कोरोनाः तुम्हाला अजूनही कोव्हिड झाला नसेल तर 'ही' आहेत त्याची 5 कारणं

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, EPA

तुमच्या आसपास, नातेवाईकांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये एखादी व्यक्ती तरी असेलच जिला आजवर कोरोना व्हायरसचं संक्रमण झालं नाही.

तुम्हाला कदाचित वाटू शकतं की एकतर त्यांच्यात सुपरपावर आहे किंवा त्यांनी व्यवस्थित रितीने कोव्हिड टेस्टच केलेली नाही.

पण एक शक्यता अशीही आहे की ते फारच नशीबवान आहेत किंवा त्यामागे काहीतरी वैज्ञानिक कारण आहे.

आम्ही तुम्हाला सांगतोय ती 5 कारण ज्यामुळे लोकांना कोव्हिड-19 चं संक्रमण आजवर झालेलं नाही.

1. योगायोग

हे लोक कधीच कोव्हिड संक्रमित लोकांच्या संपर्कात आले नाहीत. ते कधी सुपर स्प्रेडर ठरणाऱ्या समारंभांना गेले नाहीत, अशा ट्रेनच्या डब्यात बसले ज्यात कधीच कोणता कोव्हिड पेशंट नव्हता.

ऑफिसमधल्या कोणत्या मीटिंगला गेले असतील तर कोव्हिड संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात यायच्या आधीच त्या मीटिंगमधून बाहेर पडले.

ही गोष्ट आश्चर्यकारक वाटू शकते, पण जगात काही लोक असे आहेत जे फक्त आणि फक्त योगायोगाने कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचलेत.

2. लोकसंख्या

व्हायरस एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला संक्रमित करतो. त्यामुळे लोकसंख्या हेही एक कारण असू शकतं ज्यामुळे काही लोक कोव्हिडपासून वाचू शकले.

सोप्या शब्दात सांगायचं झालं तर व्हायरसला पसरण्यासाठी कॅरियरची गरज असते. पण जर त्या व्यक्तीच्या शरीरातून व्हायरस निघाला आणि दुसऱ्या शरीरात जाऊ शकला नाही तर तो मरून जातो.

कोरोना व्हायरस लक्षणं

कोव्हिड-19 च्या लाटेच्या काळात या व्हायरसने अनेक लोकांना संक्रमित केलं.

तो व्हायरस तुमच्यापर्यंत पोहचण्याच्या आधी अनेक लोक वाईट पद्धतीने आजारी पडले, पण जेव्हा त्यांच्यावर उपचार झाले तेव्हा तो व्हायरस मेला आणि तुमच्यापर्यंत पोचला नाही त्यामुळे तुम्हाला कोव्हिड झाला नाही.

हा योगायोग जरी असला तरी यामागे विज्ञान आहे.

3.लसीकरण

लसीकरणामुळे तुमच्या शरीरात अँटीबॉडी निर्माण होतात. जेव्हा व्हायरस तुमच्या शरीरात घुसण्याचा प्रयत्न करतो तेव्हा शरीर त्या व्हायरसवर हल्ला करतं.

या अँटीबॉडीमुळे शरीरात संक्रमण पसरू शकत नाही.

कोरोना व्हायरस ताप कसा मोजायचा

पण संक्रमण रोखण्याची लशीची क्षमता काळाबरोबर कमी कमी होत जाते. म्हणजेच संपूर्ण महामारीच्या काळात एकदा घेतलेली लस तुमचं संरक्षण करण्यासाठी पुरेशी नाहीये.

तसंच व्हायरसचा नवा व्हेरिएंट आला तरीही या लशीचा उपयोग होणार नाही. पण काही लोकांच्या शरीरात लशीने इतक्या चांगल्या प्रकारे काम केलं की त्यांना एकदाही संक्रमण झालं नाही.

4. जन्मजात चांगली असलेली रोगप्रतिकारक शक्ती

कधी कधी काही लोकांच्या शरीरात जन्मजातच चांगली रोगप्रतिकारक शक्ती असते. तुमचं शरीर व्हायरसची संख्या वाढण्याच्या आतच त्यांना नष्ट करू शकतो.

कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

अशा लोकांनी लस घेतली नसेल आणि तरीही ते संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आले तरीही त्यांना व्हायरसची लागण होत नाही.

पण प्रत्येक व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वेगवेगळी असते, याबदद्ल वैज्ञानिकांकडे अजून ठोस माहिती नाहीये.

5. तुम्हाला होऊन गेला पण कळलंच नाही

तुम्हाला कोव्हिड अजूनही का झाला नाही याचं पाचवं कारण असं असू शकतं की तुम्हाला होऊन गेला पण कळलंच नाही.

लक्षणं

तुम्हाला या व्हायरसचं संक्रमण झालं पण तुम्हाला कोणतीही लक्षणं दिसली नाही किंवा तुम्ही त्याची कोणती टेस्टही केली नाही.

याचीच शक्यता सर्वाधिक आहे आणि तुम्हाला कळणारही नाही की तुम्हाला कधी कोव्हिड झाला होता.

आणि तुम्ही स्वतःची टेस्ट केली नसल्याने तुम्ही स्वतः एक स्प्रेडर बनले असाल.

अर्थात तुम्हाला अजूनही कोव्हिड झाला नसेल तर तुम्ही फारच नशीबवान आहात.

पण या व्हायरसचे नवे व्हेरिएंट तुमच्या शरीरात मागे झालेलं संक्रमण किंवा लशीमुळे ज्या अँटीबॉडी निर्माण झाल्या आहेत त्यांना भेदण्यासाठी सक्षम असू शकतात.

कोरोना खबरदारी

शास्त्रज्ञांना वाटतं की कोव्हिड आपल्या सगळ्यांना कधी ना कधी संक्रमित करेलच भले मग त्यामुळे आपण गंभीररित्या आजारी पडणार नाही.

महत्त्वाची बाब अशी की आता यामुळे घाबरून जायचं कारण नाही.

तुम्हाला कोरोना व्हायरसच्या संक्रमणाबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तर ती माहिती भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण वेबसाईटवर दिलेली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, आणि वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)