You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बालमोरल कॅसलः स्कॉटलंडमधील महाल ज्यावर महाराणी एलिझाबेथ यांचं प्रेम होतं...
बालमोरलच्या शाही निवासस्थानावर महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे किती प्रेम होते हे सर्वश्रुतच आहे.
50 हजार एकरांच्या परिसरात असलेल्या याच किल्ल्यात महाराणींनी आपले यजमान फिलिप आणि कुटुंबासमवेत बहुतेक उन्हाळे घालवले होते.
रम्य अशा या परिसरातील किल्ल्यात महाराणी एलिझाबेथ यांनी अनेक सुट्ट्यांचा काळ आनंदाने घालवला. अगदी तिचे आजोबा जॉर्ज पाचवे, महाराणी मेरी यांच्यासोबतही आणि जीवनाच्या अगदी शेवटच्या काळातही त्या इथेच होत्या.
त्यांनी इथे अनेक गार्डन पार्टींचे आयोजन केले तसेच बाएमर हायलँड गेम्सचा शाही कुटुंबासह आनंद घेतला.
प्रिन्स फिलिप यांच्या आयुष्यातील शेवटच्या वर्षातील बराच काळ त्या इथे होत्या. लॉकडाऊनचा काळ त्यांनी इथेच व्यतित केला तसेच त्या दोघांनी विवाहाचा 73 वा वाढदिवस नोव्हेंबर 2020मध्ये इथेच साजरा केला होता.
बालमोरल हे ब्रिटिश शाही कुटुंबाचं 1852 पासूनचं एक निवासस्थान आहे.
महाराणी व्हिक्टोरिया यांचे यजमान प्रिन्स अल्बर्ट यांनी फार्कसन कुटुंबाकडून इथला मूळ किल्ला विकत घेतला होता. त्यानंतर ते निवासस्थान अपुरं पडू लागल्यावर आजच्या बालमोरल किल्ल्याचं काम करण्यात आलं.
हा किल्ला स्कॉटिश बॅरोनियल स्थापत्याचा एक नमुना असून त्याला ऐतिहासिक महत्व आहे. तो 'कॅटेगरी ए' यादीत ठेवण्यात आला आहे. नवा किल्ला 1856 साली पूर्ण झाला आणि जुना किल्ला काही काळातच पाडण्यात आला.
हा परिसर राणीच्या स्वतःच्या खासगी मालमत्तेत येतो, तो शाही मालमत्तेचा भाग नाही.
या परिसरामध्ये शेती, हरणांचे कळप, पाळीव जनावरं तसेच घोडे पाळलेले आहेत.
31 ऑगस्ट 1997 रोजी प्रिन्सेस डायना यांचा मृत्यू झाला तेव्हा शाही कुटुंब इथंच होतं.
डायना यांच्या मृत्यूनंतर प्रिन्स चार्ल्स, विल्यम, हॅरी, महाराणी यांनी इथल्या क्रॅथी कर्कमधील चर्चमध्ये रविवारी प्रार्थनेला हजेरी लावली होती.
त्यांच्या परतीच्या वाटेत लोकांनी शोकसंदेश आणि पुष्पगुच्छ ठेवण्यात आले होते.
महाराणी, शाही कुटुंबाचे या किल्ल्याशी असणारे संबंध या फोटोंमधून पाहू -
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)