बिल गेट्स : 'मला जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून बाहेर पडायचंय'

बिल गेट्स

फोटो स्रोत, Getty Images

जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी बिल गेट्स यांनी त्यांची अब्जावधींची संपत्ती दान करून श्रीमंत लोकांच्या यादीतून बाहेर पडणार असल्याची घोषणा केली आहे.

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक असलेले बिल गेट्स यांनी आपली 20,000 कोटी डॉलरची संपत्ती जनकल्याण फंडसाठी देणार असल्याचं म्हटलंय.

जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चौथ्या क्रमांकावर असलेले बिल गेट्स म्हणतात, "माझी संपत्ती समाजाला पुन्हा देणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे."

2010 मध्ये गेट्स यांनी पहिल्यांदा आपली संपत्ती दान करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आजअखेर त्यांच्या संपत्तीमध्ये दुपटीने वाढ झाल्याचं दिसलं.

फोर्ब्स मॅगझिननुसार सध्या त्यांची एकूण संपत्ती 11,800 कोटी डॉलर एवढी आहे. पण बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनला जुलैमध्ये देणगी दिल्यानंतर या संपत्तीत घट झाली.

बिल अँड मेलिंडा गेटस् फाऊंडेशन ही संस्था 2000 साली स्थापन करण्यात आली होती.

बिल गेट्स ट्विटरवर लिहितात, "कोव्हिड, रशिया-युक्रेन युद्ध आणि बदलते हवामान अशा जागतिक संकटांमुळे बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन 2026 पर्यंत 6 अब्ज डॉलर्सवरून 9 अब्ज डॉलर एवढा खर्च करेल."

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स पुढे लिहितात, "मी भविष्याकडे पाहत असताना, माझी सर्व संपत्ती फाउंडेशनला देण्याची माझी योजना आहे. शेवटी मी जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीतून बाहेर पडेन."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

"माझी संसाधने समाजाला अशाप्रकारे परत करणे माझी नैतिक जबाबदारी आहे. मोठ्या आव्हानांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली याचाही मला आनंद आहे. लोकांचे दु:ख कमी करण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल. आणि मला आशा आहे की विशेषाधिकाराच्या पदांवर असलेले इतर लोकही या चळवळीत सहभागी होतील."

गेट्स फाउंडेशन आरोग्य, शिक्षण आणि हवामान बदल यांसारख्या मुद्द्यांवर काम करते.

2020 मध्ये गेट्स चॅरिटेबल ट्रस्ट हे जगातील दुसरं मोठं फाऊंडेशन होतं. त्यांची एकूण संपत्ती 4980 कोटींच्या घरात होती. आणि अब्जाधीश गुंतवणूकदार वॉरेन बफेटसारख्या इतर धनाढ्यांचा ही या फाऊंडेशनला आर्थिक पाठिंबा होता.

फाउंडेशन काम जरी चांगलं करत असलं तरी खाजगी प्रयत्नांच्या नैतिकतेबद्दल अनेकांनी चिंता व्यक्त केली होती.

बिल गेट्स

फोटो स्रोत, Getty Images

हे फाऊंडेशन जागतिक आरोग्य संघटनेचा सर्वात मोठा देणगीदार आहे. 2018 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेला देणगी देणाऱ्यांमध्ये अमेरिकेनंतर फाऊंडेशन दुसऱ्या क्रमांकावर होतं. यावेळी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखू असा इशारा दिल्यानंतर याबद्दलची चिंता अधिक स्पष्ट झाली.

फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत बिल गेट्स यांनी दोनदा आपलं स्थान निर्माण केलंय.

1995 ते 2010 आणि पुन्हा 2013 ते 2017 या कालावधीत ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते.

2017 साली मात्र बिल गेट्स यांची जागा घेत अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर आले.

त्यानंतर 2022 मध्ये टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क या जेफ बेझोस यांची जागा घेतली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)