You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
OnlyFans वर नग्न व्हीडिओ टाकून पैसै कमवायला गेला आणि...
सिंगापूर मध्ये Onlyfans या प्रौढांसाठी असलेल्या वेब पोर्टलच्या कंटेट क्रिएटरला अटक कण्यात आली आहे. तसंच दंडही ठोठावण्यात आला आहे.
टिटस लो याला 12 ऑक्टोबरला शिक्षा आणि 3 हजार कोटी डॉलर्सचा दंड सुनावण्यात आला आहे. वेबसाईटवर अश्लील फोटो आणि व्हीडिओ शेअर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
पोलिसांनी आदेश देऊन सुद्धा अकाऊंट अक्सेस केल्याबद्दल त्याला आणखी तीन आठवडे तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे.
यामुळे OnlyFans च्या संस्थापकांमध्ये कारवाईच्या भीतीने खळबळ उडाली आहे.
सिंगापूरमध्ये असा मजकूर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित करणं किंवा त्यातून नफा कमावणे बेकायदेशीर आहे.
"OnlyFans वर असलेल्या लोकांनासुद्धा आता धोका आहे असं या खटल्यातून प्रतित होतं." असं लो चे वकील किरपाल सिंग यांनी बीबीसीला सांगितलं. .
"मला असं वाटतं की OnlyFans किंवा तत्सम प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारचं अश्लील मजकूर टाकणाऱ्या लोकांना शिक्षा दिली जाईल असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे."
अशा प्रकारचा मजकूर तयार करणाऱ्या इतर लोकांनी सुद्धा सिंग यांच्याशी संपर्क साधल्याचं सांगितलं. कारण त्यांनाही अशा प्रकारच्या शिक्षेची भीती वाटत आहे.
मात्र कोणी तक्रार केल्यासच लोकांना शिक्षा होते, असं तज्ज्ञांनी सूचित केलं होतं.
बीबीसीने अमेरिकेतल्या अशा एका कंपनीशी संपर्क साधला ज्या कंपनीच्या माध्यमातून अश्लील मजकूर सबस्क्राईब करू शकतो.
लो यांना डिसेंबर 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. एका बाईच्या 12 वर्षांच्या भाचीच्या फोनवर अश्लील व्हीडिओ सापडले. त्यानंतर या बाईने पोलिसांत तक्रार केली होती.
22 वर्षीय लो त्याच्या काही महिन्याआधी म्हणजे एप्रिलमध्ये या प्लॅटफॉर्मवर आले होते. अगदी अल्पावधीत ते स्थानिक पातळीवर लोकप्रिय झाले होते.
तक्रार दाखल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांचा फोन, आयपॅड आणि OnlyFans च्या अकाऊंटची माहिती बदलली होती. मात्र लो यांनी ती माहिती परत मिळवली होती आणि दुसरं अकाऊंट उघडून त्यावर कंटेट टाकायला सुरुवात केली होती.
मागच्या वर्षी त्यांनी बीबीसीला सांगितलं की त्यांनी साईटचा वापर सुरुवात करायला सुरुवात केली कारण तो त्यांच्या उत्त्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे.
लो यांना अश्लील फोटो टाकल्याबद्दल तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली आणि पोलिसांची सूचना अव्हेरल्याबद्दल सहा महिन्यापर्यंत शिक्षा सुनावण्यात आली आहे.
आता त्यांना पुन्हा शिक्षा सुनावल्यावर त्यांनी ट्विटरवर लिहिलं की, "चला हे संपलं."
लो यांचे सोशल मीडियावर 2,10,000 फॉलोअर्स आहेत. ते सिंगापूरमध्ये इन्फ्लुएन्सर आहे आणि या खटल्याची मोठी चर्चा झाली होती.
OnlyFans चे सिंगापूरमध्ये किती फॉलोअर्स आहेत याचा निश्चित आकडा माहिती नाही तरी शेकड्यांनी असावेत असा अंदाज आहे.
सिंग म्हणाले की दक्षिण आशिया भागात म्यानमारमध्ये अशा प्रकारची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यावेळी OnlyFans वर फोटो टाकला म्हणून सैन्याने एका निदर्शकाला अटक केली होती.
"पण ते वेगळं आहे. कारण त्यामागे राजकीय षड्यंत्र होतं," असं सिंग म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)