दक्षिण कोरियातील वणव्याच्या हाहाकारात 27 जणांचा बळी; 1300 वर्षे जुनं बौद्ध मंदिर जळून खाक

दक्षिण कोरियात वणव्याचा हाहाकार

फोटो स्रोत, Getty Images

दक्षिण कोरियाच्या आग्नेय भागात ठिकठिकाणी वणवे पेटले आहेत. या वणव्यांनी आतापर्यंत 27 जणांचा बळी घेतला आहे. हे वणवे अद्यापही पेटलेलेच असून त्यांना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातोय. 21 मार्चपासून या वणव्याला सुरुवात झाली.

दक्षिण कोरियात वणव्याचा हाहाकार

फोटो स्रोत, EPA

दक्षिण कोरियाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा वणवा आहे. या वणव्यातून लोकांना आणि प्राचीन कलाकृतींना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

ग्राफिक्स
ग्राफिक्स
दक्षिण कोरियात वणव्याचा हाहाकार

फोटो स्रोत, EPA

या वणव्याच्या आगीला भक्ष्यस्थानी पडलेले बरेचसे पीडित हे साठी वा सत्तरीतील ज्येष्ठ नागरिक आहेत. थोडक्यात, ज्यांना पटकन आपल्या सुरक्षेसाठी आग लागलेलं ठिकाण सोडता आलेलं नाहीये, ते या आगीत बळी पडलेले आहेत.

दक्षिण कोरियात वणव्याचा हाहाकार

फोटो स्रोत, Getty Images

या वणव्यामुळे आतापर्यंत 23 हजारहून अधिक लोकांना आपापली घरं सोडून स्थलांतरित व्हायला लागलं आहे.

दक्षिण कोरियात वणव्याचा हाहाकार

फोटो स्रोत, Getty Images

विशेष चिंतेची बाब म्हणजे या वणव्याच्या आगीमध्ये 1300 वर्षे जुनं असं एक प्रार्थनास्थळ देखील भक्ष्यस्थानी पडलं आहे. उइसोंग शहरातील हे प्रार्थनास्थळ असून त्यातील सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टी तिथून हटवून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्या आहेत.

दक्षिण कोरियात वणव्याचा हाहाकार

फोटो स्रोत, Getty Images

उत्तर ग्योंगसांग प्रांतातील उइसोंग येथील गौन्सा प्रार्थनास्थळाचे जळालेले अवशेष संरक्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय.

उइसोंगमधील 1300 वर्षं जुन्या गौन्सा प्रार्थनास्थळाचे जळालेले अवशेष हेच या वणव्यातील विनाशाचं सर्वात प्रमुख प्रतिक बनलं आहे.

दक्षिण कोरियात वणव्याचा हाहाकार

फोटो स्रोत, Getty Images

एकंदरीत, या आगीमुळे, दक्षिण कोरियातील इतर सांस्कृतिक स्थळांनाही धोका निर्माण झाला आहे.

सध्या, या वणव्याच्या मार्गात असलेल्या प्राचीन ऐतिहासिक स्थळांचं संरक्षण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

दक्षिण कोरियात वणव्याचा हाहाकार

फोटो स्रोत, Getty Images

या वणव्यामुळे आतापर्यंत 23 हजार हून अधिक लोकांना आपापली घरं सोडून स्थलांतरित व्हायला लागलं आहे.

शुक्रवारी म्हणजेच 21 मार्च रोजी सॅनचेओंगमध्ये या वणव्याला सुरुवात झाली आणि त्यानंतर हा वणवा उइसंगपर्यंत पोहोचला.

दक्षिण कोरियात वणव्याचा हाहाकार

फोटो स्रोत, Getty Images

मानवी कृतींमुळेच अनेक ठिकाणी आगी लागल्या; परंतु, जोरदार वारे आणि कोरडी जमीन यामुळे या वणव्यांना पसरण्यास अधिकच मदत झाली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा वणवा आता शेजारच्या ग्योंगबुक, उइसोंग, अँडोंग, चेओंगसोंग, येओंगयांग आणि सँचेओंग अशा देशांमध्ये पसरला आहे.

दक्षिण कोरियात वणव्याचा हाहाकार

फोटो स्रोत, Getty Images

"या अभूतपूर्व अशा दुर्घटनेमुळे आपल्या देशाच्या इतिहासातील सर्वात भीषण अशा वणव्यांचं रेकॉर्ड बुक पुन्हा लिहिलं जाईल", असं वर्णन विद्यमान राष्ट्राध्यक्ष हान डक-सू यांनी केलंय.

दक्षिण कोरियात वणव्याचा हाहाकार

फोटो स्रोत, Getty Images

ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे हजारो कर्मचारी आणि सैन्यदलातील 5 हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच कोरियामध्ये तैनात असलेले अमेरिकन सैन्याचे हेलिकॉप्टर्स देखील या कामी वापरले जात आहेत.

दक्षिण कोरियात वणव्याचा हाहाकार

फोटो स्रोत, Getty Images

दक्षिण कोरियाची वृत्तसंस्था योनहापने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर ग्योंगसांग प्रांतातील उइसोंग काउंटीच्या काही भागात पाऊस सुरू झाला आहे. हे वणवे लवकरच आटोक्यात येतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)