ब्रेस्ट कॅन्सर : कृष्णवर्णीय महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका इतरांच्या तुलनेत अधिक का?

डॉ. लिसा न्युमन आणि डॉ. मेलिसा बी. डेविस संशोधनाचं कार्य करत आहेत.

फोटो स्रोत, JOHN ABBOTT

फोटो कॅप्शन, डॉ. लिसा न्युमन आणि डॉ. मेलिसा बी. डेविस संशोधनाचं कार्य करत आहेत.

अमेरिकेतील संशोधनकर्त्यांनी आफ्रिकन वंशाचे लोक आणि एक आक्रमक प्रकारचा ब्रेस्ट कॅन्सर यांच्यात जेनेटिक (आनुवंशिक) अनुबंध असल्याचा शोध समोर आणला आहे.

या संशोधनामुळे अधिक संख्येने कृष्णवर्णीय लोक क्लिनिकल ट्रायलमध्ये भाग घेतील जेणेकरून त्यांना आजाराची माहिती लवकर मिळेल आणि त्यांना वाचवण्याची शक्यता वाढेल असा विश्वास संशोधकांना वाटतो.

न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या 53 वर्षीय आफ्रिकन-अमेरिकन लेवेरीन फांटलेरॉय म्हणाल्या, "मी कधीच विचार केला नव्हता की मला कोणत्या गोष्टीची काळजी करण्याची गरज आहे."

लेवरीन एक निरोगी आयुष्य जगत होत्या. त्या सकस आहार घेत होत्या. नियमित व्यायाम करत होत्या. पण जानेवारी महिन्यात त्यांच्या वाढदिवसाआधी त्यांना त्यांच्या आजाराबद्दल कळालं आणि त्या घाबरल्या.

त्या सांगतात, "मला ब्रेस्ट कॅन्सर आहे. कॅन्सर झालेल्या जेवढ्या लोकांना मी ओळखते त्यापैकी बहुतांश यातून वाचले नाहीत. त्यामुळे स्वाभाविक आहे की मी पण घाबरले."

हा एक कमी सामान्य प्रकार आहे परंतु हा कॅन्सर वेगाने पसरतो. तसंच पुन्हा होण्याची शक्यता सुद्धा जास्त असते. सर्व प्रकारच्या ब्रेस्ट कॅन्सरमध्ये हा सर्वाधिक घातक असतो.

इतर प्रकारच्या ब्रेस्ट कॅन्सर पीडित पेशींमध्ये तीन प्रकारचे रिसेप्टर असतात, ते यात आढळत नाहीत. त्यामुळे इतर प्रकारच्या ब्रेस्ट कॅन्सरवर प्रभावी ठरणारा उपचार टीएनबीसी हा कॅन्सर बरा करत नाही.

लेवेरीन यांना ट्रिपल नेगेटिव्ह ब्रेस्ट कँसर (टीएनबीसी) असल्याचे कळाले.

फोटो स्रोत, LAVERNE FAUNTLEROY

फोटो कॅप्शन, लेवेरीन यांना ट्रिपल नेगेटिव्ह ब्रेस्ट कँसर (टीएनबीसी) असल्याचे कळाले.

हा कॅन्सर 40 पेक्षा कमी वयाच्या महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. तसंच कृष्णवर्णीय महिलांमध्ये इतर महिलांच्या तुलनेत अधिक आढळतो.

जेएएमए ऑन्कोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार, टीएनबीसी पीडित कृष्णवर्णीय महिलांचे प्राण जाण्याचा धोका याच आजाराने पीडित इतर महिलांच्या तुलनेत 28 टक्के अधिक आहे.

आता एका नव्या संशोधनात टीएनबीसी आणि आफ्रिकन वंशाच्या लोकांमध्ये जेनेटिक संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.

ब्रेस्ट कॅन्सरची टेस्ट कशी करावी

•तुमच्यासाठी सामान्य काय आहे याची माहिती घ्या आणि महिन्यातून एकदा आपल्या स्तनांची तपासणी करा.

•आंघोळ करताना साबणाच्या हाताने स्तनांची तपासणी करणं सर्वात योग्य पद्धत आहे.

•आंघोळीपूर्वी आरशात व्यवस्थित पाहा. गाठ, त्वचेत कुठलाही बदल, निपलमध्ये काही बदल किंवा कुठल्याही प्रकारचा डिस्चार्ज होत आहे का हे तपासा.

•तरुण महिलांच्या स्तनात गाठ किंवा लंप असू शकतं. हे सामान्य आहे.

•मासिक पाळीनुसार स्तनांमध्येही बदल होऊ शकतो. पण एखादी गाठ मासिक पाळीनंतरही कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे.

•आपल्या कुटुंबाचा इतिहास जाणून घ्या. आपल्या कुटुंबात कोणाला स्तन कँसर किंवा ओव्हरी कॅन्सर झाला असल्यास आपल्यालाही तो होण्याची शक्यता अधिक असते.

ऑक्टोबर महिना ब्रेस्ट कॅन्सर जागरूकता महिना असतो.

विल कार्नेल मेडिसिनशी संबंधित डॉ. लीजा न्यूमेन अफ्रिकेत विविध क्षेत्रातील महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरवरील संशोधनाच्या एका आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचा भाग आहेत. गेल्या 20 वर्षांपासून हा प्रकल्प सुरू आहे.

डॉ. न्युमन

फोटो स्रोत, WEILL CORNELL MEDICINE

फोटो कॅप्शन, डॉ. न्युमन

संशोधनात हे समोर आलं आहे की, टीएनबीसी हा कॅन्सर घाना यांसारख्या पश्चिमी सब-सहारा अफ्रिकन देशांच्या महिलांमध्ये अधिकतर आढळतो.

त्या सांगतात की, याचं एक कारण हे असू शकतं की इथल्या महिलांच्या गुणसूत्रांमध्ये मलेरियासारख्या धोकादायक व्हायरसशी लढण्याचा परिणाम झाला असावा आणि पिढ्यांनुसार हे विकसित झालं असावं.

डॉ. न्यूमेन सांगतात, "विविध कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या महिलांमध्येही ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरबाबत आम्ही शोध घेतला. आमच्या लक्षात आलं की, काही जेनेटिक मार्कर जे वेगवेगळ्या संक्रामक एजंटच्या प्रतिकाराशी संबंधित आहेत ज्यांनी ब्रेस्टप्रमाणे विविध शारीरिक भागाच्या सूजेवर नकारात्मक प्रभाव पाडला आहे."

या आजाराला आणखी चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी हे संशोधन खूप गरजेचे आहे.

त्या सांगतात, "या संशोधनासाठी आम्ही उत्साही आहोत कारण यामुळे हे समजण्यास मदत होत आहे की, विविध वंशाच्या आणि प्रजातींच्या लोकांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरबाबत असमानता का दिसून येते. या संशोधनातून आम्हाला सर्वबाजूंनी ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरच्या जीव विज्ञानाची सखोल आणि अधिक व्यापक माहिती मिळत आहे."

यासाठी क्लिनिकल ट्रायलदरम्यान विविध पार्श्वभूमी असलेल्या महिलांनी सामील होणं अत्यंत गरजेचं आहे.

डॉ. न्यूमेन सांगतात, "दुर्देवाने कॅन्सरच्या क्लिनिकल ट्रायल दरम्यान अफ्रिकन अमेरिकन वंशाच्या महिलांची उपस्थिती इतरांच्या तुलनेत खूप कमी असते. त्यांचं प्रतिनिधित्व नसल्यास या उपचारांसाठी प्रगती कोणत्या दिशेने होत आहे आणि ती कशी लागू करायची आहे हे समजणार नाही."

डॉ. जॉर्जेट ओनी

फोटो स्रोत, DR GEORGETTE ONI

"याचं एक कारण हे सुद्धा आहे की आरोग्य सुविधांच्याबाबतीत विश्वास कमी आहे. आरोग्य सुविधा पोहचवण्याच्या क्षेत्रात दुजाभाव अजूनही दिसून आला आहे. हे दु:खद आहे की कॅन्सरच्या उपचारात महत्त्वाची भूमिका पूर्ण करू शकणाऱ्या कृष्णवर्णीय महिलांना इतर महिलांच्या तुलनेत कमी प्रमाणात क्लिनिकल ट्रायलमध्ये सहभागी करून घेतलं जातं."

सुधारणा

लेवेरीन सांगतात, कृष्णवर्णीय महिलांनी या क्लिनिकल संशोधनात भाग घेणं महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच त्या या प्रकल्पाचा भाग आहेत.

"मला वाटतं या देशात (अमेरिका) आमचा इतिहास आणि ज्या पद्धतीने आम्हाला वागणूक दिली जात आली आहे त्यामुळे कोणत्याही गोष्टी भाग घेण्यापूर्वी आम्हाला संकोच वाटतो. भविष्यातील पिढ्यांसाठी परिस्थिती सुधारावी यासाठी होणाऱ्या प्रयत्नांमध्ये मलाही सहभागी व्हायचे आहे." डॉ. म्हणाल्या.

"ते तुमची रक्त तपासणी करतात. तुमची सर्जरी झाल्यानंतर जे तुम्ही वापरत नाही, जे टिश्यू शिल्लक राहतात त्याचाही वापर संशोधनासाठी केला जातो,"

लेवेरीन यांची सर्जरी जुलै महिन्यात झाली. आता त्यांना कॅन्सरपासून मुक्ती मिळाली आहे.

त्या सांगतात, "गोष्टी व्यवस्थित सुरू आहेत. मी या संशोधनाचा भाग होते याचा मला अभिमान आहे. डॉ.न्यूमेन यांची मी मदत करू शकले याचाही मला अभिमान आहे."

इंग्लंडमध्ये कृष्णवर्णीय महिलांमध्ये इतर महिलांच्या तुलनेत अंतिम टप्प्यातील ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता दुप्पट असते.

एनएचएच रेस आणि हेल्थ ऑब्जरवेटरी कृष्णवर्णीय महिलांना या संशोधनाचा भाग होण्यासाठी आवाहन करत आहेत.

"कृष्णवर्णीय महिलांना क्लिनिकल ट्रायलमध्ये भाग घ्यावा यासाठी मी आग्रही असते. कारण तरच माहिती गोळा केली जाऊ शकते. यामुळेच माहिती मिळू शकते की उपचार आणि इतर गोष्टींचा तुमच्यावर काय परिणाम होत आहे. कारण हा आजार कृष्णवर्णीय महिलांमध्ये अधिक आढळतो. तुम्हाला योग्य माहिती हवी असल्यास तुमच्याकडे त्याची योग्य आकडेवारी असणं गरजेचं आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)