You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'सांताक्लॉज अस्तित्वात नसतो' असं सांगणाऱ्या बिशपमुळे चर्चने मागितली माफी
'सांताक्लॉज अस्तित्वात नाही,' असं लहान मुलांच्या एका गटाला सांगणाऱ्या बिशपमुळे चर्चला माफी मागावी लागली आहे. रोम कॅथलिकच्या अख्त्यारित येणाऱ्या सिसिलीतलं हे चर्च आहे. इथल्या बिशपांनी सांताक्लॉज अस्तित्वात नसल्याचं म्हटलं होतं.
इटलीतल्या माध्यमांनी वृत्तांकनानुसार, गेल्या आठवड्यात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात बिशप अँटोनिओ स्टॅगलिआनो यांनी सुद्धा असं म्हटलं होतं की, सांताक्लॉजच्या कपड्यांचा रंग हा प्रसिद्धीसाठी कोका-कोलावरून घेण्यात आला आहे.
या बिशपांच्या वक्तव्यामुळेही मुलांचे आई-वडील नाराज झाले होते.
माफी मागताना ते म्हणाले की, नोटोच्या अख्त्यातीरीतल्या रेव्ह अलेसांड्रो पाओलिनो यांनी म्हटलं की, बिशपनी ख्रिसमसचा खरा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला होता.
गरिबांना भेटवस्तू देण्यासाठी ओळखल्या जाणार्या संत निकोलसच्या कथेवर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने त्यांनी तसं म्हटलं होतं, असेही ते म्हणाले.
"सर्वप्रथम, बिशप यांच्यातर्फे मी दु:ख व्यक्त करतो, कारण लहानग्यांमध्ये निराशा पसरली. मात्र, बिशप यांचा हेतू वाईट नव्हता," असं रेव्ह पाओलिनो फेसबुक पोस्टच्या माध्यमातून म्हणाले.
रेव्ह पाओलिनो हे नोटो चर्चचे संपर्क संचालक आहेत. लहान मुलांना ख्रिसमसचा अर्थ कळावा हाच उद्देश बिशपचा होता.
ला रिपब्लिका नामक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बिशप म्हणाले की, सांताक्लॉज अस्तित्वात नव्हता, असं मी मुलांना सांगितलं नही. मात्र, वास्तव काय आहे, यातला फरक कळणं आवश्यक आहे, हे सांगितलं.
"ख्रिसमसचं वातावरण पाहता रोषणाई आणि खरेदी याच गोष्टीनं ख्रिसमसची जागा घेतलीय," असंही ते म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)