अयमान अल्-जवाहिरी : अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ओसामा बिन लादेनचा गुरू ठार

अयमान अल- जवाहिरी

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, अयमान अल- जवाहिरी

अमेरिकेने अल्- कायदाचा नेता अयमान अल्-जवाहिरीला अफगाणिस्तानमध्ये एका ड्रोन हल्ल्यात ठार केलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

रविवारी (31 जुलै) अमेरिकेची केंद्रीय गुप्तचर यंत्रणा सीआयएने अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये दहशतवादविरोधी मोहीम राबवली होती. याच मोहिमेमध्ये जवाहिरीचा मृत्यू झाला आहे.

"अमेरिकन नागरिकांच्या रक्ताने जवाहिरीचे हात रंगले होते. आता लोकांना न्याय मिळाला आहे. हा कट्टरतावादी आता जगात राहिला नाहीये," असं बायडन यांनी म्हटलं आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जवाहिरी एका सुरक्षित घराच्या बाल्कनीमध्ये उभा होता, तेव्हाच ड्रोनच्या सहाय्याने दोन क्षेपणास्त्रं डागण्यात आली.

जवाहिरीच्या कुटुंबातील लोकही त्यावेळी घरात उपस्थित होते. मात्र, कोणालाही इजा पोहोचली नसल्याचंही अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

बायडन यांनी म्हटलं आहे की, त्यांनी अल्-कायदाच्या या 71 वर्षीय नेत्याविरोधात निर्णायक हल्ल्याला मंजुरी दिली होती. 2011 मध्ये ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अल्-कायदाचा नेतृत्व जवाहिरीकडेच होतं.

अमेरिकेवर 9/11ला झालेल्या हल्ल्याची योजनाही लादेन आणि जवाहिरी यांनीच आखली होती. जवाहिरीला अमेरिका 'मोस्ट वॉन्टेड दहशतवादी' मानत होती.

बायडन यांनी म्हटलं की, जवाहिरीच्या मृत्यूने 2001मध्ये 9/11ला झालेल्या हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

तालिबानने अमेरिकेची ही मोहीम आंतरराष्ट्रीय नियमांचं आणि सिद्धांताचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे.

जवाहिरी आय सर्जन होता. इजिप्तमध्ये इस्लामिक जिहादी ग्रुप बनविण्यासाठी जवाहिरीने मदत केली होती.

अमेरिकेने मे 2011मध्ये ओसामा बिन लादेनला ठार केलं होतं आणि त्यानंतर अल् कायदाची धुरा अल् जवाहिरीकडे आली.

अयमान अल्-जवाहिरी अल्-कायदाचा मेंदू समजला जात होता. इजिप्तमध्ये डॉक्टर असलेल्या जवाहिरीला इस्लामिक कट्टरतावादामध्ये सहभागी झाल्याच्या कारणावरून तुरुंगातही राहावं लागलं होतं.

ओसामा बिन लादेन आणि अयमान अल- जवाहिरी

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, ओसामा बिन लादेन आणि अयमान अल- जवाहिरी

तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्याने इजिप्त सोडला आणि आंतरराष्ट्रीय जिहादी मोहिमांमध्ये सहभागी झाले. शेवटी तो अफगाणिस्तानला गेला आणि सौदी अरबमधील एक जिहादी अमीर ओसामा बिन-लादेनसोबत काम करू लागला.

अल्-जवाहिरी आणि ओसामाने मिळून अमेरिकेविरोधात युद्ध पुकारलं आणि 2001मध्ये 11 सप्टेंबरला वर्ल्ड ट्रेड सेंटरवरचा हल्ला घडवून आणला.

या हल्ल्यानंतर तब्बल एका दशकानंतर ओसामाला मारण्यात अमेरिकेला यश मिळालं.

ओसामानंतर अल्-कायदाची सूत्रं पूर्णपणे अल्-जवाहिरीकडे आली. पण ओसामाच्या मृत्यूनंतर त्याच्याकडे फारकाही शिल्लक उरलं नाही. केवळ मधूनअधून काही निवेदनं प्रसिद्ध करण्याचं काम उरलं होतं.

अल-कायदा

अल-कायदा संघटना 1980च्या दशकामध्ये अफगाणिस्तानात उदयाला आली.

सोव्हिएट फौजांना देशाबाहेर काढण्यासाठी अफगाण मुजाहिदीनांना अरबांची साथ मिळाल्यानंतर ही संघटना स्थापन झाली. त्यांना मदत करण्यासाठी ओसामानं ही संघटना स्थापन केली.

1989मध्ये त्यानं अफगाणिस्तान सोडलं आणि हजारो परदेशी मुस्लिमांना लष्करी प्रशिक्षण देण्यासाठी तो 1996 साली परतला. अमेरिका, ज्यू धर्मिय आणि त्यांचे सहकारी यांच्याविरोधात 'पवित्र युद्ध' करण्याची घोषणा अल-कायदा केली होती.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)