घरातल्या 'या' वस्तू स्वच्छ न करणं पडू शकतं चांगलंच महागात

आपलं घर इतरांपेक्षा वेगळं असतं. मात्र घराची रचना कशीही असली तरीही स्वच्छता त्यांची प्राथमिकता आहे.

काही लोक रोज स्वच्छता करतात, काही लोक एक आठवड्यात काही लोक सहा महिन्यात तर काही लोक अगदी वर्षभरात एकदा स्वच्छता करतात.

अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूटद्वारे केलेल्या सर्वेक्षणानुसार 70 टक्के लोक जिथे राहतात तिथली स्वच्छता करतात.

कमीत कमी वर्षभरात एकदा तरी प्रत्येक कोपऱ्यातली स्वच्छता केली जाते.

काही लोकांसाठी सगळ्यांत महत्त्वपूर्ण जागा स्वयंपाकघर आहे तर काही लोकांसाठी बाथरुम

ओव्हन, शौचालय, मॅट या अशा जागा आहे की जिथे जीवाणू असण्याची शक्यता सगळ्यांत जास्त असते.

या लेखातून आपण अशा काही गोष्टींच्या स्वच्छतेविषयी बोलणार आहोत ज्यांची स्वच्छता आपण नियमित करत नाही मात्र ती अत्यंत गरजेची असते.

1.गाद्या

गाद्या स्वच्छ करणं इतकं सोपं नसतं.

मात्र काही तथ्यं लक्षात घेणं गरजेचं आहे. मानवी शरीरात 1.5 ग्राम मृत त्वचा तयार होतो. त्या बहुतांश वेळा तुमच्या गादीवर असतात.

2018 मध्ये रॉयल सोसायची ओपन सायन्स जर्नल मध्ये गाद्यांच्या स्वच्छतेशी निगडीत संशोधन प्रकाशित झालं होतं. त्यात माणसांची तुलना चिंपांझीशी करण्यात आली होती.

या संशोधनात एक बाब समोर आली होती की माकडांच्या तुलनेत माणसं गाद्या 30 टक्क्यांनी जास्त घाण करतात.

गाद्यात मृत त्वचा, धूळ आणि घाम एकत्रित होतो. जीवजंतूच्या वाढीसाठी हे सगळ्यांत जास्त पोषक असतं.

तज्ज्ञांच्या मते गाद्यांच्या स्वच्छतेसाठी काही नवीन पद्धती विकसित करण्यात आल्या आहेत.

गाद्यांमध्ये आर्द्रता आणि वॅक्युमिंगच्या निर्माण होणाऱ्या बुरशी कमी करण्यासाठी त्या उन्हात ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

2. डिशवॉशिंग स्पंज

किचनमध्ये भांडे स्वच्छ करताना आपण स्पंजचा वापर करून कोणतीही स्वच्छता करता येते.

असं केल्याने तिथे जीवजंतू येणार नाही असं आपण समजतो.

जर्मनीच्या फर्टवांगेन विद्यापीठाच्या एका संशोधनाद्वारे हे सिद्ध होतं की सिंकच्या तुलनेत स्पंजमध्ये सगळ्यांत जास्त जीवजंतू असतात.

संशोधनात असंही सांगितलं आहे स्पंजमध्ये 362 वेगवेगळी जीवजंतू सापडतात. त्यांची तपासणी करण्यात आली आहे. स्पंजवर सापडेल्या जीवजंतूची संख्या बाथरुममध्ये सापडलेल्या जीवजंतूपेक्षा जास्त होती.

याचं कारण असं आहे की स्पंजमध्ये सातत्याने आर्द्रता असते. स्पंजमध्ये छोटे छोटे छिद्र असतात त्यामुळे तिथे जीवजंतू वाढतात.

त्यामुळे स्पंज आठवड्यातून एकदा तरी क्लोरीनने स्वच्छ धुवायला हवा.

3. कॉफी मेकर

अमेरिकेतल्या ऑर्गनायझेशन फॉर पब्लिक हेल्थ अँड सेफ्टी यांनी केलेल्या एका संशोधनानुसार कॉफी मेकरवर सगळ्यांत जास्त जीवजंतू असतात.

एका संशोधनानुसार कॉफी मेकरवर 67 वेगवेगळ्या प्रकाराचे जीवजंतू सापडले आहेत.

वास्तविक पाहता, कॉफी तयार करण्याच्या प्रक्रियेत दोन समस्या येतात. एक म्हणजे गरम पाणी सगळे जीवजंतू नष्ट करू शकत नाही आणि कॅफिन बॅक्टेरियाच्या वाढीसाठी सर्वांत पोषक जागा आहे.

याशिवाय कॉफी तयार करण्याच्या प्रक्रियेत बरंच खनिज जमा होतं आणि त्यामुळे मशीनच्या देखभालीसाठी त्रास होऊ शकतो.

यामुळे कॉफी मेकर तीन महिन्यातून एकदा स्वच्छ करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

4. पुनर्निमित शॉपिंग बॅग

जागतिक तापमानवाढ लक्षात घेता सिंगल युझ प्लॅस्टिकवर विशेष भर दिला जात आहे.

अनेक घरात प्लॅस्टिकच्या बॅगचं उत्पादन कमी होण्यासाठी वारंवार वापरात येणाऱ्या प्लॅस्टिकचा प्रयोग केला जात आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ अरिझोनाचे मायक्रोबायोलॉजिस्ट चार्ल्स. पी. गेरबा यांच्या हवाल्याने एआरपी न्यूज पॉर्टलला सांगितलं, “या बॅगांची तुलना आम्ही अंडरवेअरशी केली. या बॅगांमध्ये इ.कोलाय सारख्या जीवाणूंची संख्या जास्त आहे.

“जर तुम्ही कच्चं मास आणि कच्च्या भाज्यांसाठी एकाच बॅगेचा उपयोग करत आहात तर साल्मोनेला बॅक्टेरियाची लागण होते.”

अमेरिकेच्या नॅशनल क्लिनिंग इन्स्टिट्यूटचे कर्मचारी या पिशव्यांना आठवड्यात एकदा तरी धुवायचा सल्ला देतात, मात्र वॉशिंग मशीनमध्ये या बॅगा धुतल्या तर नुकसान होऊ शकतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)