकडे लक्ष देण्याऐवजी गॅब्रिएल चर्चभोवती लपाछपी खेळण्याचा आनंद घेत असे.

शांत बसण्यासाठी आई जेव्हा गोड गोड मिठाई हातावर देत असे, तेव्हाच गॅब्रिएल शांत बसत असे. त्यावेळी त्याच्या आईला याची कणभरही कल्पना नव्हती की, हा खोडकर मुलगा ‘भूतं पळवून लावणारा’ जगातील सर्वात प्रसिद्ध व्यक्ती बनेल.

आतापर्यंत 1,60,000 हून अधिक भूतं पळवून लावल्याचा दावा गॅब्रिएल अमार्थ करतात. त्यांनी यावर आजवर अनेक पुस्तकंही लिहिलीत. आता तर ते नेटफ्लिक्सच्या डॉक्युमेंट्रीचाही विषय झालेत. तसंच, हॉलिवूडमधील ब्लॉकबस्टर सिनेमाचे नायकही बनलेत.

‘द पोप्स एक्झॉर्सिस्ट’ सिनेमा याच महिन्यात, एप्रिलच्या सात तारखेला जगभरात प्रदर्शित झालाय. गॅब्रिएल अमार्थ यांच्या ‘अॅन एक्झॉर्सिस्ट टेल्स हिज स्टोरी अँड अॅ एक्झॉर्सिस्ट : न्यू स्टोरीज’ या पुस्तकावर हा सिनेमा आधारित आहे.

गॅब्रिएल अमार्थ हे 16 सप्टेंबर 2016 रोजी वयाच्या 91 व्या वर्षी फुफ्फुसाच्या आजारानं निधन पावले.

आश्चर्यकारक नियुक्ती

1 मे 1925 रोजी गॅब्रिएल अमार्थ यांचा जन्म झाला. तरुण असताना ते नाझी सैन्याविरुद्ध दुसऱ्या महायुद्धात सहभागी झाले होते. त्यांना या शौर्याबद्दल पदक देऊन गौरवण्यातही आलं होतं.

कायदा आणि पत्रकारितेत गॅब्रिएल अमार्थ यांनी पदवी मिळवलीय. काही काळ ते ख्रिश्चन डेमोक्रॅट पक्षासोबत काम केलं. त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा होत्या. पण त्यापूर्वीच त्यांना धार्मिक क्षेत्रात भविष्य दिसलं.

1954 साली त्यांना धर्मोपदेशक म्हणून नियुक्त करण्यात आलं. मात्र, फादर अमार्थ हे वयाच्या 32 व्या वर्षी भूतांन पळवून लावणारे बनले. हा निर्णय घेणं केवळ माझ्यावर अवलंबून नव्हतं, असं त्यांनी म्हटल्याची नोंद आहे.

कार्डिनल उगो पोलेटी (1914 ते 1997) यांनी गॅब्रिएल अमार्थ यांची नियुक्ती केली होती. पोलेटी हे रोमचे व्हिकार जनरल म्हणून कार्यरत होते. भूतं पळवून लावण्याचे अधिकार काही धर्मोपदेशकांना देण्याचा त्यांना अधिकार होता.

1986 साली त्या दिवशी सकाळी गॅब्रिएल अमार्थ आधीपासून नियोजित नसतानाही कार्डिनल पोलेटी यांना भेटण्यासाठी आले. तिथे दोघांमध्ये झालेल्या संवादादरम्यान, फादर अमार्थ यांनी फादर कँडिडो अमांटिनी (1914 ते 1992) यांचं कौतुक केलं. अमांटिनी हे तेव्हा 36 वर्षे रोमच्या बिशपच्या अधिकारक्षेत्रात भूतं पळवून लावणार होते.

फादर अमॉर्थच्या म्हणण्यानुसार, कार्डिनल पोलेटीने मला तिथल्या तिथेच फादर अमांटिनी यांचे सहाय्यक म्हणून काम करण्यासाठी निवड केली.

झपाटल्याचे संकेत

काही दिवसांतच गॅब्रिएल अमार्थ यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केली. सुरुवात कॅथलिक धर्मातील भूतविद्येच्या 21 नियमांना लक्षात ठेवण्यापासून केली.

एखाद्या व्यक्तीमधील भूत पळवून लावण्याची प्रक्रिया जुन्या आणि नव्या करारात (टेस्टामेंट) नमूद करण्यात आलीय आणि व्हॅटिकननं अलिकडेच म्हणजे 1999 मध्ये यातल्या मार्गदर्शक तत्त्वे अद्ययावत केलीत.

गॅब्रिएल अमार्थ त्यांच्या पुस्तकात म्हणतात की, “आपल्याला भूतानं झपाटलंय, असं सांगणाऱ्या प्रत्येकाला भूतानं झपाटलेलं असतंच असं नाही. काहीजण मानसिक समस्यांनीही ग्रस्त असतात.”

“भूतबाधा झाल्याचा दावा करणारी व्यक्ती मानसोपचारतज्ज्ञाकडे गेली नसेल, तर मी भूतं पळवण्याच्या भानगडीत पडत नाही. सर्वप्रथम मला निदान पाहायचं असतं.”

कॅथलिक शिकवणीनुसार, ‘जेव्हा एखादी व्यक्ती तिला अवगत नसलेल्या भाषेत बोलते, ओळखत नसलेल्या व्यक्ती आणि माहित नसलेल्या घटनांबद्दल बोलते, ताकदीपेक्षा जास्त शारीरिक शक्ती दाखवते, तेव्हा संबंधित व्यक्तीला भूतबाधा झाल्याचं मानलं जातं.’

फादर अमार्थ दावा केला होता की, “भूतबाधित 11 वर्षीय मुलानं चार गुंडांच्या तावडीतून स्वत:ला सहजपणे सोडवलं होतं. या गुंडांना त्यानं अक्षरश: उडवून लावलं होतं.”

भूतबाधा झाल्याचं सर्वात मोठं लक्षण म्हणजे पवित्र गोष्टींचा तिरस्कार करणं, असं ते मानत. व्हॅटिकननं अशी शिफारस केली आहे की, एखाद्या चर्च किंवा इतर धार्मिक ठिकाणी भूत पळवून लावण्याची प्रक्रिया करावी.

जर भूतबाधित व्यक्ती आजारी असेल, तर त्याच्या घरी जाऊन विधी केले जाऊ शकतात. सुरक्षेचा उपाय म्हणून, त्या व्यक्तीला घराच्या बाहेर आणून आरामखुर्चीव किंवा स्ट्रेचरवर बसवून विधी केले जाऊ शकतात.

विधीदरम्यान भूतं पळवून लावणाऱ्यानं जास्त बोलू नये, अनावश्यक प्रश्न विचारू नये.

एक्झॉर्सिस्टने जास्त शब्दांमध्ये हरवून जाऊ नये किंवा अनावश्यक प्रश्न विचारू नये. संवादापेक्षा, भूतबाधा ही एक चौकशी आहे.

“तुझं नाव काय?”, “तू एकटा आहेस?” आणि “तू कधी निघून जाशील?” असे काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. भूतबाधित व्यक्तीला त्याचं नाव उघड करण्यास भाग पाडणं हा उद्देश भूतं पळवून लावणाऱ्याचा आहे.

आपलं नाव सांगणं, हे त्याच्यासाठी एखाद्या पराभवासारखं आहे, असं गॅब्रिएल अमार्थ यांनी म्हटलंय.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, भूत पळवून लावणाऱ्याने येशूच्या नावानं भूतबाधित व्यक्तीमधून भूताला बाहेर निघून जाण्याचा आदेश दिला पाहिजे.

पहिल्यांदा भूतविद्येचा वापर केला तेव्हा...

21 फेब्रुवारी 1987 रोजी फादर गॅब्रिएल अमार्थने पहिल्यांदा भूत पळवून लावण्याचा विधी पार पाडला. एका शेतकऱ्याला भूतबाधा झाल्याचा प्रकार फादर अमांटिनी यांच्या कानावर आला आणि त्यांनी नव्या मदतनीसाला म्हणजेच फादर अमार्थ यांना तिथं पाठवण्याचा निर्णय घेतला.

रोममधील पॉन्टिफिकल युनिव्हर्सिटी अँटोनिअनम येथे हा विधी पार पाडला गेला. तिथं एक धर्मोपदेशक, एक शेतकरी आणि अनुवादक उपस्थित होता.

अमार्थला सांगण्यात आलं की, भूतबाधित व्यक्ती ट्रान्समध्ये असताना इंग्रजीत बोलू लागतो आणि तेही शेक्सपियरच्या भाषेत.

दुसऱ्या एका प्रसंगी, अशिक्षित महिलेनं अमार्थला ओळखत नसल्यानं, त्याला उद्देशून अपशब्द उचारले.

असे अनेक चित्र-विचित्र अनुभवही गॅब्रिएल अमार्थ यांना या दरम्यान आले.

जखमी करणारा अनुभव

दरवेळी गॅब्रिएल अमार्थ यांना ‘छोटीशी भेट’ मिळतच असे. कधी पाठीवर ठोसा, कधी पोटावर ठोसा.

“एकदा तर एवढा मोठा ठोसा बसला की, 40 दिवस त्यातून बाहेर पडलो नाही,” असंही त्यांनी नोंदवून ठेवलंय.

अमार्थ यांनी सांगितलं की, माझ्यावर कितीवेळा थुंकलं गेलं, याची तर मोजदाद नाही. एकदा गिसेला नामक इटालियन नने नखं, स्क्रू आणि कात्री यांसारख्या धातूच्या वस्तू थुंकल्या होत्या.

भूत पळवणारे, ननने आणि इतर धार्मिक व्यक्तीही भूतबाधेपासून मुक्त नाहीत.

इटालियन पत्रकार मार्को तोसाटी म्हणतात, “अमार्थ त्याच्या संपूर्ण शरीरावर जखमांसह काही लढाईतून बाहेर आला.”

तोसाटी हे अमार्थ यांच्या काही पुस्तकांचे सहलेखकही आहेत.

“अमार्थ यांच्यावर आधारित सिनेमात अभिनेता रसेल क्रोने दाढी ठेवलीय. फादर अमार्थ कायम क्लीन शेव्ह करून असायचे. पण कुठल्याही प्रकारचं अंतिम मत व्यक्त करण्याआधी सिनेमा पाहू,” असंही तोसाटी म्हणतात.

भूतं पळवून लावणाऱ्यांची युनियन

उत्तम विनोद हे फादर गॅब्रिएल अमार्थ यांचं वैशिष्ट्य होतं. जेव्हा कुणी त्यांना सांगायचं की, ‘माझा देवावर विश्वास आहे, पण मी त्यासाठीच्या नियमित गोष्टी करत नाही’, तेव्हा अमार्थ उपहासाने म्हणत की, ‘अरे, होय! भूतंही असेच असतात, ते देवावर विश्वास ठेवतात, पण त्यादृष्टीने वागत नाहीत. किंबहुना, आस्तिक सैतानाला मी अद्याप कधीच भेटलो नाहीय.’

भूतांना पळवून लावणाऱ्यांची संघटना स्थापन करण्याचा 1991 मध्ये गॅब्रिएल अमार्थ यांचा मानस होता. रोमच्या बिशपच्या अख्त्यारितला भूत पळवून लावणारा म्हणून त्याला आपला हा मानस एका विशिष्ट कार्डिनलला सांगायचा होता. त्याचं नाव तो स्पष्टपणे सांगत नाही.

“तुम्ही त्या गोष्टींवर विश्वास ठेवता, असं मला वाटू नये, असं तुम्हाला वाटतं ना?” असं कार्डिनलने विचारलं.

“ठीक आहे, तुम्ही एखादे पुस्तक वाचले पाहिजे, जे तुम्हाला मदत करेल,” असं धर्मोपदेशकांना सूचवलं.

“हो, पण कोणते पुस्तक फादर अमार्थ?” कर्डिनलनं विचारलं.

“गॉस्पेल.” त्यानं कार्डिनलला उत्तर दिलं.

“गॉस्पेल आपल्याला सांगतं की, येशू भूते काढतो. मग गॉस्पेल देखील एक अंधश्रद्धा आहे का?”

इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ एक्सॉर्सिस्ट (IEA) ला 13 जून 2014 रोजी कॅथलिक चर्चने मान्यता दिली.

ब्राझीलमधील मोन्सिग्नोर रुबेन्स मिराग्लिया झानी हे सदस्यांपैकी एक आहेत. 2013 मध्ये एक्सॉर्सिस्टची नियुक्ती केली, त्याच्या एका वर्षापूर्वीच रोममधील प्रशिक्षण अभ्यासक्रमादरम्यान तो फादर अमॉर्थला भेटला होता.

“तो एक सुसंस्कृत, आनंदी आणि बुद्धिमान व्यक्ती होता,” असं मोन्सिग्नोर झानी वर्णन करतात.

शेवटचे दिवस

आयुष्याच्या शेवटच्या दिवसात गॅब्रिएल अमार्थ यांनी दिवसाला सरासरी पाच-पाच भूतबाधितांमधील भूतं पळवून लावल्याचा दावा केला. काही काळापूर्वीच हाच आकडा 15 होता.

एकेकाळी तर त्यांनी मशीनवर संदेश रेकॉर्ड केला की, भूतप्रेतांसंबंधित विनंत्या आठवड्यातून एका तासापुरत्याच मर्यादित असतील.

तो संदेश असा होता की - “भूतं पळवून लावण्याच्या विनंत्या सोमवारी संध्याकाळी 6.30 ते 7.30 या वेळेतच स्वीकारल्या जातील. रोमच्या बिशपच्या अख्त्यारित नसलेल्यांनी आपल्या भागातील बिशपकडे जावं.”

एप्रिल 2016 मध्ये फादर अमॉर्थ यांना 'द एक्झॉर्सिस्ट' सिनेमाचे दिग्दर्शक विल्यम फ्रीडकिन यांच्याकडून एक संदेश प्राप्त झाला, ज्यात त्यांनी एक्सॉर्सिस्ट रेकॉर्ड करण्यासाठी परवानगीची विनंती केली.

‘अॅन इन्व्हेस्टिगेशन ऑफ द डेव्हिल’मध्ये लिहिलंय की, “मी 'एक्झॉर्सिस्ट'चा आभारी आहे. काहीसे सनसनाटी असले तरी ते बर्‍यापैकी अचूक आहे. ते मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचले आणि भूतं पळवून लावणाऱ्यांच्या कामाला मोठं रूप दिलं.”

काही दिवसांनंतर फादर अमार्थ स्वत: चित्रिकरणाच्या ठिकाणी गेले होते.

फादर अमॉर्थने लिहिले आहे की, त्यांनी केलेल्या 10 पैकी नऊ एक्झॉर्सिसम स्त्रियांना होते. असं का, हे ते स्पष्ट करू शकले नाहीत. मात्र, भूत मदर मेरीचा बदला घेऊ इच्छित होते.

“जेव्हा येशूला बोलवतो आणि अवर लेडीला बोलावतो, तेव्हा तुम्हाला भीती वाटते का?” असं एका संवादादरम्यान अमार्थ यांना विचारण्यात आलं. तेव्हा समोरून उत्तर आलं, “कारण मानवी प्राण्याकडून पराभूत होणं मला अधिक अपमानित झाल्यासारखं वाटतं.”

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)