अजगराने अख्खंच गिळलं महिलेला, पोटात सापडला मृतदेह

अजगर भक्ष्याच्या शरीराभोवती स्वतःला गुंडाळून भक्ष्याला चिरडून टाकतात

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अजगर भक्ष्याच्या शरीराभोवती स्वतःला गुंडाळून भक्ष्याला चिरडून टाकतात
    • Author, फॅन वँग
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

इंडोनेशियाच्या जांबी प्रदेशात एका अजगराने महिलेला अख्खं गिळलं. तिचा मृतदेह या अजगराच्या पोटात सापडल्याच्या बातम्या स्थानिक माध्यमांनी दिल्या आहेत.

रबराचा चीक गोळा करणारी जेराह नावाची ही पन्नाशीची महिला रविवारी, 23 ऑक्टोबरला सकाळी रबराच्या बागेत गेली होती. मात्र ती परत आलीच नाही.

ती हरवली असल्याचं रविवारी संध्याकाळी कळलं, आणि तिच्या शोधासाठी लोक पाठवले गेले. पण त्या दिवशी ती सापडली नाही. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना एक भलामोठा अजगर दिसला, ज्याचं पोट फुगलं होतं आणि तो सुस्तावून पडला होता.

स्थानिकांनी या अजगराला मारून टाकलं आणि त्याच्या पोटात या महिलेचा मृतदेह आढळला.

जांबीचे पोलीस अधिकारी एकेपी हरेखा यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना म्हटलं की "महिलेचा मृतदेह अजगराच्या पोटात सापडला. तिचं शरीर जवळपास जसंच्या तसं होतं."

या महिलेच्या नवऱ्याला रविवारी संध्याकाळी तिचे कपडे आणि ती वापरत हत्यारं रबराच्या बागेजवळ सापडली होती. म्हणूनच त्याने तिला शोधण्यासाठी गावकऱ्यांची मदत घेतली.

हा अजगर जवळपास 16 फूट लांब होता.

सीएनएन इंडोनेशियाशी बोलताना एकेपी हरेखा यांनी म्हटलं की, "त्या अजगरला मारून त्याचं पोट फाडण्यात आलं तेव्हा आत जेराहचा मृतदेह सापडला."

अशा प्रकारच्या घटना दुर्मिळ असल्या तरी इंडोनेशियात अख्खा माणूस अजगराने गिळायची ही पहिलीच वेळ नाहीये. 2017 आणि 2018m मध्ये अशाच प्रकरच्या घटना घडल्या होत्या.

अजगर त्यांचं अन्न अख्खंच्या अख्खं गिळतात. त्यांच्या जबड्यात खूप लवचिक स्नायू असतात त्यामुळे ते मोठी शिकारही सहज गिळू शकतात.

याआधी बीबीसीशी बोलताना सिंगापूर वाईल्डलाईफ रिझर्व्हच्या मेरी-रूथ लो यांनी म्हटलं होतं की अजगर सहसा उंदीर आणि इतर प्राणी खातात. "पण एकदा त्यांचा आकार वाढला की मग ते उंदीरबिंदर खायच्या भानगडीत पडत नाहीत. कारण त्याने त्यांचं पोट भरत नाही."

"त्यांच्या भक्ष्याचा जेवढा आकार असेल तेवढं त्यांचं पोट फुगू शकतं. ते भलंमोठं डुक्कर किंवा मोठी गायही सहजपणे गिळू शकतात आणि त्याच्या पोटाचा आकार तेवढा होतो."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)