ब्रेस्ट कॅन्सर : त्रायदायक किमोथेरेपीपासून अनेकांची होणार सुटका

क्रन्सर

फोटो स्रोत, Getty Images

स्तनांच्या कर्करोगाच्या पहिल्या स्टेजमधल्या सत्तर टक्के स्त्रिया किमोथेरेपीच्या वेदनांपासून दूर राहू शकतात असं संशोधकांनी म्हटलं आहे.

या संशोधकांच्या नव्या अभ्यासानुसार तुमच्या जनुकांचा अभ्यास करून ट्युमरच्या शक्यतेचा अंदाज बांधता येतो.

अशा चाचण्यांमुळे उपचारांची पद्धतच बदलेल असं कॅन्सर स्पेशालिस्ट डॉक्टरांचं म्हणणं आहे. पहिल्या स्टेजमधला कॅन्सर असलेल्या स्त्रियांना हार्मोन थेरपी आणि शस्त्रक्रिया एवढेच उपचार पुरेसे ठरतील. त्यांच्यासाठी हे अधिक सुरक्षितही ठरेल.

ग्लोबोकॉन 2012 च्या अहवालानुसार भारतात तब्बल 1,45,000 महिला स्तनांच्या कर्करोगाला बळी ठरल्या आहेत. 'इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर' या संस्थेनं हा अहवाल प्रकाशित केला आहे.

मुंबई परिसरात 2012 मध्ये साधारण 13,383 स्तनांच्या कॅन्सरच्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यात 6597 पुरुष तर 6786 महिलांचा समावेश होता.

या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची बातमी येणं म्हणजे 'फारच छान गोष्ट' अशी प्रतिक्रिया काही सेवाभावी संस्थांनी दिली आहे.

शस्त्रक्रियेनंतर कर्करोग पसरू नये किंवा पुन्हा उद्भवू नये यासाठी किमोथेरेपी दिली जाते.

यामुळे तुमचा जीव वाचतो, पण किमोथेरेपीच्या औषधांचे दुष्परिणामही खूप आहेत. सतत होणाऱ्या उलट्या, थकवा, वंध्यत्व, मज्जातंतूच्या वेदना यामुळे किमोथेरेपी त्रासदायक ठरते.

क्वचित एखाद्या रुग्णाला किमोथेरेपीमुळे रक्ताचा कर्करोग होऊ शकतो किंवा हृदय बंदही पडू शकतं.

कर्करोग

फोटो स्रोत, Science Photo Library

जनुकांचा अभ्यास करणारी ही अनुवांशिकता चाचणी यूकेतल्या NHS सह सर्वत्र उपलब्ध आहे. 10273 महिलांच्या कॅन्सरचं विश्लेषण याद्वारे करण्यात आलं आहे. या चाचणीत कमी गुण मिळालेल्या महिलेला किमोथेरेपीची गरज नाही असं सांगण्यात येतं. मात्र जास्त गुणांक असतील तर किमोथेरेपीचा सल्ला आवर्जून दिला जातो.

पण बऱ्याच महिलांच्या चाचणीचे निकाल मध्यम स्वरूपाचे असतात, अशावेळी पुढे काय करायचं याबाबत अस्पष्टता आहे.

कॅन्सरवर उपचार करणारे डॉक्टर आणि संशोधकांच्या शिकागोमध्ये झालेल्या जगातल्या सर्वांत मोठ्या सभेत सादर केलेल्या अहवालानुसार मध्यम स्वरूपाचे निकाल आलेल्या महिला जगण्याचं प्रमाण किमोथेरेपी घेतली किंवा नाही घेतली तरी सारखंच आहे.

गेल्या नऊ वर्षांत, किमोथेरेपी न घेता यशस्वीपणे जगलेल्यांचा दर 93.9 टक्के तर किमो घेतलेल्यांचा दर 93.8 टक्के आहे.

मुलभूत बदल

न्यूयॉर्कमधल्या अल्बर्ट आईनस्टाईन कॅन्सर सेंटरच्या नेतृत्वाखाली चाललेला हा अभ्यास उल्लेखनीय आहे. कॅन्सर उपचारांमध्ये अशा प्रकारची प्रगती फार क्वचितच दिसते. हा एक यशस्वी शोध आहे कारण यामुळे पैसा वाचू शकतो आणि उपचाराची दिशा बदलू शकते.

लंडनमधील रॉयल मार्सडेन हॉस्पिटलचे सल्लागार डॉ. अलिस्टेर रिंग यांनी ट्युमरतज्ज्ञ याच्या निकालाची वाट पाहत होते, यामुळे आमची उपचारपद्धती नक्कीच बदलेल, असं सांगितलं.

फोटो स्रोत, Google

फोटो कॅप्शन, या अभ्यासामुळे आमची उपचारपद्धती नक्कीच बदलेल असं लंडनमधल्या द रॉयल मार्सडेन हॉस्पिटलच्या डॉ. अॅलिस्टर रिंग यांनी सांगितलं.

लंडनमधल्या द रॉयल मार्सडेन हॉस्पिटलचे सल्लागार डॉ. अॅलिस्टर रिंग यांनी बीबीसीला सांगितले की, "कॅन्सर स्पेशालिस्ट या अभ्यासाच्या निष्कर्षांची वाट पाहात होते. यामुळे आमची उपचार करायची पद्धत नक्कीच बदलेल."

या मुलभूत बदलामुळे पहिल्या टप्प्यातल्या स्तनांच्या कर्करोगाबद्दलचा दृष्टीकोन बदलणार आहे.

"ही खूप मोठी बातमी आहे," असं ते म्हणतात.

यामुळे दरवर्षी युकेमधल्या सुमारे तीन हजार स्त्रियांना आता किमोथेरेपी गरज भासणार नाही, असं त्यांना वाटतं.

अर्थात हा अभ्यास फक्त सुरुवातीच्या टप्प्यातल्या कॅन्सरपुरता मर्यादित आहे. असा कॅन्सर जो हॉर्मोन थेरेपीनं बरा करता येईल, जो लसिका ग्रंथीपर्यंत पसरलेला नाही आणि ज्यात कॅन्सर झपाट्यानं पसरू शकणाऱ्या HER2चं निदान झालेलं नाही.

अशा प्रकारच्या उपचारांसाठी शस्त्रक्रियेतून बाहेर काढलेल्या कॅन्सरची गाठ तपासून चाचणी करतात. कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या २१ जनुकांचा अभ्यास करून निष्कर्ष काढले जातात.

तुमच्या जनुकांचा अभ्यास करून ट्युमरच्या शक्यतेचा अंदाज बांधता येतो.

फोटो स्रोत, Science Photo Library

फोटो कॅप्शन, तुमच्या जनुकांचा अभ्यास करून ट्युमरच्या शक्यतेचा अंदाज बांधता येतो.

Breast Cancer Care या धर्मादाय संस्थेच्या रेचल रॉसन सांगतात, "स्तनांचा कर्करोग झालेल्या अनेक स्त्रिया उपचार घ्यायचे की नाही अशा गोंधळलेल्या मनस्थितीतून रोज जातात, उपचारांबद्दल नक्की माहिती उपलब्ध नसते. हे मानसिक दडपण भयानक असतं."

या संशोधनामुळे अनेकजणींना वेदनादायी किमोथेरेपीला सामोरं जावं लागणार नाही.

या संशोधनाचे निष्कर्ष American Society of Clinical Oncology समोर मांडण्यात आले आणि New England Journal of Medicine मध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

American Society of Clinical Oncology चे डॉ. हेरल्ड बर्नस्टन म्हणाले, यामुळे उपचार आमुलाग्र बदलतील आणि तेही चांगल्यासाठी!

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)