You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रेड वाईन घेतल्यावर तुमचं डोकं दुखतं का?
- Author, मिशेल रॉबर्ट्स
- Role, डिजिटल हेल्थ एडिटर
कोणत्याही प्रकारची दारू प्यायल्यानंतर कसलाही त्रास न होणा-या लोकांना मात्र रेड वाईनच्या फक्त एका ग्लासाने डोकेदुखी का होते यामागचं कारण शोधून काढण्यात कदाचित आम्ही यशस्वी झालोय, असं अमेरिकन संशोधकांनी म्हटलं आहे.
कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या टीमने असं म्हटलंय की, शरीरातील दारूचं चयापचय गोंधळवण्याला लाल द्राक्षांमधील एका संयुग कारणीभूत आहे.
हे संयुग एक अँटिऑक्सिडेंट किंवा फ्लॅव्हनॉल आहे ज्याला क्वेर्सेटिन म्हणतात.
सनी नापा व्हॅलीतील कॅबरनेट (वाईनची द्राक्ष) मध्ये त्याचं प्रमाण सर्वाधिक असतं, असं ते म्हणतात.
उच्च गुणवत्तापूर्ण द्राक्षे
लाल द्राक्ष जेव्हा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असतात तेव्हा ते अधिक क्वेर्सेटिन तयार करतात.
याचा अर्थ असा होतो की, डोकेदुखीचा त्रास असलेल्या लोकांसाठी स्वस्तातल्या रेड वाईन ऐवजी महागडी रेड वाईन अधिक त्रासदायक ठरू शकते, असं संशोधकांपैकी एक प्राध्यापक अँड्र्यू वॉटरहाउस यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं.
"स्वस्तातील द्राक्षाच्या जाती खूप मोठ्या मांडवाखाली आणि भरपूर पानं असलेल्या वेलींवर उगवल्या जातात, त्यामुळे त्यांना जास्त सूर्यप्रकाश मिळत नाही," असं ते म्हणाले.
“उच्च गुणवत्ता असलेल्या द्राक्षांची झाडं लहान आणि कमी पानं असलेली असतात. वाइनची गुणवत्ता सुधारण्यासाठी सूर्यप्रकाशाचं प्रमाण काळजीपूर्वकपणे व्यवस्थापित केलं जातं.”
याबाबत इतर मात्र साशंक आहेत.
लंडनच्या क्वीन मेरी विदयापीठामधील प्रायोगिक उपचारशास्त्रातील तज्ज्ञ प्राध्यापक रॉजर कॉर्डर यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं की, स्वस्त वाईन डोकेदुखीसाठी अधिक त्रासदायक आहे, त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीकरिता कमी दर्जाची वाईन बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या काही पदार्थांची माहिती जाणून घ्यायला हवी.
संभाव्य गुन्हेगार
रेड-वाईनमुळे डोकेदुखी का होते हे स्पष्ट करण्यासाठी अनेक सिद्धांत मांडले गेलेत, ज्याचा परिणाम अगदी कमी प्रमाणात मद्यपान केल्यानंतरही 30 मिनिटांच्या आत होऊ शकतो.
काहींनी असं सूचित केलंय की याचं कारण सल्फाइट्स असू शकतं - जे वाईनचं आयुर्मान वाढवण्यासाठी आणि ताजी ठेवण्यासाठी संरक्षक म्हणून वापरलं जातं.
साधारणपणे, रेडपेक्षा गोड व्हाईट वाईनमध्ये सल्फाईटचं प्रमाण जास्त असतं.
काही लोकांना सल्फाईट्सची ॲलर्जी असू शकते आणि त्यांनी ते टाळलं पाहिजे, परंतु डोकेदुखीसाठी ते जबाबदार असल्याचे फारसे पुरावे नाहीत.
आणखी एक संभाव्य गुन्हेगार म्हणजे हिस्टामाईन होय - हा रेड वाईनपेक्षा व्हाईट किंवा रोझ वाईनमध्ये आढळणारा सर्वात सामान्य घटक आहे.
हिस्टामाईनमुळे शरीरातील रक्तवाहिन्या प्रसरण पावू शकतात, ज्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. पण परत एकदा, त्याचे खात्रीशीर पुरावे नाहीत.
विषारी संयुग
तज्ज्ञांना माहितेय की पूर्व आशियाई लोकांपैकी तीनपैकी एकापेक्षा जास्त लोकांना कोणत्याही प्रकारचं मद्य - बिअर, वाईन आणि उत्तेजक द्रव्याची फारशी सवय नाही आणि आणि त्यांनी ते प्यायल्यावर चेहरा लालसर होणे, डोकेदुखी आणि मळमळ जाणवते.
याचं कारण मद्य-चयापचय करणा-या एन्झाइमचा ‘एएलडीएच2’ (ALDH2) किंवा ‘एल्डिहाइड डिहायड्रोजनेज’च्या कार्याचा जनुकांवर प्रभाव पडतो.
मद्य शरीरात दोन टप्प्यांत पसरतं - एसीटाल्डिहाईड नावाच्या विषारी संयुगात ते रूपांतरित होतं, जे ‘एएलडीएच2’ नंतर निरुपद्रवी एसीटेटमध्ये म्हणजेच व्हिनेगरमध्ये बदलतं.
हे होऊ शकलं नाही, तर हानिकारक एसीटाल्डिहाईड तयार होतं, ज्यामुळे लक्षणे उद्भवतात.
संशोधकांचे म्हणणं आहे की रेड-वाईनमुळे होणा-या डोकेदुखीला सारखीच प्रक्रिया कारणीभूत असते.
प्रयोगशाळेत त्यांनी दाखवलं की क्वेर्सेटिन स्वतःच्या चयापचयांपैकी एकाद्वारे अप्रत्यक्षपणे ‘एएलडीएच2’ ची क्रिया रोखू शकतं.
‘संपर्कात राहा'
कामासाठी निधीची जमवाजमव करणा-या आणि आता सायंटिफिक रिपोर्ट्स जर्नलमध्ये आपला निष्कर्ष प्रकाशित केलेल्या संशोधकांच्या मते, क्वेर्सेटिन फक्त मद्यात मिसळल्यानंतरच त्रासदायक बनतं.
क्वेर्सेटिन इतर अनेक फळं आणि भाज्यांमध्ये देखील आढळतं - आणि ते त्याच्या प्रक्षोभक विरोधी फायदेशीर गुणधर्मांमुळे आरोग्य पूरक म्हणून देखील उपलब्ध आहे - आणि एकट्याने ते डोकेदुखीचं कारण बनत नाही.
संशोधकांना अजूनही लोकांमध्ये त्यांचा सिद्धांत सिद्ध करायचा आहे आणि रेड वाईनमुळे डोकेदुखीचा त्रास होत असलेल्या स्वयंसेवकांना नेहमीच्या व्होडकासोबत क्वेर्सेटिन सप्लिमेंट किंवा डमी गोळी देणे हा एक साधा प्रयोग असू शकतो.
न्यूरोलॉजीचे तज्ज्ञ आणि सॅन फ्रान्सिस्कोच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातील डोकेदुखी केंद्राचे संचालक व सह-लेखक प्रोफेसर मॉरिस लेव्हिन म्हणाले: "शेवटी आम्ही या हजारो वर्ष जुन्या रहस्याचा उलगडा करण्याच्या दिशेने योग्य मार्गावर आहोत. पुढील पायरी म्हणजे चाचणी करणे. ज्यांना अशाप्रकारची डोकेदुखी होते अशा लोकांवर वैज्ञानिक चाचणी करणं ही याची पुढील पायरी आहे, म्हणून संपर्कात रहा."
काही महिन्यांमध्ये त्या अभ्यासांना सुरुवात होईल, अशी आशा आहे.
परंतु प्रोफेसर कॉर्डर, ज्यांनी वाईनच्या संभाव्य आरोग्य फायद्यांचा अभ्यास केलाय त्यांना असं वाटतं की डोकेदुखीसाठी कारणीभूत असणारे इतर घटकही शोधणं गरजेचं आहे:
- पेक्टिनेसेस अँथोसायनिन्सच्या उत्सर्जनाला पारंपरिक वाइन निर्मितीच्या संथ मॅसरेशन (घनपदार्थ द्रव पदार्थात भिजवून मऊ होणे) प्रक्रियेशिवाय रंग सोडून वाईन निर्मितीला गती देतात, परंतु त्यांच्या मिथाइलहाईड्रोलासेस आणि त्यांच्या ॲक्टिव्हिटीचे मिथेनॉल हे एक दुय्यम उत्पादन आहे.
- डायमिथाइल डायकार्बोनेट हे स्वस्त वाईनसाठी संरक्षक म्हणून वापरलं जातं, विशेषत: इंग्लंडमध्ये बाटल्यांमध्ये भरण्यासाठी मोठ्या कंटेनरमध्ये पाठवतात परंतु मिथेनॉल तयार करण्यासाठी त्याचं विघटन केलं जातं.
- खूप मद्यपान करणं, घाईत पिणं, किंवा नशेसाठी मद्यपान केल्याने आरोग्यावर तात्पुरते आणि दीर्घकालीन गंभीर परिणाम होऊ शकतात.
आठवड्यातून नियमितपणे 14 युनिट्सपेक्षा जास्त मद्यप्राशन - साधारण सरासरी सहा पाईन्ट्स-अधिक प्रभावी बिअर किंवा 10 लहान ग्लास कमी प्रभावी वाइन, मद्याचा प्रकार कोणता आहे याने काहीही फरक पडत नाही - यकृत खराब होऊ शकतं आणि स्ट्रोक आणि हृदयविकारासह आरोग्याच्या इतर समस्या निर्माण होऊ शकतात.
- मद्यामुळे सात वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग होतात - मद्यप्राशनानंतर प्रत्येकवेळी हा धोका वाढत जातो.
- दारू पिण्यामुळे 10 पैकी सुमारे एका व्यक्तीस स्तनाचा कर्करोग होतो - इंग्लंमध्ये वर्षाला ही संख्या सुमारे 4,400 इतकी आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)