चंद्रयान-3ः चंद्राबद्दलच्या या 10 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

चंद्रयान-3ने चंद्राच्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं आहे. असं करणारा भारत जगातला पहिलाच देश ठरला आहे.

आतापर्यंत कुणालाही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करण्यात यश आलेलं नाही.

आतापर्यंत जगातल्या फक्त 4 देशांना चंद्रावर लँडिंग करण्यात आलं आहे. त्यात भारत, रशिया, अमेरिका आणि चीन यांचा समावेश आहे. या क्लबमध्ये भारताचा चंद्रयान-3च्या यशस्वी लँडिंगनंतर समावेश झाला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये इंटरनेटवर चंद्राशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्यानुसारच चंद्राशी संबंधित 10 महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहोत.

1. चंद्र गोल नाही

पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण गोल दिसून येतो मात्र चंद्र हा एखाद्या चेंडूसारखा गोल नाही तर तो अंडाकृती आहे. तुम्ही चंद्राकडे पाहाता तेव्हा त्याचा काही भाग दिसून येतो.

चंद्राचा भार हा त्याच्या भूमितिय केंद्रात नाही. तो त्याच्या भूमितिय केंद्रापासून 1.2 मैल दूर आहे.

2. चंद्र कधीही पूर्ण दिसत नाही

तुम्ही जेव्हा चंद्र पाहाता तेव्हा तुम्हाला तो जास्तीत जास्त 59 टक्केच दिसून येतो. त्याचा उर्वरित 41 टक्के भाग पृथ्वीवरुन दिसत नाही.

जर तुम्ही अंतराळात गेला आणि 41 टक्के क्षेत्रावर उभे राहिलात तर तुम्हाला पृथ्वी दिसणार नाही.

3. ज्वालामुखी स्फोटाचा ब्लू मूनशी संंबंध

चंद्राशी संबंधित असलेला ब्लू मून हा शब्द 1883 साली इंडोनेशियातील क्राकाटोआ बेटावर झालेल्या ज्वालामुखी स्फोटामुळे वापरात आला असं म्हटलं जातं.

ज्वालामुखीच्या भीषण स्फोटांपैकी एक तो मानला जातो. काही बातम्यांनुसार त्याचा आवाज ऑस्ट्रेलियातील पर्थ आणि मॉरिशसपर्यंत गेला होता असं मानतात.

त्यानंतर वायूमंडळात इतकी राख पसरली की चंद्र निळा दिसू लागला. त्यानंतर हा शब्दप्रयोग वापरात आला.

4. चंद्रावर गुप्त प्रकल्प

एकेकाळी अमेरिका चंद्रावर अण्वस्त्राच्या वापराचा गांभीर्याने विचार करत होता. रशियावर आपली शक्ती दाखवून दबाव आणणे हा त्यामागचा हेतू होता.

या गुप्त मोहिमेला ए स्टडी ऑफ लूनार रिसर्च फ्लाइट्स आणि प्रोजेक्ट ए 119 असं नाव होतं.

5. चंद्रावर खड्डे कसे तयार झाले

ड्रॅगन सूर्याला गिळत असल्यामुळे सूर्य ग्रहण होतं अशी चीनमध्य़े कल्पना होती. याचा चिनी लोक शक्य तितका प्रसार करायचे.

इतकंच नव्हे तर चंद्रावर एक बेडूक राहातो तो चंद्राच्या खड्ड्यांत बसलेला असतो अशीही त्यांची कल्पना होती.

मात्र चंद्रावर असलेले इम्पॅक्ट क्रेटर म्हणजे खोल खड्डे हे 4 अब्जवर्षांपूर्वी अश्नी, उल्का धडकल्यामुळे तयार झालेले आहेत.

6. पृथ्वीची गती कमी करतो

जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जास्त जवळ असतो तेव्हा त्या स्थितीला पेरिग्री म्हणतात. त्या काळात भरती-ओहोटीचं चक्र सामान्य स्थितीपेक्षा जास्त वाढतं.

7. चंद्रप्रकाश

पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा सूर्य 14 पट अधिक चमकदार असतो. सूर्याएवढा प्रकाश पाहिजे असेल तर तुम्हाला 3,98,110 चंद्रांची गरज पडेल.

चंद्रगहणाच्यावेळेस चंद्रावर पृथ्वीची सावली पडते आणि त्याच्या पृष्ठाचं तापमान 260 अंश सेल्सियसने घसरतं. या स्थितीला 90 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो.

8. लिओनार्डो दा विंचीचा शोध

कधीकधी चंद्राची कोर दिसते. कधी चंद्रावर काही चमकतंय असं वाटतं. चंद्राचा बाकीचा भाग दिसत नाही. तसेच हवामानामुळेही चंद्र दिसण्यावर मर्यादा येतात.

ज्ञात इतिहासानुसार लिओनार्डो दा विंचीने सर्वात प्रथम चंद्र आकुंचन-प्रसरण पावत नसून त्याचा काही भाग आपल्या नजरेत येत नाही हे मांडल्याचं म्हणतात.

9. चंद्रावरच्या क्रेटरची नावं कोण ठरवतं

इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल युनियन ही चंद्राच्या खड्ड्यांसह सर्व प्रकारच्या खगोलिय गोष्टींचं नामकरण करत. चंद्रावरील खड्ड्यांचे नाव प्रसिद्ध शास्त्रज्ञ, कलाकार किंवा शोध मोहिमांच्या अन्वेषकांच्या नावे ठेवली जातात.

अपोलो क्रेटर आणि मेयर मॉस्कोविंसच्या जवळील क्रेटरची नावं अमेरिकन आणि रशियन अंतराळवीरांच्या नावे ठेवलेली आहेत. मेयर मॉस्कोविंस या प्रदेशाला चंद्राचा समुद्री भाग मानलं जातं. चंद्राबद्दल अजूनही लोकांना फारशी माहिती नाही.

1988 साली अॅरिझोनाच्या लॉवेल ऑब्झर्व्हेटरी ऑफ फ्लॅगस्टाफने एक सर्वेक्षण केलं होतं. त्यात भाग घेणाऱ्या 13 टक्के लोकांना चंद्र हा चीजने बनलेला आहे असं वाटत होतं.

10. चंद्राचा दक्षिण ध्रुव

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न चंद्रयान 3 करत आहे. हा प्रदेश रहस्यमय समजला जातो. नासाच्या मते या प्रदेशातच अनेक खोल खड्डे आणि पर्वत आहेत.

या पर्वतांच्या सावलीमुळे तिथे अब्जावधी वर्षं प्रकाशच पोहोचलेला नाही.

चंद्रयान 3 : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असं काय आहे, की ISRO चं यान तिथेच उतरणार आहे? याबद्दल तुम्ही इथे वाचू शकता.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)