अब्जावधी रुपयांचे बिटकॉईन सापडले पॉपकॉर्नच्या डब्यात

अमेरिकेतल्या गुन्हे विभागाने मागच्या वर्षी जप्त केलेल्या 3.36 अब्ज डॉलरच्या बिटकॉईन चोरीच्या प्रकरणाचा उलगडा केला आहे. हे बिटकॉईन एका डार्कनेट वेबसाईटमधून चोरी झाले होते.
50 हजारापेक्षा जास्त बिटकॉईन एका हॅकरच्या घरून सापडले आहेत. ते वेगवेगळ्या डिव्हाईसमध्ये लवपून जमिनीच्या खाली केलेल्या एका लॉकर मध्ये एका पॉपकॉर्नच्या डब्यात ठेवले होते.
जेम्स जॉन्ग यांनी 2012 मध्ये सिल्क रोड ही वेबसाईट हॅक केल्याचा गुन्हा कबूल केला आहे.
अमेरिकन अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की इतिहासातली सगळ्यात मोठी जप्ती आहे. जॉन्ग यांच्या जॉर्जिया येथील घरावर एका वर्षाआधी पोलिसांनी छापा मारला होता. मात्र आता ही कारवाई सार्वजनिक करण्यात आली आहे.
या छापेमारीच्या वेळी बिटकॉईनची किंमत प्रचंड होती. जप्त केलेल्या बिटकॉईनची किममत आता 1.1 अब्ज डॉलर म्हणजे 90 अब्ज रुपयांपेक्षा अधिक आहे.
पोलील अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांना हॅकरच्या बाथरुममध्ये एका लॉकरमध्ये ठेवलेल्या एका छोट्या कॉम्प्युटरच्या हार्ड ड्राईव्ह आणि स्टोरेज डिव्हाईसमधून बिटकॉईन सापडले. त्या कॉम्प्युटरलाही पॉपकॉर्नच्या डब्यात ठेवलं होतं.
पोलीस म्हणाले की सिल्क रोड वेबसाईट सिस्टीमध्ये असलेल्या एका त्रुटीचा फायदा घेऊन जॉन्ग पैसे चोरी करण्यात यशस्वी झाला होता.
सप्टेंबर 2012 मध्ये डार्कनेट मार्केटप्लेसवर काही अकाऊंट उघडण्यात आले आणि थोडे थोडे बिटकॉईन डिजिटल वॉलेटमध्ये जमा केले. त्यानंतर जॉन्गने पैसे काढण्याची अशी पद्धत शोधून काढली की ज्याने कोणतीही शंका येणार नाही.
सिल्करोड हा पहिला डार्कनेट मार्केटप्लेस होती. 2012 ते 2013 या काळात ते एकदम तेजीत होतं.
याचा वापर ड्रग डीलर आणि इतर व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मादक पदार्थ विकत घेण्यासाठी केला होता. बरेच युझर्सना या सेवेच्या मार्फत अवैध सामान विकलं गेलं. डार्कनेट हा इंटरनेटचा असा भाग आहे ज्याचा वापर काही विशिष्ट सॉफ्टवेअरचा वापर करूनच करता येतो.
2015 मध्ये न्यायाधीशांनी एकमताने रॉस उल्ख्रिबत ला दोषी करार दिला गेला आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
जॉन्ग यांनी 4 नोव्हेंबरला वेबसाईट हॅक करण्याचा गुन्हा कबूल केला आणि बिटकॉईन पोलिसांच्या हवाली केले. आता त्याला शिक्षा होणार आहे. आता त्याला 20 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

फोटो स्रोत, Getty Images
वकील डॅमिअन विलियम्स यांनी सांगितलं की पोलिसांनी बिटकॉईनचा शोध लावण्यासाठी क्रिप्टोकरंसी शोधून काढण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर केला.
ते म्हणाले, “हे बिटकॉईन गेल्या दहा वर्षांपासून बिटकॉईन गायब होते. ते एक रहस्यच झालं होतं.”
“या खटल्यामुळे सं लक्षात येतं की हरवलेले पैसे शोधण्याचा प्रयत्न सोडायला नको. मग ते पॉपकॉर्न च्या डब्यात असो की सर्किटच्या डब्यात असो.
क्रिप्टोकरन्सी इतक्या मोठ्या प्रमाणात जप्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावर्षी फेब्रुवारी मध्ये 4 अब्ज डॉलरच्या बिटकॉईनचा एक आणि आणखी एका चोरीचा पर्दाफाश झाला. ही दोन्ही प्रकरणं अमेरिकेच्या इतिहासातली सगळ्यात मोठी प्रकरणं आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








