कुणाला पडताना पाहिलं की आपल्याला लगेच हसू येतं, कारण...

पडणे

फोटो स्रोत, Getty Images

आपल्यापैकी एखादा जर फुटपाथवर, रस्त्यावर, पायऱ्यांवर अडखळून खाली पडला तर आपल्या तोंडून आपसूकच हसू बाहेर पडतं.

पण माझ्या या वर्तनावर मी दोषी असल्याचं मान्य करतो. आणि हे मान्य करणारा मी कदाचित पहिलाच व्यक्ती असेन.

त्यामुळे मी माझी सहकारी असलेल्या जेनीची माफी मागितली. कारण ती जेव्हा जमिनीवर अडखळून पडली तेव्हा मी मोठ्याने हसलो. ती तिचा तोल सावरण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा जमिनीवर पडली.

तोल ढासळणे, खाली पडणे या सगळ्या गोष्टी चार्ली चॅप्लिनसारख्या वाटतात. केळ्याच्या सालीवरून घसरून पडण्याचे, लहान मुलं पडण्याचे व्हीडिओ बघून आपण पोटधरून हसत बसतो.

पण हे लोक नेमक्या कोणत्या परिस्थितीत आहेत याबद्दल आपण सहानुभूती बाळगायला नको का? तर आपण सहानुभूती बाळगायला हवी, पण आपल्याला त्याच्याबद्दल सहानुभूतीच वाटत नाही म्हणून आपण हसतो असं नाही.

आपण बऱ्याचदा चांगल्या हेतूने हसतो आणि एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून मला या गोष्टींवर प्रकाश टाकायचा आहे.

यातील पहिलं म्हणजे आपल्याला वाटणारं आश्चर्य. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला काही सेकंदांपूर्वीच सुस्थितीत पाहिलेलं असतं आणि नंतर अचानक तो अडखळून पडल्याचं आपण पाहतो.

म्हणजे त्या व्यक्तीच्या पुढच्या कृतीची आपण जी अपेक्षा केलेली असते त्यात ओढवलेल्या अनपेक्षित परिस्थितीमुळे विचलन निर्माण होते आणि आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो.

ही विसंगत परिस्थिती चुका हायलाइट करते. यासाठी आपण एक उदाहरण बघू. आपण अंदाज बांधतो की x चा क्रम y असेल, पण नंतर अनपेक्षितपणे b च्या माध्यमांतून घटना समोर येते आणि पुढे काय घडेल याचा आपला अंदाज चुकतो. थोडक्यात गोष्टी सुसंगत राहिलेल्या नसतात.

आपण त्या स्थितीवर हसतो कारण आपण ती विसंगती सोडवण्याचा प्रयत्न करतो.

पडणे

फोटो स्रोत, Getty Images

चेहऱ्यावरील हावभाव

या आश्चर्यकारक आणि विसंगत परिस्थितीला सामोरं जाताना आपला मेंदू अशी माहिती शोधतो ज्यामुळे आपल्याला काय घडत आहे याचा अर्थ लावता येतो आणि त्यानुसार तो प्रतिक्रिया देतो.

अडखळणाऱ्याचा चेहरा आपल्याला काय सांगतो? आपण जे डीकोड करतो त्यानुसार आपली प्रतिक्रिया ठरते.

यासाठी एक रिसर्च करण्यात आला. या रिसर्चमध्ये सहभागी झालेल्या लोकांसमोर तीन प्रकारच्या चेहऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 210 प्रतिमा ठेवण्यात आल्या.

  • यात भीती व्यक्त करणारे, गोंधळलेले चेहरे
  • राग किंवा दुःख व्यक्त करणारे चेहरे
  • तर काही चेहरे झाकलेली शरीरं अस्ताव्यस्त स्थितीत ठेवली होती.
पडणे

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अभ्यासाचा उद्देश कळू नये म्हणून सहभागींना गोंधळात टाकण्यासाठी फोटो सेटमध्ये 20 लँडस्केप फोटो टाकण्यात आले होते.

प्रत्येक वेळी जेव्हा नवा फोटो समोर यायचा तेव्हा सहभागी लोकांना एक बटन दाबायचं होतं. त्यांच्या मेंदूची क्रिया यादरम्यान रेकॉर्ड केली जात होती. प्रत्येक फोटो किती मजेदार वाटला यावरही त्यांना फीडबॅक द्यायला सांगितलं होतं.

अभ्यासाच्या शेवटी असं दिसून आलं की, गोंधळलेल्या चेहऱ्यांचे फोटो वेदना किंवा राग व्यक्त केलेल्या फोटोपेक्षा मजेदार दिसत होते. आणि वेडंवाकडं शरीर त्याहीपेक्षा मजेदार दिसत होतं.

मेंदू संबंधीचा जो डेटा रेकॉर्ड केला होता त्यानुसार चेहऱ्यावरील हावभाव असा एक घटक आहे ज्यामुळे विचित्र परिस्थिती निर्माण झाली तरी आपल्याला ती मजेदार वाटते.

अशाप्रकारे जेव्हा आपल्याला गोंधळ उडालेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव बघतो तेव्हा आपल्याला हसू येतं.

दुसरीकडे जर आपण त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभावात दुःख किंवा राग पाहिला तर आपल्याला त्याचं वाईट वाटतं, आपण त्याच्या वेदनांबद्दल सहानुभूती बाळगतो.

आपल्या न्यूरल सर्किट्समध्ये एखादी दुर्दैवी परिस्थिती ओळखण्याची, त्या घटनेचं विश्लेषण करण्याची क्षमता असल्याचं या अभ्यासातून सिद्ध होतं.

पडणे

फोटो स्रोत, Getty Images

आणि जर त्याठिकाणी मी असतो तर...

दुसर्‍या व्यक्तीची दुर्दैवी परिस्थिती पाहताना आपण स्वतःला त्याठिकाणी ठेऊन बघतो. आणि स्वतःला विचारतो की, "मी त्याठिकाणी असतो तर..?"

त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीमुळे त्यांना काय वाटत असेल हे आपल्याला जाणवतं. आपण अस्वस्थता, असहायता, अपमान आणि लज्जास्पद भावना त्वरीत ट्रिगर करू शकतो.

त्यामुळे लोकांच्या वेंधळेपणामुळे आपण हसलो तर आपण फार दुःख वाटून घेऊ नये. त्या हास्यास्पद परिस्थितीत हसल्याबद्दल स्वतःला माफ केलं पाहिजे.

थोडक्यात आपण दुसऱ्याच्या दुःखावर हसत नाही, तर त्यांच्या वेंधळेपणाबद्दल, विसंगत परिस्थितीबद्दल प्रतिक्रिया देतो. पण ते दुखावले असतील तर आपण हसणं टाळतो

त्या अर्थी बघायला गेलं तर मग रस्त्यावर चालताना मी स्वतः अडखळलो तर मी स्वतःवरच हसेन.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)