एकाकीपणा या भावनेची गणना आजारामध्ये का केली जाते?

फोटो स्रोत, AP
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जाहीर केलंय की एकाकीपणा हा जागतिक आरोग्यासाठी धोका आहे आणि अमेरिकन डॉक्टरांनी सांगितलंय की या आजाराचे परिणाम दिवसातून 15 सिगारेट ओढण्यासारखेच असू शकतात.
‘डब्लूएचओ’ने आता या समस्येवर आंतरराष्ट्रीय समिती स्थापन केलेय - अमेरिकन सर्जन जनरल, विवेक मूर्ती आणि आफ्रिकन युनियनचे युवा दूत, चिडो एमपेम्बा यांच्या नेतृत्वाखाली - वानुआतुमधील हवामान बदल अनुकूलन मंत्री राल्फ रेगेनवानू यांच्यासह 11 वकील आणि सरकारी मंत्री, आणि जपानमधील एकाकीपणा आणि विलगीकरण उपाययोजनांचे प्रभारी मंत्री अयुको काटो यांचा यात समावेश आहे.
कोविड-19 साथीनंतर जागतिक पातळीवर आर्थिक आणि सामाजिक व्यवहार थांबल्यानंतर, जगभरात अलगीकरण (क्वारंटाइन) आणि विलगीकरणाचं (आयसोलेशन) प्रमाण वाढलंय.
‘डब्ल्यूएचओ’ची सामाजिक संबंध आणि एकाकीपणाला सामोरं जाण्यासाठीची समिती तीन वर्षांच्या कालावधीसाठी यावर काम करेल आणि समितीने सूचित केलंय की या समस्येबाबत जागरूकता महत्वाची आहे.
वृद्धांप्रमाणेच तरुणांसाठीही धोका
आफ्रिकन युनियनचे युवा राजदूत एमपेम्बा म्हणाले, "एकाकीपणा ही जागतिक आरोग्यासाठी चिंतेची बाब बनत चालली आहे, जे आरोग्याच्या प्रत्येक पैलूवर परिणाम करतं.”
डॉ. व्ही मूर्ती म्हणाले की, दिवसाला 15 सिगारेट ओढणं हा आरोग्यासाठी गंभीर धोका आहे आणि एकटेपणाही त्याच पातळीवर आहे.

फोटो स्रोत, Reuters
विकसित देशांमध्ये एकाकीपणाला अनेकदा समस्या म्हणून पाहिलं जात असलं तरी, डॉ. मूर्ती यांना असं वाटतं की जगातील प्रत्येक देशात चारपैकी एक वृद्ध व्यक्ती सामाजिक विलगीकरण (आयसोलेशन) अनुभवत असते.
वयस्कर व्यक्तींमध्ये एकाकीपणामुळे स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता 50% अधिक असते आणि एकट राहिल्यास पक्षाघात होण्याची शक्यता 30% अधिक असते.
एकाकीपणामुळे तरुणांच्या आरोग्यालाही हानी पोहोचते आणि जर तरुण एकटे असतील तर त्यांना 5% ते 15% जोखमीचा सामना करावा लागू शकतो.
अभ्यासानुसार, आफ्रिकेतील तरूणवर्ग त्यांच्या आयुष्यातील सरासरी 12.7% वेळ एकट्याने घालवतात, तर युरोपातील तरूणवर्ण 5.3% वेळ एकट्याने घालवतो.
तरुणांना एकटेपणाचा अनुभव शाळेमध्येच येतो आणि त्यामुळे ते महाविद्यालयात जाणं आणि शिक्षणही सोडू शकतात.
एकाकीपणामुळे तरुणांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, पालकांशी तुटलेलं नाते आणि कामाच्या ठिकाणी सहकार्य न मिळणं या सर्वांचा परिणाम एखाद्या व्यक्तीच्या भविष्यावर होतो.
आफ्रिकेत, जिथे बहुसंख्य लोकसंख्या तरुण आहे, आजूबाजूची आव्हानं, शांतता, सुरक्षा, हवामान संकटं, तसंच वाढती बेरोजगारी आणि सामाजिक विलगीकरण एकाकीपणाला कारणीभूत ठरतात.
आफ्रिकन युनियनचे युवा दूत, चिडो म्पेम्बा म्हणाले, "मला वाटतं की एकाकीपणाबद्दलची व्याख्या पुन्हा परिभाषित करणं गरजेचं आहे, विशेषत: ज्यांना आधुनिक डिजिटल तंत्रज्ञान वापरणं अजिबातच शक्य नाहीये.
वैद्यकीय डॉक्टरांनी नमूद केलंय की एकटेपणा हा असा एक धोका आहे की ज्याची जगाला जाणीव नाहीये आणि जर त्यावर त्वरीत उपाययोजना केल्या नाहीत तर त्याचे आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात, ज्याचा अनुभव समाजातील विविध घटकांतील लोकांना येऊ शकतो.
हेही वाचलंत का ?
हा व्हीडिओ पाहिलात का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता








