सुदीक्षा भाटी मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांकडून SIT ची स्थापना

फोटो स्रोत, @twitter
अमेरिकेतील बॉब्सन कॉलेजमध्ये शिक्षणासाठी अंदाजे चार कोटी रुपयांची स्कॉलरशिप मिळालेल्या बुलंदशहरातील सुदीक्षा भाटी मृत्युप्रकरणात पोलिसांनी स्पेशल इनवेस्टिगेशन टीमची स्थापना केली आहे.
सुदीक्षा तिच्या काकांबरोबर जात असताना काही तरुणांनी तिचा पाठलाग केला आणि त्यात तिचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला होता. त्यानंतर या घटनेवर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी या तपासासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे.
उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहरात मोटरसायकलवरून पडून सुदीक्षा भाटी या तरुणीचा मृत्यू झाला. काका सोबत मोटरसायकलवरून जाताना छेडछाड करणाऱ्या तरुणांनी पाठलाग केल्याने हा अपघात झाल्याचा दावा कुटुंबाने केलाय.
तर दुसरीकडे बुलंदशहरचे जिल्हाधिकारी रविंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीमध्ये अशा प्रकारची छेडछाड झाल्याचा उल्लेख नाही.
दोन वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या मॅसेच्युसेट्मधल्या बॅबसन कॉलेजमध्ये शिकण्यासाठी तब्बल 3.83 कोटी रुपयांची स्कॉलरशिप मिळाल्याने सुदीक्षाचं नाव बातम्यांमध्ये झळकलं होतं.
ऑगस्ट 2018मध्ये अमेरिकेला शिक्षणासाठी गेलेली सुदीक्षा कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरायला लागल्यानंतर जून महिन्यात भारतात परतली होती.
काकांसोबत मोटरसायकलवरून नातेवाईकांना भेटण्यासाठी सिकंदराबादला जात असताना काही तरुणांनी त्यांच्या मोटरसायकलचा पाठलाग सुरू केला. या तरुणांनी सुदीक्षाच्या काकांच्या मोटरसायकलच्या जवळ येत स्टंट्स करायला सुरुवात केली. या बाईकस्वारांनी अचानक जवळ येत ब्रेक मारल्याने सुदीक्षाच्या काकांना तोल सांभाळणं कठीण गेलं. यात जमिनीवर फेकली गेलेली सुदीक्षा डोक्यावर आपटली आणि तिचा जागीच मृत्यू झाल्याचं झी न्यूजनेम्हटलंय.
NDTV ने सुदीक्षाचे काका सतेंभर भाटी यांचा अनुभव बातमीत दिलाय. यात या अपघाताविषयी त्यांनी सांगितलं, "आम्ही बुलंदशहर नगर ओलांडून गावात शिरलो तेव्हा एका बाईकने आम्हाला अनेकदा ओव्हरटेक केलं. तो मोटरसायकलस्वार अतिशय बेदरकारपणे चालवत होता. त्याने स्टंट्स करायला सुरुवात केली. मी माझ्या मोटरसायकलचा वेग कमी केला पण इतर बाईकची आम्हाला धडक बसली. आम्ही दोघेही पडलो पण माझ्या पुतणीला डोक्यावर जखमा झाल्या. मला दुसऱ्या बाईकस्वाराला ओळखता आलं नाही. आमच्या अपघातानंतर तो लगेच पळून गेला."
पण ANI ने दिलेल्या माहितीनुसार सुदीक्षाचे काका बाईक चालवत असल्याची माहिती चुकीची असून तिचा अल्पवयीन भाऊ मोटरसायकल चालवत होता आणि त्यांनी हेल्मेट घातलं नसल्याचं बुलंदशहराचे जिल्हाधिकारी रविंद्र कुमार यांनी म्हटलंय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
सुदीक्षा आपल्या भावासोबत मामाकडे मोटरसायकलवरून जात असताना औरंगाबादच्या आधी 3 किलोमीटर्सवर ट्रॅफिकमुळे त्यांच्या पुढच्या व्यक्तीने ट्रॅफिकमुळे ब्रेक लावल्याने हा अपघात झाल्याचं बुलंदशहराचे जिल्हाधिकारी रविंद्र कुमार यांनी म्हटलंय. ANIने याविषयी ट्वीट केलंय.
आपण या प्रकरणाचा तपास करत असल्याचं बुलंदशहर पोलिसांनी म्हटलंय. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी घटना प्रसंगी हजर असणाऱ्या लोकांची चौकशी करत माहिती घेतली, समोरची रॉयल एन्फिल्ड मोटरसायकल ट्रॅफिकमुळे अचानक थांबल्याने अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय. बुलंदशहर पोलिसांनी सुदीक्षाच्या चुलत भावाचा व्हिडिओही ट्विटरवर शेअर केलाय. यामध्ये तो अपघाताचं वर्णन करताना दिसतो पण यात त्याने छेडछाडीचा उल्लेख केलेला नाही.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
या घटनेनंतर आता सोशल मीडियावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून उत्तर प्रदेश सरकारला मुलींच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न विचारले जात आहेत.
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनीही याविषयी ट्वीट केलंय. त्या म्हणतात, "बुलंदशहरात आपल्या काकांसोबत बाईकवरून जाणारी हुशार विद्यार्थिनी सुदीक्षा भाटीला रोडरोमियोंमुळे आपला जीव गमवावा लागला, हे अतिशय दुःखद, अतिशय लाजीरवाणं आणि अतिशय निंदनीय आहे. मुली पुढे जाणार कशा? युपी सरकारने ताबडतोब दोषींविरोधात कडक कारवाई करावी अशी बसपची मागणी आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
शिव नाडर फाऊंडेशनच्या शाळेत शिकलेल्या सुदीक्षाने 2018साली 12वीत 98 टक्के मार्क मिळवले होते. यात तिला इतिहास आणि अर्थशास्त्रात 100 तर भूगोलात 99 मार्क मिळाले होते.
20 वर्षांची सुदीक्षा भाटी ऑगस्टमध्ये अमेरिकेला परतणार होती.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)