डोनाल्ड ट्रंप यांना करायचा होता मेक्सिकोत ड्रग्स तयार होणाऱ्या जागेवर स्फोट...

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी त्यांच्या मुलीला एकदा बाहेरचा रस्ता दाखवला होता. ते कागदपत्रं टॉयलेट मध्ये फ्लश करत असत.
न्यूयॉर्क टाईम्स चे पत्रकार मॅगी हॅबरमॅन यांचं डोनाल्ड ट्रंप यांच्यावर आधारित 'कॉन्फिडन्स मॅन' हे पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालं आहे.
या पुस्तकात डोनाल्ड ट्रंप यांच्या प्रवासाचे अनेक टप्पे आणि काही रंजक गोष्टी समोर आल्या आहेत.
अमेरिकेच्या या माजी राष्ट्राध्यक्षांशी संबधित असलेल्या जवळपास 200 लोकांशी चर्चा करून हे पुस्तक लिहिण्यात आलं आहे. त्याशिवाय लेखकाने ट्रंप यांच्या तीन मुलाखती घेतल्या आहेत.
मात्र ट्रंप यांनी पुस्तकातल्या बहुतांश गोष्टी चुकीच्या असल्याचं सांगत हॅबरमन यांच्यावर टीका केली आहे.
1.इवांका आणि जेरड कुशनर यांना ट्रंप हटवणार होते
हॅबरमन त्यांच्या पुस्तकात लिहितात की ट्रंप त्यांच्या मुलीची आणि जावयाची हकालपट्टी करणार होते. असं ट्वीट ते करणारच होते तितक्यात चीफ ऑफ स्टाफ जॉन केली यांनी त्यांना ही कृती करण्यापासून परावृत्त केलं.
त्यांना हाकलण्याआधी एकदा त्यांच्याशी चर्चा करावी असा सल्ला त्यांनी दिलाय मात्र ट्रंप यांनी तसं केलं नाही. ते दोघंही शेवटपर्यंत व्हाईट हाऊस मध्ये होते.
कुशनर यांचं भाषण ऐकल्यावर तो लहान मुलासारखं बोलतो अशी टिप्पणी ट्रंप यांनी केल्याचा उल्लेख या पुस्तकात आहे.
मात्र ट्रंप यांनी या दाव्याचा इन्कार केला आहे. माझ्या मनातही कधी असा विचार आला नसल्याचं ते म्हणाले.
2. मॅक्सिकोत ड्रग्स तयार होणाऱ्या जागेवर बॉम्ब स्फोट करणार होते
मेक्सिकोत ज्या ठिकाणी ड्रग्सचं उत्पादन होतं त्या ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याचा ट्रंप यांचा विचार होता. अनेकदा त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.
ट्रंप यांची ही मनिषा ऐकून अमेरिकेचे माजी संरक्षण सचिव मार्क एस्पर स्तब्ध झाले होते. एका चर्चेतून हा बॉम्बस्फोटाचा विचार समोर आला होता. ही चर्चा ट्रंप आणि सार्वजनिक आरोग्य अधिकारी ब्रेट गिरोईर यांच्यात झाली होती.
3. कोव्हिडमुळे मरण्याची त्यांना भीती वाटायची
डोनाल्ड ट्रंप यांना 2020 मध्ये कोव्हिड झाला होता. त्यांची तब्येत ढासळत चालली होती. त्यावेळी त्यांनी मृत्यूची भीती वाटत होती.
एक वेळ तर अशी आली होती की डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ टोनी ओरनाटो यांनी ट्रंप यांना इशारा दिला होता की त्यांची तब्येत अशीच बिघडत राहिली तर त्यांना काही पर्यायी मार्ग शोधावे लागतील.

फोटो स्रोत, Getty Images
ट्रंप कोव्हिडच्या साथीला फारसं मनावर घ्यायचे नाहीत. त्यांना भीती मात्र फार वाटायची. कारण कोव्हिडमुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागल्याची त्यांना चिंता होती.
हॅबरमन लिहितात की त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना मास्क काढायला सांगितला होता. तसंच न्यूयॉर्क चे तत्कालीन गव्हर्नर अँड्र्यु क्युमो यांना टीव्हीवर कोरोना बद्दल काहीही न बोलण्यास सांगितलं होतं.
4. युकेच्या पंतप्रधानांसमोर केला होता मालमत्तेचा उल्लेख
थेरेसा मे यांच्याबरोबर झालेल्या पहिल्या भेटीत ट्रंप यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.
गर्भपातावर बोलताना ट्रंप म्हणाले होते, "गर्भपाताच्या ठाम विरोधात असतात तर काही महिलांना गर्भपात करता येणं, त्याबद्दल निर्णय घेणं हा त्यांचा हक्क आहे अशा मताचे असतात. कल्पना करा की टॅटू असलेल्या एखाद्या व्यक्तीने तुमच्या मुलीचा बलात्कार केला आणि ती प्रेग्नंट झाली तर?"
त्यानंतर ट्रंप यांनी विषय बदलला आणि ते उत्तर आयर्लंडची चर्चा करायला लागले की कसं एका ऑफशोर विंड प्रोजेक्ट त्यांच्या मालमत्तेपासून दूर नेता येऊ शकतो.
5. 2020 ची निवडणूक उलथवून टाकण्याचा प्रयत्न
डोनाल्ड ट्रंप यांना जेव्हा दिसलं की, ते 2020 च्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाचय् निवडणुकीत पराभूत होत आहेत तेव्हा त्यांनी त्यांचे खाजगी वकील आणि न्यूयॉर्कचे माजी महापौर रूडी ज्युलियानी यांना फोन केला.
या पुस्तकात असाही उल्लेख आहे की ट्रंप ज्युलियानी यांना फोनवर म्हणाले, "ओके रूडी, आता सगळी सूत्रं तुझ्याकडे. गो वाईल्ड. काय वाट्टेल ते कर, मला फरक पडत नाही."
ट्रंप यांना जे हवं होतं ते त्यांचे इतर वकील करायला तयार नव्हते म्हणून त्यांनी रूडी यांना फोन केला.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी अनेकदा म्हटलं होतं की त्यांचे इतर सहकारी वकील 'अतिशय वाईट' आहेत. व्हाईट हाऊसचे वकील पॅट सिपोलोन यांच्याशी ते नेहमीच फटकून वागायचे.
6. टॅक्स रिटर्नवर स्पष्टीकरण देण्यास नकार
2016 च्या निवडणूक प्रचारादरम्यान ट्रम्प यांचे कॅम्पेन मॅनेजर लेवांडोव्स्की आणि प्रेस सेक्रेटरी होप हिक्स यांनी ट्रंप यांना सल्ला देताना म्हटलं होतं की, त्यांनी टॅक्स रिटर्नविषयी बोलायला हवं नाहीतर निवडणुकीदरम्यान हा मुद्दा त्यांच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतो.
हॅबरमन त्यांच्या पुस्तकात लिहितात की, फ्लाइटमध्ये बसल्यावर ट्रंप यांना सुचलं की, टॅक्स रिटर्नचं ऑडिट सुरू आहे असं सांगता येऊ शकतं.
ट्रंप म्हणाले की, "जर माझं ऑडिट झालं नाही तर मी माझे टॅक्स रिटर्न सार्वजनिक करीन. पण ऑडिट होणार नाही असं शक्यच नाही."
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनपासून नंतर आलेल्या प्रत्येक राष्ट्राध्यक्षांनी त्यांनी रिटर्न जनतेसमोर जाहीर केले आहेत. 2020च्या न्यूयॉर्क टाईम्सच्या एका रिपोर्ट मध्ये सांगितल्याप्रमाणे, ट्रंप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून त्यांनी फक्त 750 डॉलर इतका टॅक्स भरला होता."
7. महत्वाची कागदपत्रं व्हाईट हाऊसच्या टॉयलेटमध्ये फ्लश केली
व्हाईट हाऊसमधलं एक टॉयलेट चोकअप झालं होतं. जेव्हा त्याची दुरुस्ती करण्यात आली तेव्हा कागदपत्रांमुळे ते चोकअप झाल्याचं तिथल्या कर्मचाऱ्यांना आढळून आलं.
ट्रंप यांनी ही कागदपत्रे फाडून राष्ट्राध्यक्ष रेकॉर्ड कायद्याचं उल्लंघन केलं आहे असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. या कायद्यानुसार, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी तयार केलेली कागदपत्रं किंवा त्यांना मिळालेली कागदपत्रं ही अमेरिकन सरकारची मालमत्ता असते.
यूएस नॅशनल आर्काइव्हजने देखील काही कागदपत्रे गहाळ असल्याचं सांगितलं होतं. तसेच अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यावर ट्रंप यांनी काही सरकारी कागदपत्रे आपल्या फ्लोरिडातील घरी ठेवल्याचे आरोप करण्यात आले. याची चौकशीही सुरू आहे.
8. कर्मचाऱ्यांना समजले वेटर
अध्यक्ष झाल्यानंतर डेमोक्रॅटिक नेत्यांसोबत एक बैठक पार पडली होती. या बैठकीत डेमोक्रॅटिक नेत्यांचा स्टाफही सोबत होता. ट्रंप यांना तो स्टाफ वेटर आहे असं वाटलं.
पुस्तकात सांगितल्याप्रमाणे, सिनेटर चक शूमर आणि यूएस काँग्रेसच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी यांचा तो स्टाफ होता.हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








