इस्रायलचा उत्तर गाझावर हवाई हल्ला, अनेकांचा मृत्यू

    • Author, योलांडे क्नेल, जारोस्लाव लुकिव्ह
    • Role, बीबीसी न्यूज
    • Reporting from, जेरूसलेम

इस्रायलने रात्रीतून केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 66 जणांचा मृत्यू झाला असल्याचं उत्तर गाझातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

उत्तरी गाझातील बैत लाहिया शहरात कमाल अदवान रुग्णालया जवळ अनेक कुटुंबांनी आश्रय घेतला होता. त्या ठिकाणी हे हल्ले झाले. यात अनेक जणांचा मृत्यू झाला.

एका व्हीडिओत असे दिसत आहे की 20 हून अधिक जणांचे मृतदेह जमिनीवर पडलेले दिसत आहेत.

तसेच उत्तर गाझातील शेख रदवान या भागात किमान 22 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे.

इस्रायल लष्कराकडून कोणतीही प्रतिक्रिया दिली आलेली नाही. उत्तर गाझामधल्या हल्ल्यांची तीव्रता लष्कराने अलीकडेच वाढवली आहे.

हमासच्या सैन्याने आपले संघटन पुन्हा बळकट करू नये म्हणून इस्रायलने गेल्या काही दिवसात हल्ले तीव्र केले असल्याचे इस्रायलच्या लष्कराने म्हटले आहे.

उत्तर गाझामधले अनेक भाग इस्रायलच्या ताब्यात आहेत. गेल्या 40 दिवसात तिथे कोणतीही मदत पोहोचलेली नाही, असं संयुक्त राष्ट्राने (युनायटेड नेशन्स) अलीकडेच म्हटलं होतं.

गरजेच्या वस्तूंचा पुरवठा करता येत नाही असं मदत करणाऱ्या संस्था म्हणायला लागल्यापासून गाझातल्या डॉक्टरांसाठीही जखमींवर उपचार करणं अवघड झालं आहे.

त्यात या आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या विमान हल्ल्यात बैत लाहिया मधील पाच मजली इमारत उद्ध्वस्त झाली आणि 34 लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती.

पाच आठवड्यात जवळपास 1,30,000 लोक विस्थापित

गेल्या पाच आठवड्यात इस्रायलच्या हल्ल्यांमुळे जवळपास 1,30,000 लोक विस्थापित झालेत.

पाणी आणि अन्नाची तीव्र टंचाई सोसत बैत लाहिया, जबालिया आणि बेईल हॅनोन या शहरात जवळपास 75,000 लोक इस्लायल लष्कराच्या वेढ्यात राहतायत असं संयुक्त राष्ट्रानं म्हटलं आहे.

‘ह्युमन राईट्स वॉच’ या संस्थेच्या मागील आठवड्यातल्या अहवालातूनही हेच चित्र पुढे येतंय. इस्रायलने युद्धाचा गुन्हा गेलाय. मानवतेच्या विरोधातल्या या गुन्हानं गाझात राहणाऱ्या पॅलेस्टाइन लोकांना विस्थापित होण्यास भाग पाडलंय, असं या अहवालात म्हटलंय.

गेल्या एका वर्षात जवळपास 19 लाख, म्हणजे गाझाच्या लोकसंख्येच्या 90 टक्के लोक, त्यांची घरं सोडून दुसऱ्या गेशात पळून गेलेत. जवळपास 79 टक्के भागातून इस्रायलनं लोकांना बळजबरी घरातून बाहेर काढण्याचे आदेश दिल्याचं संयुक्त राष्ट्राने म्हटलंय.

हमासने 7 ऑक्टोबर 2023 ला दक्षिण इस्रायलवर झालेल्या हल्ल्यात 1,200 लोक मारले गेले होते, तर 251 लोकांना आश्रय घ्यायला लागला होता. त्याला प्रतित्युर म्हणून इस्राइलने हमास उद्ध्वस्त करून टाकण्यासाठी मोहिम चालवली आहे.

हमासमधल्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, तेव्हापासून गाझामध्ये 44,000 हजार लोक मारले गेलेत आणि 1,04,000 लोख जखमी झालेत.

बुधवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल) मंजुरीसाठी आलेला गाझा युद्धविराम ठरावाचा मसुदा अमेरिकेनं पुन्हा एकदा स्थगित केला. अमेरिकेनं इस्रायल या आपल्या मित्रदेशाचा बचाव करण्यासाठी चौथ्यांदा आपल्या व्हेटो पॉवरचा (नकाराधिकाराचा) वापर केला.

गाझामधील युद्ध कायमसाठी आणि कोणत्याही अटीशर्तींविना लगेचच थांबवावे आणि ओलीस ठेवलेल्या उर्वरित लोकांना कोणत्याही अटीशर्तींविना लगेचच सोडलं जावं असं हा ठराव सांगतो. काऊन्सिलचे 15 पैकी 14 सदस्य या मुसाद्याच्या बाजूने बोलत होते.

पण या मसुद्यात युद्ध थांबवणे आणि ओलिस ठेवलेल्या लोकांना सोडवणे यातला सहसंबंध व्यवस्थितपणे मांडला गेला नसल्याचे अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रातील उप-राजदूत रॉबर्ट वुड म्हणाले.

या ठरावाने हमासला धोकादायक संदेश गेला असता असं वुड यांनी म्हटलं.

दुसरीकडे अमेरिकेचे मध्यस्थ ॲमोस होचस्टिन बेरटमधून इस्रायलमध्ये पोहोचले आहेत.

लेबनॉनमधला संघर्ष संपण्याची संधी त्यांना दिसते, असे ते म्हणालेत. त्यासाठी लेबनॉनचे सरकार आणि हिझबुल्ला या अतिरेकी संघटनेला अमेरिकेचा युद्धविरामाचा ठराव मान्य करावा लागेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)