अफगाणिस्तानचा इंग्लंडवर सनसनाटी विजय, वर्ल्डकपमधले आजवरचे हे 11 धक्कादायक पराभव माहितीयेत?

अफगाणिस्ताननं इंग्लंडवर सनसनाटी विजय मिळवला आणि यंदाच्या विश्वचषकातला आत्तापर्यंतच्या सर्वात धक्कादायक निकालाची नोंद केली आहे.

दिल्लीत झालेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं इंग्लंडचा 69 धावांनी पराभव केला आहे.

गतविजेत्या इंग्लंडला अफगाणिस्ताननं दिलेलं 285 धावांचं आव्हान पेलवलं नाही. त्यांची संपूर्ण टीम 215 धावांवर बाद झाली.

फिरकी गोलंदाजीला साथ देणाऱ्या दिल्लीतल्या पिचचा फायदा उठवत अफगाणिस्ताननं हा विजय मिळवला.

अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमान आणि रशीद खान यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

मोहम्मद नबीनं 2, फझलहक फारुकी आणि नवीन उल हक यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

वन-डे विश्वचषक स्पर्धेतील अफगाणिस्तानचा हा दुसराच विजय आहे. यापूर्वी त्यांनी 2015 च्या विश्वचषकात स्कॉटलंडवर 1 विकेटनं निसटता विजय मिळवला होता.

विश्वचषकातील खळबळजनक विजय

याआधीच्या वन डे विश्वचषकातही कागदावर दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघांनी बलाढ्य संघांना धक्का देत रंगत आणली होती. आजवरच्या अशाच काही खळबळजनक सामन्यांवर नजर टाकूयात.

1. भारताची वेस्ट इंडिजवर मात (1983)

भारतीय क्रिकेटमधला कदाचित सर्वांत महत्त्वाचा ठरलेला विजय हा क्रिकेटच्या इतिहासातला एक सर्वांत मोठा अपसेट होता.

1983 साली विश्वचषकाता अंतिम सामन्यात भारतीय संघानं बलाढ्य वेस्ट इंडिज पराभूत केलं होतं आणि विजेतेपद मिळवलं होतं

2. श्रीलंकेचा ॲास्ट्रेलियाला दणका (1996)

1983 नंतर 1996 साली क्रिकेट विश्वाला अनपेक्षित विश्वविजेता मिळाला. श्रीलंकेनं लाहौरमधील गड्डाफी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात 1987 चा विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं.

3. बांगलादेशचा भारताला धक्का ( 2007)

वेस्ट इंडिजमध्ये 2007 साली झालेला विश्वचषक भारतीय टीमसाठी निराशाजनक ठरला. त्या विश्वचषकात बांगलादेशनं भारताला पराभूत केलं. या पराभवामुळे टीम इंडियाचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं होतं.

4 आयर्लंडचा पाकिस्तानवर विजय ( 2007)

2007 साली झालेल्या वर्ल्ड कपमध्ये आयर्लंडनं भारताचा शेजारी पाकिस्तानवर खळबळजनक विजयाची नोंद केली. पाकिस्तानच्या या पराभवानंतर काही तासांमध्येच त्यांचे कोच बॉब वुल्मर यांचा मृत्यू झाला.

5 झिम्बाब्वेचे धक्कादायक विजय

झिम्बाब्वेची टीम 1999 च्या विश्वचषकातही चांगलीच फॉर्मात होती. त्यांनी भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन बड्या संघाना पराभूत केलं होतं.

झिम्बाब्वेनं 1983 साली ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं. क्रिकेटच्या इतिहासात आजही तो एक धक्कादायक निकाल म्हणून ओळखला जातो. तर 1992 साली इंग्लंडला पराभूत करत धक्कादायक निकालाची नोंद केली होती.

6. आयर्लंडचा इंग्लंडवर विजय (2011)

आयर्लंडनं 2011 साली बेंगळुरुमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडचा 3 विकेट्सनं पराभव केला होता. आयर्लंडच्या केव्हिन ओ ब्रायननं त्या सामन्यात 63 चेंडूत 113 धावांची खेळी केली होती.

7. वेस्ट इंडिजचे पराभव ( 1996 आणि 2015)

केनियानं 1996 साली पुण्यात झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला होता. त्यानंतर 2015 साली त्यांना आयर्लंडनही पराभूत केलं होतं.

8 आयर्लंडचा इंग्लंडवर विजय (2011)

आयर्लंडनं 2011 साली बेंगळुरुमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडचा 3 विकेट्सनं पराभव केला होता. आयर्लंडच्या केव्हिन ओ ब्रायननं त्या सामन्यात 63 चेंडूत 113 धावांची खेळी केली होती.

9 वेस्ट इंडिजचे पराभव ( 1996 आणि 2015)

केनियानं 1996 साली पुण्यात झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला होता.

10 वेस्ट इंडिजला 2015 साली आयर्लंडनही पराभूत केलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)