बिल गेट्स - मेलिंडा गेट्स घटस्फोट घेणार, दिलं हे कारण..

फोटो स्रोत, Getty Images
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
लग्नानंतर 27 वर्षांनी त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे.
"जोडपं म्हणून आम्ही यापुढे आयुष्य व्यतीत करू शकत नाही," असं या दांपत्याने संयुक्त निवेदनात म्हटलं आहे.
खूप विचार करून आणि नात्याबाबत बोलल्यानंतर आम्ही घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
गेल्या 27 वर्षांत तीन मुलांचं संगोपन करत त्यांना वाढवलं. सामाजिक कार्यासाठी संस्था उभारली. जगभरातल्या लोकांचं आयुष्यमान सुधारावं यासाठी ही संस्था काम करते.
फाउंडेशनचे काम एकत्र सुरू ठेवणार
घटस्फोट होणार असला तरी सामाजिक कार्यासाठी ते एकत्र असतील असं या दोघांनी म्हटलं आहे.
हे काम सुरूच राहील, फाऊंडेशनसाठी आम्ही एकत्रित काम करत राहू. मात्र वैयक्तिक आयुष्यात पती-पत्नी म्हणून यापुढे आम्ही एकत्र वाटचाल करू शकत नाही असं या दोघांनी म्हटलं आहे.
आम्ही आयुष्याच्या नव्या टप्प्यावर आहोत. आम्हाला असं वाटतं, आमच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर करण्यात यावा.

फोटो स्रोत, Getty Images
1980च्या दशकात बिल आणि मेलिंडा यांची ओळख झाली. मेलिंडा यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये काम करायला सुरुवात केली होती.
तीन मुलांचे पालक असलेले बिल आणि मेलिंडा हे दोघं मिळून बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन नावाची संस्था चालवतात.
सामाजिक कार्य
साथीच्या आजारांनी त्रस्त मुलांच्या आरोग्यावर, लसीकरणासाठी या संस्थेने पुढाकार घेऊन कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत.
गिव्हिंग प्लेज सुरू करण्यात बिल-मेलिंडा गेट्स आणि वॉरेन बफे यांचा पुढाकार होता. गिव्हिंग प्लेज म्हणजे उद्योगपतींकडून सामाजिक कार्यासाठी पैशाच्या रुपात दिलं जाणारं भरीव योगदान.
फोर्ब्स मासिकानुसार, 124 बिलिअन डॉलर इतक्या प्रचंड संपत्तीचे मानकरी बिल जगातील चौथे श्रीमंत व्यक्ती आहेत.
70च्या दशकात बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मायक्रोसॉफ्ट ही अग्रगण्य कंपनी समजली जाते. या कंपनीच्या माध्यमातून बिल यांना पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळालं.

1987 मध्ये मेलिंडा यांनी मायक्रोसॉफ्टसाठी काम करायला सुरुवात केली. न्यूयॉर्क शहरात एका बिझनेस डिनरला ते पहिल्यांदा एकत्र गेले.
नेटफ्लिक्सवरच्या एका डॉक्युमेंटरीत बिल यांनी सांगितलं की, या डिनरनंतर दोघांमधलं नातं बहरू लागलं. आम्ही एकमेकांना समजून घेऊ लागलो. काळजी घेऊ लागलो. अशा वेळी दोनच गोष्टी होऊ शकतात- एक ब्रेकअप, नाहीतर लग्न.
1994 मध्ये या दोघांनी लग्न केलं. हवाईतील एका बेटावर त्यांचं लग्न झालं. लग्नावेळी बिल यांनी त्या भागातील सगळी हेलिकॉप्टर्स सेवा बुक केली होती. जेणेकरून लग्नाला आगंतुकांना येता येऊ नये.
कोरोना काळातही मदत
सामाजिक कार्याकडे लक्ष देता यावं यासाठी बिल यांनी गेल्याच वर्षी मायक्रोसॉफ्टमधील कामाचा राजीनामा दिला होता.
बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनतर्फे जगभरात नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या गरीब देशांना वेळोवेळी मदत पुरवली जाते.

तसंच कोरोनावरची ऑक्सफर्ड अस्ट्राझेनेकाची लस भारतात आणण्यासाठी गेट्स फाउंडेशनने मोठा निधीही गावी अलायंस या जागतिक लस निर्मिती संघटनेला उपलब्ध करून दिला.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला गेट्स फाउंडेशन आणि गावी आलायंसने 10 कोटी लशींचे डोस तयार करण्यासाठी 15 कोटी डॉलर्स एवढी रक्कम देऊ केली होती.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








