ट्रम्प यांना अडचणीत आणणारी स्टॉर्मी डॅनियल, जिनं जिंकलेलं पॉर्न सिनेमाचं ऑस्कर

स्टॉर्मी डॅनियल्स

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एका प्रकरणात गुन्हेगारी आरोप लावण्यात आले आहेत.

या प्रकरणात न्यूयॉर्कच्या ग्रँड ज्युरींनी परवानगी दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही केली जात आहे. या प्रक्रियेला 'इंडिक्टमेंट' असं संबोधलं जातं.

या निमित्ताने डोनाल्ड ट्रम्प हे अशा प्रकारे गुन्हा दाखल होणारे पहिले राष्ट्राध्यक्ष (विद्यमान किंवा माजी) ठरले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लावण्यात आलेले आरोप अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत. हे आरोपपत्र येत्या मंगळवारी (4 एप्रिल) उघड केलं जाईल, अशी माहिती मिळाली आहे.

6 जानेवारी 2021 रोजी ट्रम्प समर्थकांनी यूएस कॅपिटॉलवर हल्ला केल्यानंतर ट्रम्प यांनी त्यांना जोमाने लढण्याचं आवाहन केलं होतं. ट्रम्प यांच्यावरील सर्वांत महत्त्वाचा आरोप त्यासंबंधीचा असू शकतो.

तर ट्रम्प यांच्यावर आरोप असलेलं एक प्रकरण हे खाजगी स्वरुपाचं आहे. 2016 च्या प्रचारादरम्यान एका पॉर्न स्टारला देण्यात आलेल्या पैशांसंबंधीचं हे प्रकरण आहे.

संबंधित पॉर्न स्टारला तिचे ट्रम्प यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याबाबत मौन बाळगण्यासाठी पैशांची ऑफर देण्यात आली, असा आरोप ट्रम्प यांच्यावर आहे.

जगभरात जिची चर्चा सुरू आहे ती ट्रम्प यांना अडचणीत आणणारी पॉर्न स्टार कोण आहे?

ट्रम्प यांच्यावर आरोप करणाऱ्या पॉर्न स्टारचं नाव आहे स्टॉर्मी डॅनियल्स. हे तिचं स्क्रीनवरचं नाव आहे. तिचं खरं नाव आहे स्टिफनी ग्रेगरी क्लिफोर्ड.

ती पॉर्न इंडस्ट्रीमधली अभिनेत्री, स्क्रीनरायटर आणि दिग्दर्शिका होती.

2006 मध्ये ट्रम्प यांनी आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने केला आहे. ट्रम्प यांच्या दुसऱ्या विवाहाला तेव्हा वर्षच पूर्ण झालं होतं.

2016 मध्ये ट्रम्प हे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असताना त्यांनी मायकेल कोहेन या आपल्या वकिलांमार्फत 1 लाख 30 हजार डॉलर्स दिले होते. आपण त्यांच्यासोबतचे संबंध उघड करू नयेत, यासाठी ही रक्कम देण्यात आल्याचा दावा स्टोर्मीने केला होता.

ट्रंप-स्टॉर्मी

फोटो स्रोत, ANI

मात्र, ट्रम्प यांनी हे आरोप नाकारले आहेत. तिला करण्यात आलेलं पेमेंट हे बेकायदेशीर नव्हतं, असं ट्रम्प यांच्या वकिलांचं म्हणणं आहे. ट्रम्प यांनी कोहेन यांना संबंधित पैसे हे वकिलीची फी म्हणून दिल्यांची नोंद त्यांच्या खात्यात करण्यात आलेली आहे.

मात्र, हे रेकॉर्डच पूर्णपणे खोटे असल्याचा आरोप आता करण्यात येत आहे.

स्टॉर्मी डॅनियल्स कोण आहे? GETTY IMAGES

स्टॉर्मी डॅनियल्स

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

स्टॉर्मी डॅनियल्स उर्फ स्टिफनी ग्रेगरी क्लिफोर्ड ही अमेरिकेतली पॉर्न स्टार आहे.

1979 मध्ये जन्मलेल्या स्टॉर्मीला खरंतर प्राण्यांची डॉक्टर व्हायचं होतं. पण ती चार वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. स्टॉर्मी तिच्या आईसोबतच वाढली. पण तिच्या आईची आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती.

वयाच्या 17 व्या वर्षी तिने एका क्लबमध्ये स्ट्रीपर म्हणून काम करायला सुरूवात केली. जेव्हा ती प्रसिद्ध झाली, तेव्हा तिने तिचं नाव बदललं आणि स्वतःला स्क्रीनसाठी नवीन नाव घेतलं.

2000 साली तिने पॉर्न इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली. 2004 साली विकेड पिक्चर्ससाठी तिने दिग्दर्शक आणि स्क्रीन रायटर म्हणूनही काम केलं.

केली रॉबर्ट्स यांन बीबीसीशी बोलताना म्हटलं की, स्टॉर्मीमुळे पॉर्न इंडस्ट्रीचं चित्र बदललं. कारण तिच्याआधी या इंडस्ट्रीत पुरूष दिग्दर्शकच होते, महिला दिग्दर्शक नव्हत्याच.

दिग्दर्शक म्हणून स्टॉर्मीने पॉर्न इंडस्ट्रीतले अनेक पुरस्कार जिंकले. त्यामध्ये पॉर्न फिल्म इंडस्ट्रीतले ऑस्कर समजले जाणारे पुरस्कारही आहेत.

2014 साली स्टॉर्मीचा समावेश AVN मॅगझिनच्या 'हॉल ऑफ फेम' मध्ये करण्यात आला होता.

ज्यूड अॅप्टोव्ह यांनी स्टॉर्मीला त्यांच्या दोन सिनेमात कास्ट केलं होतं. त्यांनी 2018 साली न्यू यॉर्क टाइम्सला दिलेल्या इंटरव्ह्यूत म्हटलं होतं की, तुम्ही तिला कमी लेखू शकत नाही. कारण ती अतिशय व्यावसायिक मानसिकतेची, कणखर महिला आहे. तिने तिच्या करिअरची सगळी सूत्रं स्वतःच्या हातात घेतली होती.

स्टॉर्मीने ट्रम्प यांच्याबद्दल केलेले दावे

स्टॉर्मी डॅनियल्स

फोटो स्रोत, Reuters

अमेरिकन टीव्ही चॅनेल सीबीएसला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांच्यासोबतच्या संबंधांबद्दल खळबळजनक दावे केले होते. त्यानंतर अमेरिकेत तिचं नाव सगळीकडे चर्चेत आलं.

कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या एका गोल्फच्या स्पर्धेदरम्यान ट्रम्प आणि आपली ओळख झाल्याचं स्टॉर्मीने म्हटलं होतं.

त्यानंतर ट्रम्प यांनी आपल्याला हॉटेलच्या खोलीत बोलावलं, तिथे मासिकांमध्ये छापून आलेला त्यांचा फोटोही दाखवला.

तिथे आमचे शारीरिक संबंध आल्याचं तिनं म्हटलं. 'हे संमतीने ठेवले गेलेले संबंध होते, मी नकार दिला नाही,' असं तिने म्हटलेलं.

त्याकाळी ट्रम्प हे एक टीव्ही शो होस्ट करत होते आणि त्यांनी मलाही त्यांच्या शोमध्ये बोलावलं होतं. मला वाटलं हे सामान्य आहे.

स्टॉर्मीचा इंटरव्ह्यू जवळपास वीस लाख अमेरिकन लोकांनी पाहिला होता.

स्टॉर्मीने त्यात म्हटलं होतं, 'मी स्वतःला अवघड परिस्थितीत टाकत आहे.'

स्टॉर्मीने त्याचवर्षी आपल्या तिसऱ्या पतीपासून घटस्फोट घेतला होता. तिला एक मुलगी आहे.

आपण गोपनीयतेच्या कराराचा भंग केल्यामुळे माझं खूप नुकसान होईल असं स्टॉर्मीने म्हटलेलं.

पण असा काही कायदेशीर करार नव्हताच, असा दावा ट्रम्प यांच्याकडून करण्यात आला. ट्रम्प यांनी स्वतः त्यावर कधी सहीच केली नव्हती.

स्टॉर्मीने असंही म्हटलं होतं की, गोपनीयतेचा करार करण्याआधी पाच वर्षांपूर्वी म्हणजे 2011 साली एका माणसाने मला धमकावलंही होतं. जर आपण ट्रम्प यांच्यासोबतच्या संबंधांची जाहीर वाच्यता केली, तर माझ्या मुलीला इजा केली जाईल.

स्टॉर्मीला मिळालेली प्रसिद्धी

स्टॉर्मी डॅनियल्स

फोटो स्रोत, Getty Images

स्टॉर्मीने केलेल्या या दाव्यांनी अमेरिकेत राजकीय वादळ आणलं.

या प्रकरणात मिळालेल्या प्रसिद्धीचा आपल्याला आर्थिक फायदा झाल्याचंही तिने म्हटलं होतं.

ट्रम्प यांच्याविरुद्धच्या कायदेशीर लढाईदरम्याने ती अनेक स्ट्रीप क्लबमध्ये गेली होती आणि आधी जेवढे पैसे कमवायची, त्यापेक्षा जास्त पैसे तिनं कमावले होते.

आपल्या मुलाखतीत स्टॉर्मीने असंही म्हटलेलं की, आपण केवळ प्रसिद्धीसाठी ट्रम्प यांच्यासोबतच्या संबंधांचा खुलासा केला नव्हता.

त्यांनी 2010 मध्ये निवडणूक लढवण्याचा विचारही केला होता. मात्र त्यांची उमेदवारी फारशी गांभीर्याने घेतली जात नसल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी माघार घेतली.

स्टॉर्मीला लहानपणापासून घोडे खूप आवडायचे. तिचं करिअर आणि मिळालेली प्रसिद्धी यानंतर तिने स्वतःसाठी घोडे खरेदी केले.

ट्रम्प यांना अटक होण्याची शक्यता असल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर स्टॉर्मीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून लिहिलं होतं की, 'मला दिलेला पाठिंबा आणि प्रेमासाठी सर्वांचे खूप आभार.'

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)