पाकिस्तानात आश्रय घेण्यासाठी पोहोचलेले भारतीय बापलेक म्हणतात, 'गोळ्या घाला, पण पाठवू नका'

फोटो स्रोत, SHUMAILA KHAN
- Author, नियाज फारुकी, शुमैला खान
- Role, बीबीसी उर्दू प्रतिनिधी
भारतातील राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद हसनैन या आठवड्यात आपला मुलगा इशाक अमीर याच्यासोबत आश्रयासाठी पाकिस्तानात पोहोचले. अफगाणिस्तानमार्गे बेकायदेशीरपणे प्रवास करून ते कराचीत पोहोचले.
त्यांनी आरोप केला की त्यांना भारतात 'धार्मिक द्वेष आणि छळाचा सामना करावा लागत होता' आणि माघारी जाण्यापेक्षा ते 'पाकिस्तानमध्ये मरण किंवा तुरुंगात राहणं पसंत करतील'.
हे दोन्ही भारतीय नागरिक कराचीच्या अंचौली भागातील ईधी होम राहतात. त्यांना ईधी होममधून बाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली असून त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी दोन पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
66 वर्षीय मोहम्मद हसनैन आणि 31 वर्षीय इशाक अमीर यांनी बीबीसीशी बोलताना दावा केला की, ते या वर्षी 5 सप्टेंबर रोजी दिल्लीहून अबुधाबीला गेले होते, जिथून त्यांनी अफगाणिस्तानचा व्हिसा मिळवला होता. ते काबूलला पोहोचले आणि तिथून कंदाहारमधील स्पिन बोल्डक येथील काही लोकांनी पैसे घेऊन त्यांना पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात असलेल्या चमनमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करण्यास मदत केली.
मोहम्मद हसनैन म्हणाले, "आम्ही चमन ते क्वेट्टा दहा हजार रुपयांत टॅक्सी घेतली आणि तीच टॅक्सी पन्नास हजार रुपये देऊन क्वेट्टाहून कराचीला पोहोचलो."
त्यांच्या म्हणण्यानुसार, "जेव्हा त्यांना हॉटेलमध्ये राहण्यासाठी जागा मिळाली नाही, तेव्हा त्यांनी स्वतः पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना आपली कहाणी सांगितली. त्यांनी सांगितलं की, त्यांच्यावर सीमा ओलांडल्याचा आरोप आहे आणि त्यांना आश्रय हवा आहे."

फोटो स्रोत, द मीडिया प्रोफ़ाइलचा स्क्रीनशॉट
त्यांच्या म्हणण्यानुसार, पोलीस स्वत: त्यांना ईधी सेंटरमध्ये घेऊन गेले.
मोहम्मद हसनैन यांनी सांगितले की. ते भारतात पत्रकारितेच्या व्यवसायाशी संबंधित होते आणि दिल्लीतून आठ पानांचे साप्ताहिक 'चार्जशीट' प्रकाशित करायचे, ज्याचे नाव बदलून नंतर 'द मीडिया प्रोफाइल' असे ठेवण्यात आले.
भारतात ते कुठे राहायचे?
मोहम्मद हसनैन यांचा जन्म 1957 साली झारखंडमधील जमशेदपूर शहरात झाला होता, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ते दिल्लीत राहत असल्याचे सांगतात.
1989 मध्ये त्यांचे लग्न झाले जे साडेचार वर्षे टिकले. त्या लग्नातील दोन मुलांपैकी एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा मुलगा इशाक अमीर हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे.
मोहम्मद हसनैन यांना झैबुन्निसा आणि कौसर या दोन बहिणी आहेत. मोठी बहीण झैबुन्निसा त्यांच्यापेक्षा 21 वर्षांनी मोठी आहे आणि ती झारखंडमध्ये राहते, तर धाकटी बहीण कौसर ही लखनऊची रहिवासी आहे.
एकतीस वर्षांचा इशाक अमीर सांगतात की, तो मदरशात जायचा जिथे तो कुराण वाचायला शिकला आणि पाठांतर केलं. त्यांनी आलिम-ए-दीन (धार्मिक विद्वान) किंवा वकील व्हावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती, परंतु 10 वी आणि 12 वी नंतर तो नोकरीत करू लागला. तो त्याच्या आयुष्यात कधीही शाळेत गेला नाही परंतु त्याने दिल्लीतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (एनआईओएस) मधून 10 वी आणि 12 वीची परीक्षा पास केली.

फोटो स्रोत, SHUMAILA KHAN
इसाकच्या म्हणण्यानुसार, त्याने 2014 ते 2019 या काळात डीन ब्रॉडबँड नावाच्या कंपनीत काम केले. त्याने इंडस्ट्रियल सेफ्टी मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा देखील केला होता आणि दुबईतील एका कंपनीत एप्रिल 2021 ते 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत म्हणजे सुमारे सहा महिने सुरक्षा निरिक्षक म्हणून काम केले होते. 2021 मध्ये भारतात परत आल्यानंतर त्याने नाईगोस इंटरनॅशनल जनरल प्रमाणपत्र अभ्यासक्रमही पूर्ण केला.
इशाक अमीर याने सांगितले की, अबुधाबीच्या एका कंपनीने त्यांना नोकरी देण्याची तयारी दर्शवली होती ज्याचा पगार चार हजार दिराम होता आणि नोकरी 10 सप्टेंबर 2023 रोजी सुरू होणार होती, परंतु त्याच्या म्हणण्यानुसार, "आम्ही हिजरतसाठी (भारत सोडण्यासाठी) संपूर्ण योजना आधीच तयार केली होती."
"वडील म्हणाले होते की आम्हाला या देशात रहायचे नाही म्हणून मी 5 सप्टेंबरची तिकिटं बुक केली. अबुधाबीहून अफगाणिस्तानला जाऊन बघू, कदाचित काहीतरी होईल. आपण एकदा प्रयत्न करूया, असंही ते म्हणाले."
प्रक्षोभक पोस्टर चिकटवल्याचा आरोप
मोहम्मद हसनैन एम. हसनैन नावाने लिहितात. त्यांच्या मते, दिल्लीतील त्यांचे साप्ताहिक 'द मीडिया प्रोफाइल' प्रकाशित करण्याबरोबरच ते एक प्रशिक्षण केंद्र देखील चालवतात. यामध्ये ते तरुणांना इंग्रजी भाषा शिकवून त्यांना कायद्याच्या शिक्षणासाठी तयार करायचे.
याच कारणास्तव त्यांचा मुलगा इशाक अमीर यानेही वकील व्हावे अशी त्यांची इच्छा होती, पण त्याने नकार दिला.
मोहम्मद हसनैन स्वतःची ओळख एक सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ता म्हणून करून देतात. आजवर त्यांनी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या असल्या तरी त्यांना कुठेही यश मिळालेले नाही. त्या काळात त्यांच्यावर प्रक्षोभक पोस्टर्स लावण्याच्या आरोपासह काही गुन्हेही दाखल झाल्याची माहिती आहे.

फोटो स्रोत, SHUMAILA KHAN
मोहम्मद हसनैन आणि इशाक अमीर यांच्या म्हणण्यानुसार, ते दिल्लीच्या जाफराबाद भागात गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून भाड्याच्या घरात राहत होते आणि त्यांचे शेवटचे वास्तव्य गौतमपुरीत होते.
भारतातील आप्तेष्टांना चिंता
या दोन्ही पिता-पुत्रांच्या पाकिस्तानात जाण्याच्या निर्णयाबाबत भारतातील त्यांच्या ओळखीच्या किमान तीन लोकांनी बीबीसीशी बोलताना आश्चर्य व्यक्त केले. ते पाकिस्तानात गेल्याची बातमी त्यांना प्रसारमाध्यमांतून मिळाली, असं ते सांगतात.
एमएम हाश्मी स्वतःला मोहम्मद हसनैनचे वकील म्हणवतात. हाश्मी म्हणतात की, त्यांनाही पाकिस्तानात जाण्याबाबत कोणतीही माहिती नव्हती.
ते म्हणतात, "मी त्यांचा वकील आहे. मला एवढंच माहीत आहे की, तो त्याच्या मुलाला नोकरीसाठी दुबईला घेऊन गेला होता. त्यानंतर मला काहीच माहिती नाही. बातमी आल्यानंतर मला हे कळलं."
पाकिस्तानला जाण्यापूर्वी ते ज्या पत्त्यावर राहत होते, तिथल्या त्यांच्या शेजाऱ्यांनीदेखील याबाबत आश्चर्य वाटत आहे. ते म्हणाले की जेव्हा प्रसारमाध्यमं आणि पोलिस हसनैनबद्दल विचारण्यासाठी आले तेव्हा त्यांना त्यांच्या पाकिस्तानात जाण्याची माहिती मिळाली.
एका शेजाऱ्याने सांगितले, "त्यांनी सांगितलेलं की त्यांच्या मुलाला दुबईत नोकरी लागली आहे. ते तिथे जाणार आहे आणि दहा दिवसांत परत येणार."
मोहम्मद हसनैनचे घरमालक आणि शेजाऱ्यांचे म्हणणे आहे की ते बहुतेकदा एकटे आणि चुपचापपणे राहत असत.
"जर कोणी त्यांना नमस्कार केला तर ते प्रतिसाद देत असत."
हसनैन यांनी राजकीय पक्षाच्या पाठिंब्याने 2017 साली स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवली होती, असा दावा एका स्थानिक नेत्याने केला आहे. मलाही याची माहिती वृत्तपत्रातून मिळाली, असे त्यांचे म्हणणे आहे.
ते म्हणतात, "ते निघून गेल्याने आम्हालाही धक्का बसला आहे."
निवडणूक लढवल्यापासून हसनैनशी आपला विशेष संपर्क नव्हता, पण नुकतीच त्यांच्याशी एक धावती भेट झाल्याचं ते सांगतात.एका शेजाऱ्याने सांगितले, "त्यांनी सांगितलेलं की त्यांच्या मुलाला दुबईत नोकरी लागली आहे. ते तिथे जाणार आहे आणि दहा दिवसांत परत येणार."
मोहम्मद हसनैनचे घरमालक आणि शेजाऱ्यांचे म्हणणे आहे की ते बहुतेकदा एकटे आणि चुपचापपणे राहत असत.
"जर कोणी त्यांना नमस्कार केला तर ते प्रतिसाद देत असत."
हसनैन यांनी राजकीय पक्षाच्या पाठिंब्याने 2017 साली स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवली होती, असा दावा एका स्थानिक नेत्याने केला आहे. मलाही याची माहिती वृत्तपत्रातून मिळाली, असे त्यांचे म्हणणे आहे.
ते म्हणतात, "ते निघून गेल्याने आम्हालाही धक्का बसला आहे."
निवडणूक लढवल्यापासून हसनैनशी आपला विशेष संपर्क नव्हता, पण नुकतीच त्यांच्याशी एक धावती भेट झाल्याचं ते सांगतात.

फोटो स्रोत, मोहम्मद हसनैन यांचे वृत्तपत्र
स्थानिक नेत्याने यावरही शिक्कामोर्तब केले की निधीच्या अभावी सुमारे पाच वर्षांपूर्वी त्यांचे वृत्तपत्रही बंद पडले होते.
हसनैनचे पक्ष कार्यालय ज्या पत्त्यावर होते तिथले आजूबाजूचे लोक सांगतात की, पक्षाने काही वर्षांपूर्वीच गाशा गुंडाळला होता.
निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पत्त्यावर पक्षाचे नाव आणि त्यांच्या वृत्तपत्राच्या जुन्या नावाचा बॅनर 'गुगल स्ट्रीट व्ह्यू'मध्ये पाहता येऊ शकतो.
उर्दू आणि हिंदी भाषांमध्ये प्रकाशित होणाऱ्या त्यांच्या साप्ताहिक वृत्तपत्राच्या फेसबुकवर उपलब्ध असलेल्या पानांच्या प्रती भारतातील मुस्लिमांच्या व्यथा आणि वेदनांवर प्रकाश टाकतात.
अनेक वेळा निवडणुकीच्या रिंगणात
निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून स्पष्ट होते क, त्यांनी 2013 ची दिल्ली विधानसभा (सीलमपूर मतदारसंघ) आणि 2014 ची लोकसभा निवडणुक (ईशान्य दिल्लीतून अपक्ष उमेदवार म्हणून) लढवली होती. त्यामध्ये त्यांना अनुक्रमे 571 आणि 879 मते मिळाली होती.
निवडणुकीच्या पारदर्शकतेचे समर्थन करणा-या 'असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' (ADR) या संस्थेच्या नोंदी दर्शवतात की, त्यांनी 2004 आणि 2009 च्या लोकसभा निवडणुकाही लढवल्या होत्या.
त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रावरून असे दिसून आले आहे की त्यांच्यावर आयपीसी अंतर्गत तीन गुन्हे दाखल आहेत. म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांवरील हिंसाचाराच्या निषेधार्थ पोस्टर चिकटवल्यानंतर त्यांना तुरुंगात पाठवण्यात आल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. ते किती काळ तुरुंगात राहिले हे स्पष्ट झालेले नाही.

फोटो स्रोत, GOOGLE STREET VIEW
अधिवक्ता एमएम हाश्मी यांनी शिक्कामोर्तब केले की त्यांच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत.
ते म्हणाले, "एका प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, एका प्रकरणात आरोप निश्चित करण्यात आलेले नाहीत आणि एका प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही."
ते म्हणतात की, ही सर्व राजकीय प्रकरणे होती, कोणतेही गुन्हेगारी प्रकरण नव्हते. याबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.
पाकिस्तानची निवड का केली?
मोहम्मद हसनैन यांनी बीबीसीला सांगितले, "बघा, हा काही अचानक घडलेला किंवा विचार न करता घेतलेला निर्णय नाही आणि आम्ही इथून निघून जाण्याचे ठरवले."
बाबरी मशिदीशी संबंधित न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ त्यांनी दिला आणि पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष भाजपच्या विजयाकडे लक्ष वेधत भीतीही व्यक्त केली.
हे लक्षात घ्यायला हवे की, दिल्लीत ज्या लोकसभा मतदारसंघातून मोहम्मद हसनैन यांनी निवडणूक लढवली होती, तिथे 2020 मध्ये जातीय दंगली झाल्या होत्या, ज्यात पन्नासहून अधिक लोक मारले गेले होते, त्यापैकी बहुतेक मुस्लिम होते.
मोहम्मद हसनैन म्हणाले, "सणाच्या दिवशी आमचे हिंदू बांधव तिलक लावून आले तर तर कोण हिंदू आहेत आणि कोण मुसलमान आहेत, हे सहज ओळखता येते. एकदा एक छोटा वाद झाला तर लोकांनी त्याचं भांडवल केलं. शिवीगाळ केली आणि हाणामारी सुरू झाली."
"माझ्या मुलासोबतही असे दोन-तीन वेळा घडले, या सर्व घटनांमुळे दु:खी होऊन आम्हाला वाटले की देश सोडून जायला हवे."
ते म्हणाले, "रस्त्यावर, कार्यालयात, ट्रेनमध्ये किंवा काही कामानिमित्त कुठेही बाहेर गेलात तरी काहीतरी घडेल अशी भीती वाटत राहते. लुटमारीची चिंता नाही, चिंता आहे घोषणाबाजीची, धर्माला लक्ष्य करणे आणि लक्ष्य करून मारणे."

फोटो स्रोत, SHUMAILA KHAN
पण या दोघां पिता-पुत्रांनी इतर कोणत्याही देशात जाण्याऐवजी पाकिस्तानचीच निवड का केली? आमच्या या प्रश्नावर मोहम्मद हसनैन म्हणाले, "हे पाहा, आम्ही श्रीमंत लोक नाही आहोत की कोणत्याही देशात जाऊन दहा-पाच कोटी खर्च करून तिथले नागरिकत्व घेऊ शकू."
"आमच्याकडे फक्त पाकिस्तानचा पर्याय होता, जिथले लोक आमच्यासारखे बोलतात आणि आमच्या पूर्वजांचाही तो देश निर्माण करण्यात हातभार लागला होता."
पाकिस्तानात आपले कोणी नातेवाईक नसल्याने व्हिसा मिळू शकत नव्हता, असे त्यांनी सांगितले.
"पर्यटक व्हिसा घेऊन जाऊ आणि मग तिथे आश्रय घेऊ, असा विचार केला होता. मात्र त्यांच्याकडून (पाकिस्तान दूतावास) नकार आल्यावर काय होऊ शकते याचा आम्ही शोध घेऊ लागलो. दोन-तीन वर्षे अशीच निघून गेली. मग अचानक आम्हाला कळले की, जर तुम्ही दुबईला गेलात तर तिथून तुम्हाला अफगाणिस्तानचा व्हिसा मिळू शकतो.”
महेश भट्टसोबत हसनैनचा व्हिडिओ
2016 मध्ये हसनैन यांच्या वृत्तपत्राच्या नावाशी जोडलेल्या खात्यावरून एक व्हिडिओ ऑनलाइन अपलोड करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये ते त्यांच्या भागात पोलिसांच्या अत्याचाराविरोधात निदर्शने करताना दिसत आहेत.
2017 मध्ये अपलोड केलेल्या दुसर्या व्हिडिओमध्ये, ते मुस्लिमांच्या शोषणावर भाषण देताना दिसत आहेत ज्यामध्ये ते म्हणतात की धर्मनिरपेक्ष असल्याचा दावा करणारे राजकीय पक्ष आणि नेत्यांनी देखील मुस्लिमांची निराशा केली आहे.
याशिवाय, 2015 मध्ये अपलोड केलेल्या एका व्हिडिओमध्ये, ते चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यासोबत एका कार्यक्रमात सहभागी झाले आहेत ज्यामध्ये ते त्यांच्या एका चित्रपटाचा उदाहरण म्हणून वापर करून धर्मनिरपेक्षता आणि सांप्रदायिकतेबद्दल बोलताना दिसत आहेत.
या व्हिडीओमध्ये ते महेश भट्ट यांचे कौतुक करत म्हणतात की, त्यांना दोन्ही धर्मातील लोकांची मानसिकता चांगलीच समजते पण त्यांच्याकडेही अतिशय सावधगिरीने काम करण्याशिवाय काही पर्याय नाही. याला प्रत्युत्तर देताना महेश भट्ट हसत हसत त्यांना कॅमेऱ्यात ऐकताना दिसत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
मोहम्मद हसनैन म्हणतात, "तुमच्या हेतूबद्दल काही शंका नाही, तो (तुमचा) नाईलाज आहे. या देशातील हिंदू विचारवंतांना इतकी भीती आहे, हा नाईलाज आहे."
पंधरा मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये ते भारतीय मुस्लिमांच्या तक्रारींबद्दल विस्तृतपणे बोलतात.
25 सप्टेंबर रोजी हे दोन्ही भारतीय नागरिक कराची प्रेस क्लबमध्ये पोहोचले आणि त्यांनी भारतातील मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात निदर्शने केली, त्यानंतर ते पाकिस्तानात आल्याच्या बातम्या सर्व ठिकाणी प्रकाशित झाल्या.
पाकिस्तानचे नागरिकत्व मिळाले नाही तर...
मोहम्मद हसनैन आणि इशाक यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की त्यांना भारतात परत जायचे नाही, पण पाकिस्तानने त्यांना आश्रय आणि नागरिकत्व दिले नाही तर ते काय करतील?
इशाक अमीर म्हणाले, "आम्ही फक्त आसरा शोधत आहोत. इथे घर किंवा नोकरी मागणे हा आमचा उद्देश नाही. मी अजून लहान आहे, मला गाडी चालवता येते, मला भाकरी बनवता येते. बाहेर अनेक कष्टाच्या नोकऱ्या आहेत, मी ती कामं करू शकतो."
"वडिल शिकवू शकतात, मीही शिकवू शकतो. मी कुराण शिकवू शकतो. मी कुराण पाठ केले आहे. मला फक्त आश्रय हवा आहे, परत जायचे नाही."
"गोळ्या घाला, तुरुंगात टाकून सडवत ठेवा, काही हरकत नाही. जर तुम्हाला ठेवायचे नसेल तर तुमच्याकडील तुरूंगाच्या एका कोप-यात ठेवून द्या, पिंजऱ्यात बंद करा. तेही मान्य आहे."
मोहम्मद हसनैन म्हणाले, "मी या देशात जगण्यासाठी आलो नाही. मी या देशात शांततेत मरण्यासाठी आलो आहे. मला आता जगण्याची इच्छा नाही."
सीमा हैदर प्रकरणाचे उदाहरण देताना तो म्हणाला की, तिथलं सरकार सीमाला स्वीकारू शकत असेल, तर माझा स्वीकार करण्याला जगातील कोणतीही शक्ती पाकिस्तान सरकारला थांबवत्येय.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








