नारायण राणे म्हणतात: मुंबईतली 90 टक्के बांधकामं बेकायदेशीर, माझ्यावर सूडबुद्धीने कारवाई

नारायण राणे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नारायण राणे

"महानगर पालिकेने माझ्या बंगल्यासाठी नोटीस पाठवली आहे, ती सूडबुद्धीने पाठवण्यात आली आहे. मुंबईतील 90 टक्के बांधकाम हे बेकायदेशीर आहेत. मातोश्रीजवळील अनेक बांधकामंही बेकायदेशीर आहेत. मातोश्रीजवळील बेहरामपाडा हा पूर्ण बेकायदेशीर आहे. मात्र तिथे हात टाकायची सरकारची हिंमत नाही", असं केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "माझ्या घरात मला सर्व अधिकृत परवानगी मिळाल्यानंतर मी घरात प्रवेश केला आहे. बेकायदेशीर असं काहीच नव्हतं. तरी यांनी नको ते कारण देत नोटीस दिली. आम्ही ते नियमित करण्यासाठी अर्ज देखील केला आहे. मात्र हे राजकारण आहे. कायदेशीर कारवाई नाही. महापालिका आयुक्तांना एकच माझंच एक घर दिसतंय. इतर ठिकाणी फिरताना ते डोळे झाकून फिरतात. मुख्यमंत्रीही तसेच. ही सुडाची कारवाई असून देशात लोकशाही आहे आणि माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे".

राणे यांचा जुहूच्या अधिश बंगल्यातील बांधकाम नियमिततेचा अर्ज मुंबई महापालिकेकडून नामंजूर करण्यात असून त्यांना योग्य कागदपत्रे पुन्हा सादर करण्यासाठी 15 दिवसांची अंतिम मुदत दिली आहे. तसं न केल्यास 15 दिवसानंतर त्यांच्या बंगल्यावर कारवाई होऊ शकते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतल्या जुहू इथल्या बंगल्याची मुंबई महापालिकेच्या पथकानं आज पाहणी केली होती.

दोन तासांच्या पाहणीनंतर मुंबई महापालिकेचे अधिकारी नारायण राणे यांच्या बंगल्यातून बाहेर पडले होते. राणे यांच्या बंगल्याची पाहणी करण्यासंदर्भात मुंबई महापालिकेनं याआधीच नोटीस बजावली आहे.

दरम्यान, नारायण राणे यांनी शनिवारी (19 फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेऊन अनधिकृत बांधकाम प्रकरणी करण्यात येत असलेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण दिलं होतं.

या इमारतीचे आर्किटेक्ट हे नामांकित आहेत. 13-14 वर्षे बांधकामाला झाली आहेत. त्यानंतर एक इंचही बांधकाम केलं नसल्याचं स्पष्टीकरण राणेंनी दिलं.

"नियमानुसार बांधकाम करून आम्हाला ताबा देण्यात आला. मनापानं सर्व मंजुरी दिलेल्या आहेत. 100 टक्के कायदेशीर काम केलं आहे," असं राणेंनी म्हटलं.

"आम्ही घरात केवळ 8 जणं राहतो. त्यामुळं अधिक बांधकाम करण्याची गरजच पडलेली नाही. ही निवासी इमारत आहे. व्यावसायिक वापर नाही. पण शिवसेना आणि मातोश्रीकडून काही लोकांना सांगून तक्रार मुद्दाम करायला लावण्यात आली," असंही राणेंनी म्हटलं आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या कारवाईविषयी बोलताना म्हटलं की, "नारायण राणेंच्या बंगल्याच्या प्रकरणात सीआरझेडचं उल्लंघन झाल्याचं केंद्र सरकारनंही म्हटलं आहे. त्यामुळे महापालिकेचे कर्मचारी त्यांच्या पद्धतीनं काम करतील आणि नारायणे राणेही आम्हाला सहकार्य करतील."

तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी भाष्य करताना म्हटलं, "नारायण राणे आणि त्यांच्या मुलांवर काय कारवाई झाली, किरीट सोमय्या यांचा जीव घेण्याचा प्रयत्न कसा चाललाय, रवी राणांचं काय झालं, हे सगळं लोक पाहत आहेत. सुडाचं राजकारण कोण करतंय ते गावोगावी लोक पाहत आहेत."

(ही बातमी अपडेट होत आहे.)

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)