स्वीडनमध्ये कुराणचं दहन, तुर्कीसह सौदी अरेबिया, पाकिस्तान, कतारकडून निषेध

फोटो स्रोत, FREDRIK SANDBERG/TT/EPA-EFE/REX/SHUTTERSTOCK
युरोपातील स्वीडन देशामध्ये एका आंदोलनादरम्यान मुस्लीम धर्मियांचा पवित्र ग्रंथ असलेल्या कुराणची एक प्रत जाळल्याचा प्रकार समोर आला आहे.
या घटनेवर जगभरातून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत असून तुर्कीसह सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि कतार यांच्यासारख्या इस्लामिक देशांमधून या घटनेचा कठोर शब्दांत निषेध नोंदवण्यात येत आहे.
कुराणचं दहन करण्याच्या घटनेचा निषेध करताना तुर्कीने हा एक अत्यंत घृणास्पद प्रकार असल्याची प्रतिक्रिया दिली.
या आंदोलनाला परवानगी देण्याचा स्वीडन सरकारचा निर्णयच मुळाच आक्षेपार्ह आहे, असंही तुर्कीने म्हटलं.
तुर्की आणि स्वीडन या दोन देशांमधील राजनयिक संबंध पूर्वीपासूनच फारसे चांगले राहिलेले नाहीत.
तुर्कीने स्वीडनकडे हे आंदोलन थांबवण्याची मागणी केली. या घटनाक्रमादरम्यान स्वीडनचे संरक्षण मंत्री पॉल जॉन्सन यांनी तुर्की दौरा रद्द केला. या दौऱ्याला आता कोणताही अर्थ उरलेला नाही, असं तुर्कीने यावर म्हटलं.
तर पॉल जॉन्सन यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट करून म्हटलं, “काल माझी जर्मनीच्या रॅमस्टीन येथे अमेरिकन सैन्याच्या तळावर तुर्कीचे संरक्षण मंत्री हुलूसी अकार यांच्याशी भेट झाली. आम्ही अंकारामध्ये नियोजित बैठक तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.”
दुसऱ्या एका ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं, “तुर्कीसोबतचे स्वीडनचे संबंध आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. आम्हाला अपेक्षा आहे की संरक्षणाशी संबंधित मुद्द्यांवर लवकरच आमची एकत्रित चर्चा होईल.”
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
मुस्लिमांच्या मान्यतेनुसार, कुराण हा ग्रंथ अल्लाहच्या तोंडून आलेल्या वचनांचं पुस्तक आहे. त्यामुळे कुराणची अवहेलना करण्याच्या कृतीला इस्लाममधून कठोर विरोध होतो.
स्वीडनसाठी तुर्की महत्त्वाचा का?
स्वीडनला नेटो या लष्करी संघटनेत सहभागी व्हायचं आहे. पण नेटोचा सदस्य असलेला तुर्की त्याविरोधात आहे.
नेटोचा सदस्य असल्यामुळे कोणताही देश इतर कोणत्याही देशाच्या नेटोत सहभागी होण्याला विरोध दर्शवू शकतो.
रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर स्वीडन आणि फिनलँड या देशांनी नेटो संघटनेत सहभागी होण्याची मागणी केली आहे.
पण या मागणीला तुर्कीच्या विरोधामुळे स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे तुर्कीच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. स्वीडनमधील उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून हे आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनादरम्यान तुर्कीच्या उच्चायुक्त कार्यालयाबाहेर अति-उजव्या स्ट्राम कुर्स पार्टीचे नेते रासमुस पैलुदान यांनी शनिवारी कुराणची एक प्रत जाळली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
स्वीडनचे संरक्षण मंत्री यांच्या नियोजित तुर्की दौऱ्याने त्यांचा विरोध मावळला, असे संकेत दिले जाऊ शकतील, असं मानलं जात होतं.
गेल्या वर्षी नेटोमध्ये सहभागी होण्याची मागणी स्वीडन आणि फिनलँडने केल्यानंतर तुर्कीने त्याचा सुरुवातीला विरोध केला, मात्र नंतर त्यांनी याबाबतचा आपला व्हीटो काढून घेतला होता.
तुर्कीचं म्हणणं आहे की, दोन्ही देशांनी तुर्की पीकेके या शस्त्रसज्ज कुर्द गटाला पाठिंबा देणं बंद करावं. तसंच शस्त्रांच्या विक्रीवर तुर्कीवर लावण्यात आलेली बंदीही हटवावी.
स्वीडनने पीकेकेच्या काही सदस्यांना आपल्या देशात आश्रय दिल्याचा आरोपही तुर्कीकडून केला जात आहे. मात्र, हे आरोप स्वीडनने सुरुवातीपासून फेटाळले आहेत.
तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप अर्दोआन यांचे टीकाकार आणि कुर्द नेत्यांचं प्रत्यार्पण करण्यात यावं, अशी तुर्कीची मागणी आहे.
तुर्कीकडून टीका
तुर्की हा एक मुस्लीम बहुल देश आहे. तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक स्टेटमेंट प्रसिद्ध करून या घटनेवर टीका केली. अनेकवेळा इशारा देऊनसुद्धा ही घटना झाली, असं ते म्हणाले.
मंत्रालयाने म्हटलं, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या युक्तिवादाच्या आडून मुस्लिमांवर निशाणा साधणं, आमच्या पवित्र मूल्यांचा अपमान करणं, अशा मुस्लिमविरोधी कामांना परवानगी देण्याचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे.
युरोपात इस्लामोफोबिया, वंशवाद आणि भेदभाव हा धोक्याच्या पातळीबाहेर पोहोचल्याचं ही घटना उत्तम उदाहरण आहे. स्वीडन सरकारने त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी.”
स्वीडनचे परराष्ट्र मंत्री टोबयास बिलस्टॉर्म यांनी ही घटना भीती वाढवणारी आहे, असं म्हटलं.
सोशल मीडियावर त्यांनी लिहिलं, “स्वीडनमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण इथं जे घडलं त्याचा मी किंवा सरकार समर्थन करतो, असा अर्थ काढू नये.”
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
OIC ने केला विरोध
OIC ने सेक्रेटरी जनरल हिसिन ब्राहिम ताहानेही घटनेचा निषेध नोंदवला. त्यांच्या मते, स्वीडनच्या अधिकाऱ्यांच्या पाठिंब्यानेच हा प्रकार झाला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
पाकिस्तानने काय म्हटलं?
स्वीडनमध्ये कुराण जाळण्याच्या प्रकरणावर पाकिस्तानने प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत एक ट्विट करून म्हटलं, “स्वीडनमध्ये कुराण जाळण्याच्या घटनेचा आम्ही कठोर निषेध करतो. या मूर्खपणाच्या आणि इस्लामद्वेष्ट्या कृत्यामुळे कोट्यवधी मुस्लिमांच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचली आहे. अशा प्रकारची कोणतीही कृती अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसून ती स्वीकारार्ह नाही. इस्लाम हा शांतिप्रिय आणि इतर धर्मांचा आदर करणाऱ्या मुस्लिमांचा धर्म आहे. या सिद्धांताचा सर्वांनी सन्मान करायला हवा.”
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 5
इतर देशांनीही इस्लामोफोबिया, असहिष्णुता आणि हिंसाचार भडकवण्याच्या प्रयत्नांच्या विरोधात भूमिका घ्यावी, असं आवाहन पाकिस्तानने केलं आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी याविषयी ट्विट करून म्हटलं, “स्वीडनमध्ये एका उजव्या विचारसरणीच्या कट्टरवाद्याकडून पवित्र कुराणचा अनादर करण्यात आला. याची निंदा करण्यासाठी शब्दही पुरणार नाहीत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आडून जगभरातील दीड अब्ज मुस्लिमांच्या धार्मिक भावनेला दुखावलं जाऊ शकत नाही.”
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 6
सौदी अरेबिया, कतारकडून निषेध
सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट करून म्हटलं, “सौदी अरेबिया हा संवाद, सहिष्णुता, सह-अस्तित्व यांचं महत्त्व जाणतो. आम्ही द्वेष आणि कट्टरवादाच्या विरोधात आहोत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 7
कतारने या आंदोलनाला परवानगी देण्याच्या स्वीडनच्या निर्णयावर टीका केली.
त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, “जगभरातील दोन अब्ज मुस्लिमांच्या भावना भडकवण्यासाठी आणि त्यांना उचकवण्यासाठीची ही गंभीर घटना आहे. धर्माच्या आधारावर दिल्या जाणाऱ्या हेट स्पीचचा कतार विरोध करतो.”
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 8
स्वीडनमध्ये आंदोलन सुरूच
स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये कुराण जाळण्याच्या घटनेच्या विरोधात आणि त्याच्या बाजूने दोन्हीकडून आंदोलन होताना दिसत आहे.
गेल्या आठवड्यात स्टॉकहोममध्ये झालेल्या एका आंदोलनात तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यम अर्दोआन यांचा प्रतिकात्मक पुतळा वीजेच्या खांबावर लटकवण्यात आला होता.
याबाबत स्वीडनचे पंतप्रधान म्हणाले की स्टॉकहोममध्ये तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांचा पुतळा लटकवण्याचा हा प्रकार नेटोत सहभागी होण्याच्या स्वीडनच्या प्रयत्नांना नुकसान पोहोचवू शकतो.
गेल्या वर्षीही रासमुस पैलुदान यांनी अनेक आंदोलनांचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये त्यांनी कुराण जाळण्याची धमकी दिली होती. यानंतर स्वीडनमध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटही झाली होती.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)