दिवाळीत घरच्या घरी 'अशी' करा मिठाई, खवा आणि दुधातल्या भेसळीची तपासणी

मिठाई

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, डिंकल पोपी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

घरात फ्रिजपासून, जेवणाच्या टेबलपर्यंत मिठाईचे डब्बे फक्त दिवाळीतच दिसतात. पण या डब्ब्यांसोबतच आता मिठाईत भेसळ होत असल्याच्या बातम्याही घरी पोहोचू लागल्या आहेत.

आजकाल मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त दूध, तूप आणि खव्यावर छापे मारले जातायत.

मिठाईची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी बरेचवेळेस या खाद्य पदार्थांमध्ये कृत्रिम आणि रासायनिक पदार्थ मिसळले जातात असं तज्ञ सांगतात. असे भेसळयुक्त पदार्थ आपल्या आरोग्यासाठी अर्थातच चांगले नसतात.

भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण (FSSAI) या भारत सरकारच्या संस्थेने घरच्या घरी सोप्या पद्धतीने भेसळीची तपासणी कशी करायची याचे उपाय सांगितले आहेत.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ

दूध आणि दुधापासून बनलेल्या पदार्थांमधे भेसळ असणं ही नेहमीचीच समस्या आहे.

चरबी असलेले किंवा नसलेले पदार्थ मिसळून उत्पादनाचा खराब दर्जा लपवणं हेही भेसळीत येतं. एफएसएसआयने सांगितल्याप्रमाणे कृत्रिम दुधात युरिया, कपडे धुवायचा डिटर्जंट, किसलेला साबण, बोरिक ॲसिड, हायड्रोजन पॅरोक्साइड, स्टार्च आणि न्यूट्रलायझर, कास्टिक सोडा किंवा सोडियम हायड्रॉक्साइड, सोडियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट यासारखी घातक रसायनं असतात.

असे भेसळीचे पदार्थ खाणं आरोग्यासाठी अनेक पद्धतीने धोके निर्माण करतं.

एफएसएसएआयने दूध आणि दुग्धजन्य उत्पादनांच्या भेसळीची तपासणी करण्याच्या अनेक पद्धती सांगितल्या आहेत.

खवा किंवा दुधातल्या भेसळीची तपासणी

फोटो स्रोत, Getty Images

दुधातल्या पाण्याची पातळी मोजण्याची प्रक्रिया :

  • 5 ते 10 मिलीलीटर दूध नमुुना म्हणून घ्या आणि त्यात तेवढंच पाणी घाला.
  • हे मिश्रण चांगल्या पद्धतीने हलवा.
  • दुधात डिटर्जंट असेल तर त्यावर दाट फेस येईल.
  • पण हलवल्यावर फेसाचा पातळ थर असेल तर ते दूध शुद्ध म्हणता येईल.
ग्राफिक्स
ग्राफिक्स

खव्यातली भेसळ कशी ओळखायची?

दरवर्षी दिवळीच्या आसपास एफएसएसएआयकडून अनेक टन बनावट खवा जप्त केला जातो.

खवा हे डेअरीचं उत्पादन आहे. त्याचा उपयोग मिठाई बनवण्यासाठी केला जातो. दूध उकळून खवा बनवला जातो.

खवा सामान्यपणे पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचा आणि चवीला थोडा गोड असतो.

अनेक पारंपरिक गोडाच्या पदार्थात याचा मुख्य वापर असतो.

खव्यात स्टार्च, वनस्पती तूप, ब्लॉटिंग पेपर, चाक पाऊडर मिसळलेली असते.

खवा किंवा दुधातल्या भेसळीची तपासणी

फोटो स्रोत, Getty Images

खव्यातली भेसळ ओळखायचे अनेक प्रकार आहेत. जसं की -

एफएसएसएआय सांगतं त्यानुसार, एक चमचा खवा घ्या आणि कप कप गरम पाण्यात मिसळा. त्यानंतर कपात थोडं आयोडीन घाला. खव्याचा रंग निळा झाला तर त्यात स्टार्चची भेसळ केली गेली आहे. नाही तर तो शुद्ध आणि वापरण्यासाठी उपयुक्त आहे.

पुढची प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला सल्फ्यूरिक ॲसिडची गरज आहे. ते फॉर्मेलिनसारखी रसायनं खव्यात आहेत की नाही, हे शोधण्यात मदत करते. एका खोलगट भांड्यात खव्यातला गाळ घ्या आणि त्यात थोडं सल्फ्यूरिक ॲसिड घाला. हे मिश्रण वांगी रंगाचं झालं तर त्यात भेसळ असण्याची शक्यता आहे.

खवा किंवा दुधातल्या भेसळीची तपासणी

फोटो स्रोत, Getty Images

ही तपासणी खवा विकत घेतानाही केली जाऊ शकते. एफएसएसएआयनुसा, ताजा खवा तेलकट आणि दाणेदार असतो. त्याची चव थोडी गोड असते आणि हातावर रगडल्यावर चिकटपणा सोडतो. खवा विकत घेण्याआधी थोडा हातावर घेऊन रगडा. वर सांगितलेल्या गोष्टी असतील तर तो शुद्ध आहे.

खवा एका खोलगट भांड्यात घ्यावा आणि दोन चमचे हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि एक चमचा साखर टाका. मिश्रण लाल झालं तर ते खाण्यासाठी चांगलं नाही.

तुपातली भेसळ कशी ओळखायची?

तुपाचा उपयोग जवळपास सगळ्या प्रकारच्या पारंपरिक गोडाचे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो.

सणाच्या दिवशी अनेकदा तुपाची मागणी वाढते. त्यामुळे भेसळीचा आधार घेतला जातो. याशिवाय, फायद्यासाठी अनेकजण तुपात भेसळ करतात.

भेसळीसाठी तुपात कुस्करलेले बटाटे किंवा रताळी किंवा अन्य स्टार्च असलेल्या पदार्थांचा वापर केला जातो.

खवा किंवा दुधातल्या भेसळीची तपासणी

फोटो स्रोत, Getty Images

तुपातली भेसळ ओळखण्यासाठीची प्रक्रिया :

  • एका पारदर्शी काचेच्या भांड्यात अर्धा चमचा तूप घ्या.
  • आयोडीनचे दोन-तीन थेंब टाका.
  • तुपाचा रंग निळा झाला तर ते खाण्यायोग्य नाही.
  • याचा अर्थ त्यात कुस्करलेले बटाटे किंवा रताळी किंवा अन्य स्टार्च असलेल्या पदार्थांचा वापर केला आहे.

मिठाईतल्या भेसळीची तपासणी कशी करता येईल?

मिठाईत गोडवा आणण्याासाठी वापरली जाणारी साखर, गूळ आणि मधही भेसळीपासून लांब राहिलेलं नाही. त्यातही अनेक पद्धतीने भेसळ केलं जातं. ते ओळखण्याच्या काही पद्धती खाली दिलेल्या आहेत.

मधात साखरेची भेसळ तपासणीची पद्धत क्रमांक एक -

  • एका पारदर्शी ग्लासात पाणी घ्या.
  • त्यात मधाचा एक थेंब टाका
  • शुद्ध मध पाण्यात विरघळत नाही.
  • पाण्यात विरघळलं तर मधात साखरेची भेसळ असल्याचा तो संकेत असतो.
खवा किंवा दुधातल्या भेसळीची तपासणी

फोटो स्रोत, Getty Images

पद्धत क्रमांक दोन -

  • कापसाची वात मधात बुडवून पेटवा.
  • शुद्ध मध असेल तर वात पेटेल.
  • पण पाण्याची मिलावट असेल तर मध जळणार नाही. जळलं तरी हलका आवाज करेल.
  • साखर/ गूळ/ चाक पावडर आहे हे ओळखण्याची पद्धत
  • एका पारदर्शी ग्लासात पाणी घ्या.
  • त्यात 10 ग्रॅम मध घाला.
  • साखर/ गूळ/ चाक पावडर असेल तर मध ग्लासात खाली बसेल.

मिठाईवरची चांदी

विकण्यासाठी मिठाई आकर्षक दिसावी यासाठी त्यावर चांदी लावली जाते. पण चांदीची किंमत लक्षात घेता त्यात भेसळ केली जाते. ती अनेकदा अ‍ॅल्युमिनियमसोबत मिसळली जाते. त्यातून कॅन्सरची शक्यता वाढते.

तपासणी प्रक्रिया :

मिठाईवरच्या चांदीचा एक तुकडा घ्या आणि दोन बोटांच्या मध्ये रगडा.

शुद्ध चांदी असेल तर सहज तुकडे पडून त्याची पावडर होईल. पण अ‍ॅल्युमिनियमचे फक्त छोटे तुकडे होतील किंवा गोलाकार होईल.

खवा किंवा दुधातल्या भेसळीची तपासणी

फोटो स्रोत, Getty Images

याशिवाय, चांदीच्या तुकड्याचा छोटा गोल बनवून त्याला आग लावता येईल.

शुद्ध चांदी पूर्णपणे जळते. याउलट, अ‍ॅल्युमिनियमची तपकिरी रंगाची राख होते.

केशरातही होते भेसळ

केसर जास्त दिसावं यासाठी त्यासारख्या दिसणाऱ्या धाग्यांना रंग देऊन मिसळलं जातं. या भेसळीची तपासणी घरीही केली जाऊ शकते.

खवा किंवा दुधातल्या भेसळीची तपासणी

फोटो स्रोत, Getty Images

तपासणीची प्रक्रिया :

  • खरं केसर बनवट केसरासारखं सहज तुटत नाही.
  • तपासणीसाठी एका पारदर्शक ग्लासात पाणी घ्या आणि त्यात केसर टाका.
  • कृत्रिम रंग पाण्यात लगेच उतरतो.
  • पण शुद्ध केसर पाण्यात पूर्णपणे विरघळतं, तेव्हाच त्याचा रंग पाण्यात उतरतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)