नारायण राणे: उद्धव ठाकरेंना हिंदू हा शब्द उच्चारण्याचा देखील अधिकार नाही

फोटो स्रोत, Getty Images
उद्धव ठाकरे हे कधीही मराठी माणसासाठी आंदोलनाला गेले नाहीत की दंगलीत कुणाला वाचवायला गेले नाहीत. त्यांना हिंदुत्व हा शब्द उच्चारण्याचा अधिकार देखील नाही अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी हात मिळवून मुख्यमंत्रिपद मिळवले. त्यांनी ही हिंदुत्वाशी केलेली गद्दारी आहे. त्यामुळे त्यांनी हिंदू हा शब्द देखील उच्चारू नये असे राणे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी हात मिळवून मुख्यमंत्रिपद मिळवले. त्यांनी ही हिंदुत्वाशी केलेली गद्दारी आहे. त्यामुळे त्यांनी हिंदू हा शब्द देखील उच्चारू नये असे राणे म्हणाले.
बाळासाहेब ठाकरेंना स्वा. सावरकरांबद्दल आदर होता. तो उद्धव ठाकरेंना नाही. राहुल गांधी महाराष्ट्रात येऊन सावरकरांबद्दल बोलून गेले पण यांनी काही देखील म्हटले नाही. उलट आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधींना जाऊन मिठी मारली.
राहुल गांधी काय बोलले काय माहीत, कदाचित ते वेल डन, असे म्हटले असतील. स्वा. सावरकरांबद्दल तुम्ही काहीही बोलला नाहीत त्याबद्दल त्यांचे आभार मानले असावेत, असं राणे म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी केलेल्या या कृत्यामुळे त्यांनी भविष्यात आता सावरकरांची कितीही माफी मागितली तरी ते भरून येणार नाही असे राणे म्हणाले.
अडीच वर्षांत अडीच तास मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे हे अडीच वर्षांत केवळ अडीच तासच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले असे राणे म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले की उद्धव ठाकरे केवळ सहा वेळा सचिवालयात गेले. पण मी जेव्हा मुख्यमंत्री कार्यालयात गेलो तेव्हा तेथील स्टाफने मला मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे बोट दाखवून म्हटले की या खुर्चीवर उद्धव ठाकरे केवळ अडीचच तासांसाठी बसले.
प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत, त्यावरून भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारवर टीका होत आहे. त्याला देखील राणेंनी उत्तर दिले.

फोटो स्रोत, Getty Images
राणे म्हणाले आमच्या सरकारचं वय केवळ चार महिने आहे. तेव्हा प्रत्येक गोष्टीला आम्हाला जबाबदार धरणे योग्य नाही. उद्धव ठाकरेंना प्रशासनाचा अनुभव नव्हता आणि काय करायचे हे त्यांना माहीत नव्हते.
जेव्हा उद्योगधंदे राज्यात येत होते तेव्हा उद्योगधंद्यांसाठी जमिनी आणि इतर सुविधा सवलतीत उपलब्ध करून देणं हे राज्य सरकारचं काम असतं पण त्या कामात उद्धव ठाकरे कमी पडले त्यामुळे उद्योजकांनी काढता पाय घेतला.
त्यांना प्रशासनाची एबीसीडी देखील माहित नाही पण ते आमच्यावर टीका करतात. टीका करताना किमान पुरावे देऊन तरी करायला शिका असे राणे म्हणाले.











